AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर दिल्लीच्या जवळ असलेले ‘हे’ ठिकाण आहे स्वर्गापेक्षाही सुंदर

जर तुम्ही दिल्लीत राहत असाल आणि बर्फवृष्टीचा आनंद घेऊ इच्छित असाल. तर तुम्हाला चकराता हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन ठरू शकते. हे ठिकाण दिल्लीच्या अगदी जवळ आहे जिथे तुम्ही बर्फवृष्टीचा आनंद घेऊ शकता.

बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर दिल्लीच्या जवळ असलेले 'हे' ठिकाण आहे स्वर्गापेक्षाही सुंदर
| Edited By: | Updated on: Jan 01, 2025 | 12:20 PM
Share

हिवाळा म्हंटलं कि सगळेजण बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी शिमला- मनाली अश्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन करत असतात. डिसेंबर ते फेब्रुवारी या दिवसांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार बर्फवृष्टी होते. हे असे महिने आहेत जेव्हा लोकं ख्रिसमस, नवीन वर्ष आणि हिवाळी सुट्ट्या साजरे करण्यासाठी हिल स्टेशनवर जातात आणि बर्फवृष्टीचा आनंद घेतात. तुम्हाला जर बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी खूप लांब जाण्याची ही गरज नाही. त्यात जर तुम्ही दिल्लीत राहत असाल तर तुम्ही आजूबाजूची जागाही एक्सप्लोर करू शकता.

दिल्लीजवळ एक अतिशय सुंदर ठिकाण आहे जिथे बर्फवृष्टीचा मनसोक्त आनंद घेता येतो, त्या ठिकाणचे नाव चकराता आहे. हे उत्तराखंडमधील एक छोटेसे पण अतिशय सुंदर आणि शांत हिल स्टेशन आहे. हिवाळ्यात येथे बर्फवृष्टीचा एक वेगळाच अनुभव येतो. हिमवृष्टीच्या या छोट्याशा दिवसात इथले बर्फाच्छादित डोंगर, घरे आणि झाडे त्याला स्वर्गासारखे सुंदर बनवतात.

हिमालय पर्वतरागांच्या कुशीत वसलेले हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्य, नयनरम्य दृश्ये आणि थंड मैदाने यासाठी खूप लोकप्रिय आहे. दिल्लीच्या धकाधकीच्या आणि जीवनशैलीपासून काही दिवस दूर राहण्यासाठी हे खूप चांगले ठिकाण आहे. ज्यांना हिवाळ्याच्या थंडीत बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी चकराता हे एक उत्तम ठिकाण आहे.

हिवाळ्यात चकराता बर्फाच्या चादरीने झाकलेली असते, तेव्हा इथला प्रत्येक कोपरा पोस्टकार्डसारखा दिसतो. बर्फवृष्टी पाहण्याबरोबरच फिरण्यासाठीही खूप चांगली ठिकाणे आहेत. तसेच येथे तुम्हाला अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतील. चला तर मग जाणून घेऊयात की चकरातामध्ये तुम्ही काय पाहू शकता आणि काय खाऊ शकता?

बर्फवृष्टीदरम्यान चकरातामध्ये कोणते ठिकाण पहावे?

टायगर फॉल्स : टायगर फॉल्स हे चकरातामधील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. हिवाळ्यात होणारी बर्फवृष्टीमुळे बऱ्याचदा बर्फ गोठते, ज्यामुळे ते ठिकाण पाहण्यासारखे बनते. इथपर्यंत पोचण्यासाठी एक छोटासा ट्रेक करावा लागतो, जो खूप साहसी असतो. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जायला खूप आवडेल.

देवबन : चकराताला गेल्यावर तुम्ही देवबनला जायला विसरू नका. कारण येथे तुम्हाला हिमालयातील बर्फाच्छादित शिखरांचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळेल. फोटोग्राफी आणि शांत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. बर्फवृष्टीच्या वेळी इथली जंगलं अधिकच सुंदर दिसतात, जी खरोखरच पाहण्यासारखी आहे. असे हे नयनरम्य दृश्य पाहून तुम्ही तेथून निघावेसे वाटणार नाही.

लक्ष्मण सिद्ध मंदिर : जर तुम्हाला एखाद्या धार्मिक आणि शांत ठिकाणी जायचे असेल तर लक्ष्मण सिद्ध मंदिर या ठिकाणाला आवर्जून भेट द्या. हिवाळ्यात येथे बर्फवृष्टीचे विशेष दृश्य पाहायला मिळते. याशिवाय स्थानिक बाजारपेठ आणि चकराताच्या छोट्या गावांनाही भेट देता येते. जे तुम्हाला खूप आवडेल.

चकरातामध्ये काय खावे?

पहाडी राजमा आणि भात : चकराताला गेलात तर तिथल्या स्थानिक ढाब्यावर पहाडी राजमा नक्की खा. हिवाळ्याच्या थंडीत हा पदार्थ शरीराला उष्णता तर देईलच पण तोंडाची चवही वाढवेल.

मदुआ रोटी : मदुआ रोटी उत्तराखंडमधील प्रसिद्ध पदार्थांपैकी एक आहे, जी देशी तूपाबरोबर सर्व्ह केली जाते. चकराताला गेलात तर एकदा नक्की ट्राय करा.

झांगोरा खीर: ही एक पारंपारिक उत्तराखंडी मिठाई आहे, जी बकव्हीट तांदळापासून बनविली जाते. थंड हवामानात जास्त गोड खाणाऱ्या व्यक्तींसाठी हे परफेक्ट आहे.

लोकल हर्बल टी : बर्फवृष्टीच्या वेळी गरमागरम हर्बल चहा प्यायल्याने एक वेगळाच अनुभव येईल. हे स्थानिक औषधी वनस्पती आणि मसाल्यांपासून बनवले जाते. या चहाची टेस्ट खूप स्ट्रॉंग असते

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.