Health tips : आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे मक्याचे कणीस, वाचा !

आपल्यापैकी अनेकांना मक्याचे कणीस खायला खूप आवडते. नाश्त्यामध्ये अनेक वेळा आपण मक्याच्या बियांपासून तयार करण्यात आलेले विविध पदार्थ खातो.

Health tips : आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे मक्याचे कणीस, वाचा !
मक्याचे कणीस

मुंबई : आपल्यापैकी अनेकांना मक्याचे कणीस खायला खूप आवडते. नाश्त्यामध्ये अनेक वेळा आपण मक्यापासून तयार करण्यात आलेले विविध पदार्थ खातो. तसेच सालादमध्ये देखील आपण मक्याच्या बिया टाकतो. मक्याचे कणीस खायला जसे चवदार आहे तसेच आपल्या आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत प्रत्येकजण आपल्या आहारात मक्याच्या कणीसाचा समावेश करू शकतात. (Corn kernel is beneficial for health)

-आज प्रत्येकजणच वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहे. तुम्ही जर आहारात मक्याचे कणीस घेतले तर शरीरातील कॅलरीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते आणि त्यामुळे वजन कमी होते. यामुळे जे लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी तर अगोदर आपल्या आहारात मक्याचे कणीस घ्यायला पाहिजे.

-मक्यामध्ये मॅग्नेशियम आणि आर्यन मोठ्या प्रमाणात आढळते. यामुळे आपली हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. मक्यामध्ये झिंक आणि फॉस्फरस हेही असल्यामुळे हाडासंबंधित रोग दूर होण्यास मदत होते.

-मक्याच्या कणसामध्ये ल्यूटिन असते जे मोतीबिंदूच्या समस्येस प्रतिबंध करते. याशिवाय दररोज मक्याचे कणीस खाल्ल्याने तुमच्या डोळ्यांची नजर चांगली होते.

-अनेक लोक नेहमीच आजारी पडतात कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. अशांनी आपल्या आहारात मक्याचे कणीस घ्यावे कारण त्यामध्ये लोह, व्हिटॅमिन ए, थायमिन, व्हिटॅमिन बी 6, जस्त, मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक असतात जे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतात.

-एक कप उकडलेले मक्याच्या दाणे घ्या. टोमॅटो (बारीक चिरलेला), एक छोटा कांदा (बारीक चिरलेला), एक चमचा लोणी एक चमचा लिंबाचा रस, मीठ आणि चवीनुसार मिरपूड घाला. कोथिंबीरने सजवा. संध्याकाळी स्नॅक्ससाठी ही परिपूर्ण स्नॅक रेसिपी आहे.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Corn kernel is beneficial for health)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI