कोणत्या स्त्रीशी लग्न करावं? ते चार गुण कोणते?; चाणक्य नीती काय सांगते?

चंद्रगुप्त मोर्य यांना राजा बनवण्यासाठी आर्य चाणक्यांनी खूप मोठं योगदान दिलं आहे. अत्यंत ज्ञानी पुरुष म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांनी मानवी स्वभाव आणि व्यवहार ज्ञानावर आधारीत अनेक भाष्य केलं आहेत. त्यांचे हे विचार चाणक्य नीती म्हणून प्रसिद्ध आहे. ही चाणक्य नीती अनेक लोक फॉलो करत असतात.

कोणत्या स्त्रीशी लग्न करावं? ते चार गुण कोणते?; चाणक्य नीती काय सांगते?
chanakya nitiImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jun 22, 2024 | 9:22 PM

आचार्य चाणक्य यांनी काही नीती सांगितल्या आहेत. त्यांच्या नीतीनुसार वागल्यास कोणतीही व्यक्ती आयुष्यात कधीच अपयशी होत नाही असं म्हटलं जातं. आचार्य चाणक्य हे महान ज्ञानी पुरुष होते. चंद्रगुप्त मोर्यांना राजा बनवण्यात चाणक्यांचा मोठा हात होता. आजच्या काळातही चाणक्यांच्या नीती अत्यंत प्रभावशाली ठरत आहेत. नीती, अनिती, मैत्री, शत्रूता, कुटुंब, जीवनसाथी, देश, व्यवहार, कारभार आदी सर्व मुद्द्यांवर चाणक्य यांनी चर्चा केलेली आहे आणि त्यावर काही नामी तोडगे दिले आहेत. त्यामुळे अनेक लोक चाणक्य नीतीनुसारच वागण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यात ते यशस्वी होतानाही दिसतात.

प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात सच्चा आणि समजूतदार जीवनसाथी हवा असतो. प्रत्येकाला आपल्या पार्टनरपासून वेगळी अपेक्षा असते. जी व्यक्ती अपेक्षानुरुप असते तिच्याशी लोक विवाह करतात. चाणक्य यांनी त्यांच्या नीती शास्त्रात, कोणत्या स्त्रीशी विवाह केल्याने पुरुष सुखी होतो, याची लक्षणे सांगितली आहेत. चाणक्यांच्या मते ज्या स्त्रीमध्ये चार गुण असतात तिच्याशी विवाह केल्याने पुरुषांचं भाग्य उजळतं. अशी स्त्री घरात आली तर लाभच लाभ होतो. कोणत्या आहेत या स्त्रीया?

साथीदाराची काळजी घेणारी…

चाणक्याच्या मते, जी स्त्री आपल्या पार्टनरवर अत्याधिक प्रेम करते, सतत आपल्या जीवनसाथीची काळजी वाहते अशा स्त्रीची साथ कधीच सोडू नये. अशा स्त्रीसोबत वाद झाला तरी तो सोडवला पाहिजे. कारण अशी स्त्री आपल्या जीवनसाथीच्या चांगल्या आणि वाईट काळात पहाडासारखी खंबीरपणे उभी असते.

मनाच्या सौंदर्याला महत्त्व देणारी

चाणक्य म्हणतात, जी स्त्री मनाच्या सौंदर्याला महत्त्व देते अशा स्त्रीशी विवाह करा. शारीरिक सौंदर्य निघून जातं, पण व्यक्तीचा स्वभाव नेहमी तोच असतो. स्वभावाला महत्त्व देणारी आणि आंतरीक सौंदर्याला महत्त्व देणारी स्त्रीच आयुष्यभर साथ देते.

शांत चित्ताची स्त्री

ज्या स्त्रीला कधी राग ये नाही, ती नेहमी शांत राहते, अशा स्त्रीशी विवाह केल्याने भाग्य उजळतं. राग हा व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. रागीट व्यक्तीला आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावं लागतं. म्हणून शांत चित्ताच्या स्त्रीशी विवाह करणं कधीही योग्य, असं चाणक्य सांगतात.

मान सन्मान देणारी…

घरातील ज्येष्ठांचा मान राखणारी आणि छोट्यांवर प्रेम करणाऱ्या स्त्रीशी विवाह करणं कधीही उत्तम. अशा स्त्रीशी लग्न केल्याने आयुष्य सार्थकी लागते, असं चाणक्य म्हणतात.

धैर्यवान स्त्री

जी स्त्री धैर्यवान असते, ती स्त्री कोणत्याही परिस्थितीत आपल्या जीवनसाथीची साथ सोडत नाही. अशा स्त्रीशी विवाह केल्याने व्यक्तीचं आयुष्य बदलतं, असं चाणक्य सांगतात.

धार्मिक स्त्री

चाणक्यांच्या मते, धार्मिक वृत्ती असलेल्या स्त्रीशी विवाह केल्याने नशीब उजळतं. धार्मिक व्यक्ती कधीच चुकीच्या मार्गाने जात नाही. धर्माच्या मार्गाने चालणाऱ्या व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद.
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह.
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका.
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले.
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी.
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार.
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान.
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर.
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड.