Power Nap | अपुरी झोप शरीरासाठी घातक, हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी ‘पॉवर नॅप’ आवश्यक!

जर आपण आठ तासांपेक्षा जास्त आणि सहा तासांपेक्षा कमी झोप घेत असाल, तर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे आहे.

Power Nap | अपुरी झोप शरीरासाठी घातक, हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी ‘पॉवर नॅप’ आवश्यक!
डॉ.राज यांनी टिकटॉकवर लवकर झोप येण्यासाठी जी ट्रिक सांगितली आहे तिला 10-3-2-1 मेथड नाव देण्यात आले आहे. डॉक्टर म्हणतात की ही ट्रिक अवलंबल्याने तुमचे शरीर आपोआपच झोपेसाठी तयार होऊ लागते.
Follow us
| Updated on: Jan 02, 2021 | 3:44 PM

मुंबई : जर, आपण आठ तासांपेक्षा जास्त आणि सहा तासांपेक्षा कमी झोप घेत असाल, तर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे आहे. यामुळे बर्‍याच समस्या उद्भवू शकतात. यात असेही लोक आहेत जे, 8-9 तासांपेक्षा कमी झोपतात आणि त्यांना दिवसा झोप येत राहते. अशा लोकांसाठी ‘पॉवर नॅप’ एक उत्तम उपाय ठरतो (Benefits of power nap will reduce chances of Heart attack).

एका संशोधनानुसार, सहा ते सात तासांच्या झोपेसह पॉवर नॅप घेतल्यास हृदयविकाराचा धोका 40 टक्क्यांनी कमी होतो. अशा परिस्थितीत, जर आपल्याला रात्री झोप येत नसेल किंवा आपल्या केवळ सहा ते सात तास झोप लागत असेल, तर तज्ज्ञ आपल्याला ‘पॉवर नॅप’ घेण्याची शिफारस करतात. यामुळे केवळ हृदयरोगाचा धोका कमी होत नाही, तर मायग्रेन, रक्तदाब आणि ताणतणावाची समस्या देखील कमी होते.

पॉवर नॅप म्हणजे काय?

आपण दिवसातून 10 ते 15 मिनिटे किंवा अर्धा तास डुलकी काढता का? याच डुलकीला ‘पॉवर नॅप’ म्हटले जाते. म्हणजेच, आपल्या शरीराला दिवसभराची विश्रांती किंवा आराम देण्यासाठी घेतलेला एक ब्रेक असतो.

या ‘पॉवर नॅप’मुळे आपल्याला रिलॅक्स, एनर्जेटिक, फ्रेश आणि स्ट्रेस फ्री असल्यासारखे वाटते. आपण दिवसभर कितीही व्यस्त असाल तरीही ही 15 मिनिटांची झोप आपल्याला अधिक ताजेपणा आणि ऊर्जा प्रदान करते. नुकतेच अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने यावर एक संशोधन केले आहे. यात असे आढळले की, 30 मिनिटांच्या ‘पॉवर नॅप’मुळे लोकांची काम करण्याची ऊर्जा आणखी वाढते.

कमीतकमी 6 तास झोपण्यामागील वैज्ञानिक कारण काय?

रात्रीच्या झोपेवेळी आपण कमीतकमी झोपेची चार चक्र पूर्ण केली पाहिजेत. झोपेचे एक चक्र 90 मिनिटांचे असते, म्हणून 4 झोपेचे चक्र पूर्ण करण्यासाठी आपल्याला सहा तासांची झोप घ्यावी लागेल. हे सहा तास झोपेमागील विज्ञान आहे, जे साधारणत: सर्वच तज्ज्ञांनी सुचवले आहे. आपली झोप ही दोन प्रकारांत विभागली जाते. NRME (Non Rapid eye moment) आणि REM (Rapid Eye Moment). NRME नुसार झोपेचे चक्र 90 मिनिटांचे असते (Benefits of power nap will reduce chances of Heart attack).

पॉवर नॅप कसा घ्यावा?

हेल्थलाईन तज्ज्ञांच्या मते, पॉवर नॅप घेण्याचे बरेच मार्ग आहेत, ज्याचे प्रत्येकाने अनुसरण केले पाहिजे. कोणत्याही योग्य पद्धतीशिवाय पॉवर नॅप घेतल्यास त्याचे फायदे कमी होतात. दुपारच्या जेवणानंतर, शांत ठिकाणी 2 ते 30 मिनिटांचा पॉवर नॅप घ्यावा. यावेळी आपला फोन किंवा इतर कोणतीही व्यक्ती आपल्या झोपेत अडथला आणणार नाही याची काळजी घ्यावी.

पॉवर नॅपचे काय फायदे आहेत?

– संशोधनात असे आढळले आहे की, पॉवर नॅपमुळे हृदयरोग होण्याचा धोका कमी होतो. शिवाय यामुळे आपली काम करण्याची क्षमता वाढते, असे नासाने म्हटले आहे.

– पॉवर नॅप घेतल्याने शरीराला ब्रेक मिळतो. या वेळी शरीराला पुन्हा ऊर्जा साठवण्याची संधी मिळते.

– दिवसभर काम केल्याने मेंदूदेखील कंटाळतो. म्हणजेच आपण केवळ शारीरिकच नव्हे तर, मानसिकरित्याही थकतो. अशा परिस्थितीत, पॉवर नॅपमुळे शरीरासह मेंदूला देखील आराम मिळतो आणि आपली स्मरणशक्ती बळकट होते.

– एका संशोधनानुसार पॉवर नॅप घेतल्यास हृदयाशी संबंधित आजार आणि हृदयविकाराचा धोका 40 टक्क्यांपर्यंत कमी होतो.

– पॉवर नॅपमुळे आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. पॉवर नॅप दरम्यान, जेव्हा आपले शरीर रिलॅक्स मोडमध्ये असते, तेव्हा शरीरातील रोगप्रतिकारक पेशी अधिक विकसित होतात.

(Benefits of power nap will reduce chances of Heart attack)

Non Stop LIVE Update
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.