Festive Look | बॉलिवूड अभिनेत्रींचे ‘अनारकली ड्रेस’ लूक, ऐन सणासुदीत तुमच्याही कामी येतील!

आपण देखील सणासुदीच्या काळात या बॉलिवूड सेलिब्रिटींचे ‘अनारकली’ लूक तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतील.

Festive Look | बॉलिवूड अभिनेत्रींचे ‘अनारकली ड्रेस’ लूक, ऐन सणासुदीत तुमच्याही कामी येतील!
Harshada Bhirvandekar

| Edited By: Namrata Patil

Dec 07, 2020 | 1:31 PM

मुंबई : एथनिक कपड्यांची क्रेझ सणांच्या काळात नेहमीच वाढते. यातही ‘अनारकली ड्रेस/सूट’ला नेहमीच प्रथम प्राधान्य दिले जाते. पार्टी असो किंवा घरगुती उत्सव ‘अनारकली ड्रेस’ खरेदी केलाच जातो. याशिवाय लग्न समारंभातही अनारकली सूट आपल्या सौंदर्यात भर घालत असतो. बऱ्याच बॉलिवूड ‘दिवा’ वेगवेगळ्या प्रसंगी अनारकली सूट परिधान केलेल्या दिसतात. आपण देखील सणासुदीच्या काळात अनारकली सूट (Celebrities Look Festive Season) घालण्याचा विचार करत असाल तर, या बॉलिवूड सेलिब्रिटींचे ‘अनारकली’ लूक तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतील. (Bollywood Celebrities Anarkali suit look for festive season)

काजोल देवगण

अभिनेत्री काजोल तिच्या ‘एन्डलेस’ सौंदर्यासाठी ओळखली जाते. अलीकडे अभिनेत्रीने काळ्या रंगाचा अनारकली सूट परिधान केला होता. तिने आपल्या कुर्त्याबरोबर हलक्या निळ्या रंगाचा स्कार्फ घेतला होता. या लूकला साजेसे ऑक्सिडाईझ्ड चांदीचे दागिने काजोलने घातले होते. याआधीही काजोल बर्‍याच वेळा एथनिक पेहरावात दिसली आहे.

आलिया भट्ट

आलिया ही बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया नेहमीच तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. एका मित्राच्या लग्नादरम्यान आलियाने ब्राइट कलरचा अनारकली सूट परिधान केला होता. या सूटवर काश्मीरी भरतकाम करण्यात आले होते. या अनारकली सूटमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत होती. (Bollywood Celebrities Anarkali suit look for festive season)

अनुष्का शर्मा

एका कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री अनुष्का शर्माने लाल आणि पांढऱ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये फुलांची डिझाइन असलेला अनारकली सूट घातला होता. पांढर्‍या रंगाच्या अनकाली सूटवर लाल रंगाची फुले उठून दिसत होती. अनुष्काने आपल्या या लूकसह गोल आकराचे इयररिंग घातले होते आणि रेड मॅचिंग लिपस्टिक लावली होती. या लाल अनारकली सूटमध्ये अनुष्का खूप सुंदर दिसत होती.

क्रिती सॅनॉन

क्रिती सॅनॉनने एका चित्रपटाच्या पोस्टर लाँचवेळी ब्लॅक प्रिंटेड अनारकली सूट परिधान करत रेट्रो लूकमध्ये दिसली होती. कृतीने फ्लेअर्ड अनारकली आणि फ्लोरल प्रिंटचा स्कर्ट घातला होता. कृती सॅनॉनने तिच्या अनारकली सूटसह चांदीचे दागिने परिधान केले होते.( Bollywood Celebrities Anarkali suit look for festive season)

माधुरी दीक्षित

अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या नृत्य शैली आणि दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. माधुरी दीक्षित नेहमीच गडद रंगांच्या कपड्यांमध्ये दिसते. एका कार्यक्रमादरम्यान माधुरीने ‘ब्राइड रेड’ रंगाचा अनारकली सूट घातला होता, त्यावर गोल्डन जरीचे नक्षीकाम केले होते. या अनारकली सूटसह तिने लाल, गुलाबी रंगाचा नक्षीकाम केलेला दुपट्टादेखील परिधान केला होता.

(Bollywood Celebrities Anarkali suit look for festive season)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें