झटपट वजन कमी करण्यासाठी रोज कॅलरी बर्न करा; ‘या’ पदार्थांचाही आहारात समावेश करा!

वाढलेल्या वजनामुळे आपण अनेक रोगांना निमंत्रणच देत असतो. परंतु वजन कमी करण्यासाठी लोक योग्य प्रयत्न करीत नाहीत.

झटपट वजन कमी करण्यासाठी रोज कॅलरी बर्न करा; 'या' पदार्थांचाही आहारात समावेश करा!
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 7:07 AM

मुंबई : वाढलेल्या वजनामुळे आपण अनेक रोगांना निमंत्रणच देत असतो. परंतु वजन कमी करण्यासाठी लोक योग्य प्रयत्न करीत नाहीत आणि जे वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतात ते खाण्यावर नियंत्रण ठेवत नाहीत. यामुळे व्यायाम करू देखील काही फायदा होत नाही. खरोखरच वजन कमी करायचे असेल तर आजच आम्ही खास टिप्स देणार आहोत. त्या फाॅलो करून तुम्ही वाढलेले तुमचे वजन कमी करू शकता. (Burn calories daily to loss weight)

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात जास्तीत-जास्त प्रमाणात हिरव्या भाज्या घ्या. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी तसंच आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश आवर्जून करावा. वजन नियंत्रणात आणण्यासाठी भाज्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. हिरव्या भाज्यांच्या सेवनामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो आणि शरीरातील कॅलरीज् देखील कमी होतात.

जेवण झाल्यानंतर काही वेळेने आपल्याला काहीतरी खाण्याची इच्छा होते. त्यावेळी ते खाणे टाळा कारण त्यामुळे कॅलरी जास्त वाढण्याची शक्यता असते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर पाणी प्या. पाणी पिण्यामुळे केवळ तहान भागत नाहीतर भूक देखील कमी लागेल. अनेकजणांना गोड खाण्याची इच्छा असते. मात्र, साखर खायची नाही, म्हणून ते मधासारखे पर्यायी पदार्थ शोधतात. असे लोक साखरेपेक्षा नैसर्गिकरित्या आढळणारे गोड पदार्थ चांगले आहे असं समजतात. मात्र, वास्तवात अशा गोड पदार्थांमध्ये कोणतेही अतिरिक्त पोषणद्रव्ये नसतात.

शिवाय कॅलरिजचं प्रमाण देखील कमी नसतं. त्यामुळे साखर खाण्याऐवजी मध किंवा इतर गोड पदार्थ खाल्याने तसा काहीही फरक पडत नाही. अँटीऑक्सिडेंट गुणधर्मांसह समृद्ध, ग्रीन टी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात आणि शरीराचे विविध संक्रमणांपासून संरक्षण करण्यास मदत करतो. ग्रीन टीमध्ये आढळणारे हे अँटीऑक्सिडेंट्स आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतात. आले आणि लसूण कमी कॅलरीयुक्त पदार्थ आहेत जे प्रत्येक स्वयंपाकघरात सहजपणे आढळतात.

वजन कमी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे भार उचलन. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर दररोज वेटलिफ्टिंग करा. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. वाढतं वजन नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही दररोज ट्रेडमिल किमान 1 तास चालवा. तुम्ही दररोज एक हजार कॅलरी बर्न करू शकता. तुम्ही दररोज 30 मिनिटं सायकल चालवून हजार कॅलरी बर्न करू शकता. आपण सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी सायकल चालवू शकता. म्ही जितकं जास्त पाणी प्याल तितकं जास्त कॅलरी बर्न कराल. सहसा डॉक्टर दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिण्यासाठी सांगतात. म्हणून तुम्ही दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Burn calories daily to loss weight)

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.