AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या तिशीनंतर हाडांचं दुखणं सुरु, या 5 टेस्ट नक्की करा

वयाच्या तिशी-पस्तीशीनंतर हाडे दुखत असतील ती गोष्ट सामान्य नाही. खास करुन ही दुखणी वारंवार होत असतील तर वेळीच सावध व्हायला हवे.जर त्याकडे दुर्लक्ष केले तर पुढे त्याचा परिणाम अन्य आजार वाढण्यात होऊ शकतो. त्यासाठी काही तपासण्या कराव्यात...

वयाच्या तिशीनंतर हाडांचं दुखणं सुरु, या 5 टेस्ट नक्की करा
Bone pain starts after the age of thirty, be sure to do these 5 tests
| Updated on: Jul 18, 2025 | 3:18 PM
Share

वयाच्या तिशीनंतर शरीरात अनेक हार्मोनल आणि मेटाबॉलिक बदल होत असतात. या वयात बोन डेन्सिटी कमी होणे सुरु होत असते. जर शरीराला योग्य कॅल्शियम, विटामिन्स डी आणि प्रोटीन मिळाले नाही तर हाडे हळूहळू कमजोर होऊ लागतात. कार्यालयात खूपकाळ बसून रहाणे, व्यायाम न करणे, अयोग्य आहार शैली आणि उन्हापासून दूर रहाणे, याचा सर्व परिणाम हाडांच्या आरोग्यावर वाईट होतो. महिलांमध्ये प्रेग्नंसी वा पिरियडमध्ये हार्मोन्स बदल देखील या कारणीभूत असू शकतात.या वयात जर हाडांची दुखणी सुरु झाली तर त्याकडे दुर्लक्ष करु नका, कारण पुढे जाऊन गंभीर समस्या होऊ शकते

सर्वोदय रुग्णालयाचे डॉ. अचित उप्पल यांनी सांगितले की हाडांमध्ये सातत्याने दुखणे कोणत्याही मोठी समस्येचे संकेत होऊ शकतात. जर वेळीच उपचार केले नाहीत तर हाडे हळूहळू कमजोर होऊन ऑस्टीओपेनिया वा ऑस्टीयोपोरॉसिस सारख्या स्थितीत पोहचू शकते. यात हाडे सहज तुटू शकतात. खासकरुन माकड हाड, नितंब आणि खांद्याचे हाड,संधीवाताची सुरुवातही हाडांच्या दुखण्यापासून होते. ज्यात सांधे आखडतात आणि चालताना तसेच फिरताना त्रास होतो.याशिवाय हाडांमध्ये सूज असेल शरीरातील अंतर्गत इंफेक्शन वा ऑटोइम्युन डिसऑर्डर सारखे रुमेटॉईड आर्थरायटीसचा संकेत होऊ शकते. लागोपाठ थकवा, झोपेची कमतरता आणि स्नायूंचे अखडने यासारखी लक्षणे देखील दिसू शकतात. त्यामुळे हाडांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरु शकते.

हाडांसाठी या 5 टेस्ट आवश्यक करुया…

बोन मिनरल डेन्सिटी टेस्ट

ही टेस्ट हाडांच्या मजबूती मोजत असते. आणि ऑस्टीओपोरॉसिस वा हाडे कमजोर होण्याची स्थितीच्या सुरुवातीच्या पायरीत पकडू शकते.

विटामिन डी टेस्ट

विटामिन डी हाडांच्या आरोग्यासाठटी आवश्यक आहे. कारण ते कॅल्शियम शोषण करायला मदत करते. याच्या कमतरतेने हाडांमध्ये दुखणे आणि कमजोरी होऊ शकते.

कॅल्शियम लेव्हल टेस्ट

ही टेस्ट रक्तात अस्तित्वात असलेल्या कॅल्शियमचे प्रमाण मोजते.यावरुन समजते की शरीरातील हाडांना मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम पुरेसे आहे की नाही.

आरए फॅक्टर टेस्ट

जर सांध्यात सूज असेल किंवा सांधे आखडत असतील तर ही टेस्ट केल्यानंतर समजते की रूमेटॉईड आर्थरायटीस सारखी ऑटोइम्युन आजार आहे की नाही ?

यूरीक एसिड टेस्ट

संधीवाताच्या सारख्या स्थितील शरीरात युरिक एसिडची पातळी वाढत रहाते, त्यामुळे सांध्यात तीव्र वेदना होतात. ही टेस्ट त्यासाठी महत्वाची आहे.

या बाबींना ध्यानात ठेवावे –

रोज 20-30 मिनटे उन्हात जरूर बसावे

भरपूर कॅल्शियम आणि विटामिन डी असलेले डाएट करावा

रोज हलक्या एक्सरसाईज आणि स्ट्रेचिंग करावे

खूप वेळ एकाच स्थितीत बसणे टाळावे

रात्री भरपूर झोप घ्या आणि ताण-तणावापासून दूर राहा

डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय सप्लीमेंट घेऊ नका

वेळोवेळी आरोग्य चाचण्या करीत रहाव्यात

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.