जीम न करता पोटाची चरबी कमी करायची? करा हे 5 व्यायाम प्रकार
जसजसे वय वाढत जाते तस तसे पोटाची चरबी वाढत जाते. ही वाढलेली पोटाची चरबी कशी कमी करता येईल यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात. चला जाणून घेऊया सोपे उपाय...

शरीराचे वजन वाढल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. बहुतेक लोक पोटाच्या चरबीच्या समस्येने त्रस्त असतात. काहीजण ही चरबी कमी करण्यासाठी जीममध्ये जातात. आहाराचे पालन करतात. पण काहीवेळा या सगळ्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असेल तर तुम्ही जीमला न जाता काही व्यायाम प्रकार करू शकता. आता हे व्यायाम प्रकार कोणते चला जाणून घेऊया…
पोटाची चरबी कमी करणे केवळ शरीरासाठी फायदेशीर नाही तर मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी देखील उपयोगी ठरते. यासाठी तुम्हाला जिममध्ये जाण्याची गरज नाही. घरच्या घरी काही सोपे आणि प्रभावी व्यायाम प्रकार करून तुम्ही पोटाची चरबी सहज कमी करू शकता.
1. प्लँक
प्लँक हा एक उत्कृष्ट मुख्य व्यायाम आहे, जो पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतो. हा व्यायाम प्रकार करण्यासाठी तुम्हाला तुमचे शरीर जमिनीवर सरळ ठेवावे लागणार. त्यानंतर तुम्हाला हाताचे कोपर आणि पायाच्या बोटांवर शरीराराचा भार सांभाळावा लागणार. हा व्यायाम केल्याने तुमचे पोट, पाठ आणि खांदे मजबूत होतात.
कसा करावा
-आपले शरीर सरळ ठेवा. त्यानंतर कोपर आणि बोटांवर वजन ठेवा -दीर्घ श्वास घेऊन पोट आत ओढून शरीर सरळ ठेवा -30 सेकंद ते 1 मिनिट या स्थितीत रहा
2. माउंटेन क्लाइंबर
हा एक कार्डिओ व्यायाम आहे, जो पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतो. हा व्यायाम प्रकार केल्याने तुमचे संपूर्ण शरीर सक्रिय राहते आणि कॅलरी बर्न होण्यास मदत होते.
कसा करावा-
-पुश-अप स्थितीत जा -एक पाय गुडघ्यापासून छातीपर्यंत आणा आणि नंतर लगेच मागे घ्या -दुसऱ्या पायाने पुन्हा असेच करा -30-45 सेकंद हा व्यायाम जलद करत राहा
3. लेग रेज़
लेग रेज़ हा एक उत्तम व्यायाम आहे जो तुमच्या ओटी पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतो.
कसा करावा-
-जमिनीवर पाठीवर झोपा आणि दोन्हा पाय सरळ ठेवा -आपले पाय हळू हळू वर करा आणि नंतर जमिनीपासून काही इंच वर खाली करा -हे १५ ते २० वेळा करा
4. सिट-अप्स
पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी सिट-अप्स हा एक प्रभावी व्यायाम आहे. त्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
कसा करावा-
-तुम्ही जमिनीवर झोपताना पाठीवर झोपा -गुडघे वाकवून पाय जमिनीवर ठेवा -आपले हात आपल्या डोक्याच्या मागे ठेवा आणि हळूहळू आपले शरीर वर उचला