AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंडीच्या दिवसात खा सुके अंजीर, शरीराला मिळतील जबरदस्त फायदे, जाणून घ्या

तुम्ही अंजीर फळ म्हणून खा किंवा सुके अंजीर खा, दोन्हीही निरोगी राहण्यासाठी उत्कृष्ट आहेत. कारण यामध्ये भरपूर आरोग्यदायी फायदे आहेत. तर आजच्या लेखात आपण हिवाळ्यात सुके अंजीरचे सेवन केल्याने कोणते फायदे शरीराला मिळतात त्याबद्दल जाणून घेऊयात...

थंडीच्या दिवसात खा सुके अंजीर, शरीराला मिळतील जबरदस्त फायदे, जाणून घ्या
dry anjeer
| Edited By: | Updated on: Nov 19, 2025 | 3:43 PM
Share

बदलत्या ऋतूनुसार आपल्या आहारात देखील बदल करत असतो. आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येकजण पौष्टिक पदार्थांचा समावेश आहारात करत असतात. अशातच हंगामी फळांसोबत इतर काही फळं देखील आपल्याला बदलत्या वातावरणात तंदूरस्त ठेवतात. फळांचे अनेक प्रकार आहेत आणि यातील काही फळे सुकामेवा बनवण्यासाठी वापरली जातात. तुम्ही अंजीर फळाबद्दल ऐकले असेल आणि त्याचे फळं खाल्लेही असेल. त्यात सुके अंजीरचे सेवन देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण हे पोषक तत्वांचा खजिना आहे. परंतु जेव्हा तुम्ही ते पाण्यात भिजवून खाता तेव्हा त्यांचे फायदे दुप्पट होतात. तर आपण आजच्या लेखात हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सुके अंजीर खाण्याचे फायदे जाणून घेऊयात.

सुके अंजीर खाण्याचे फायदे

  • अंजीरला आरोग्य आणि गोडपणाचा खजिना आहे. अंजीरमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्ससह असंख्य पोषक घटक असतात.
  • सुके अंजीरचे सेवन शरीराला मुबलक ऊर्जा देतात आणि अनेक आजारांपासून संरक्षण करतात. अंजीर लीवर आणि किडनीसाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. त्यांचे सेवन केल्याने नैसर्गिकरित्या लीवर आणि किडनी विषमुक्त होतात.
  • अंजीरमध्ये फॉस्फरस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते, जे तुमची हाडे दीर्घकाळ मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करू शकते. यामुळे ऑस्टियोपोरोसिसपासून तुमचे संरक्षण होऊ शकते.
  • अंजीर पचनसंस्था मजबूत करते, त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते खाल्ल्याने बद्धकोष्ठता टाळता येते. जर तुम्हाला दीर्घकालीन बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर सकाळी भिजवलेले अंजीर खा.
  • जिममध्ये तासंतास घाम गाळल्यानंतरही वजन कमी करण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल, तर अंजीर खाणे हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. त्यात कॅलरीज कमी असतात.
  • अंजीर हृदयरोगापासून देखील संरक्षण करते. ते नियमितपणे खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. लोहाने समृद्ध असलेली ही फळे अशक्तपणाशी लढण्यास मदत करू शकतात.
  • तसेच सुके अंजीरचे नियमित आणि मर्यादित प्रमाणत सेवन केल्याने तुमची त्वचा चमकदार आणि मजबूत केसांना प्रोत्साहन देतात. अंजीरमध्ये व्हिटॅमिन सी देखील असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.

अंजीर खाण्याची योग्य पद्धत

आरोग्य तज्ञांच्या मते, सुके अंजीर रात्रभर थोड्या पाण्यात भिजत ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी खा आणि पाणी फेकून देऊ नका. हिवाळ्यात ताजे अंजीर खाणे आवश्यक आहे. काही आरोग्य समस्या देखील टाळल्या पाहिजेत. ज्यांना अंजीरची ॲलर्जी आहे त्यांना चुकून ते खाल्ल्यास तोंडाला खाज किंवा पुरळ येऊ शकते. मधुमेह रूग्णांनी अंजीरचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.