पावसाळ्याच्या दिवसात दही आणि ताक आहाराचा भाग बनवणे योग्य आहे का?
हवामानातील बदलासोबतच खाण्याच्या सवयींमध्येही बदल करणे आवश्यक आहे, तरच आपण निरोगी राहू शकता. उन्हाळ्यात ताक आणि दही खाणे खूप फायदेशीर आहे, पण पावसाळ्यातही दही व ताक सेवन करावे का? चला तर मग याबद्दल आपण तज्ञांकडून जाणून घेऊयात.

दही आणि ताक हे पारंपारिक दुग्धजन्य पदार्थ आहेत, जे आपण रोजच्या आहारात त्यांचे सेवन करत असतो. तसेच दही आणि ताक यापासून अनेक पदार्थ बनवलेले जातात. तसेच दही आणि ताक यांमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात, म्हणून हे दोन्ही पदार्थ दुधापेक्षा पचनासाठी चांगल्या असतात, कारण दुध आंबवताना यामध्ये चांगल्या बॅक्टेरियाचा स्रोत देखील तयार होत असतो, जे आपल्या पचनक्रियेसाठी अधिक फायदेशीर ठरते. तसेच ताकात फॅट देखील कमी असते, त्यामुळे या दोन्ही पदार्थांच्या सेवनाने तुम्हाला ताजेतवाने वाटते. हेच कारण आहे की लोकं उन्हाळ्यात दही आणि ताक त्यांच्या आहाराचा भाग बनवतात. या दोन्ही पदार्थांच्या आम्लयुक्त स्वभावामुळे पावसाळ्याच्या दिवसात दही आणि ताक आहाराचा भाग बनवणे योग्य आहे का असा प्रश्न लोकांच्या मनात येतो.
पावसाळ्यात हवामान दमट आणि उष्ण असते आणि डोळ्यांना न दिसणाऱ्या कीटक आणि सूक्ष्म जीवाणूंच्या वाढीसाठी हे वातावरण सर्वोत्तम असते. म्हणून यादिवसात आपले आरोग्य तंदुरस्त राहण्यासाठी आपण अनेक पदार्थांचे सेवन करणे टाळतो, जेणेकरून आपल्याला आरोग्याच्या कोणत्याच समस्यांचा त्रास होऊ नये. कारण या पावसाळ्याच्या दिवसात अन्नातून विषबाधा होण्याचा धोका जास्त असतो. अशातच अनेक पावसाळ्यात दही आणि ताक सेवन करावे की नाही हे अनेक लोकांना पडलेला प्रश्न आहे. चला तर आजच्या या लेखात आपण याबद्दल तज्ञांकडून जाणून घेऊयात.
पोषक तत्वांनी समृद्ध
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट डॉ. गीतिका चोप्रा सांगतात की दही आणि ताक दोन्हीही निसर्गतः थंड असतात. दोन्हीमध्ये प्रोबायोटिक्स, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी12, प्रथिने असतात. तसेच दही आणि ताक हे पाण्याचा एक चांगला स्रोत देखील आहेत, त्यामुळे ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.
आपण पावसात दही आणि ताकाचे सेवन करू शकतो का?
तज्ञांचे म्हणणे आहे की दही आणि ताकाचे सेवन तुमच्या आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आणि पचनासाठी सर्वोत्तम आहे, म्हणून ते आहारात समाविष्ट केले जाऊ शकते, परंतु पावसाळ्याच्या दिवसात मात्र ते योग्य वेळी सेवन करणे खूप महत्वाचे आहे. प्रत्यक्षात दही आणि ताक बहुतेकदा फ्रिजमध्ये ठेवले जातात, ज्यामुळे ते आणखी थंड होतात. जर तुम्ही रात्री फ्रिजमधून थंड पदार्थ खाल्ले तर पचनक्रिया मंदावते. दिवसा तुम्ही दही आणि ताक फ्रिजमध्ये न ठेवता त्यांचे सेवन करणे फायदेशीर ठरेल.
या लोकांनी दही आणि ताक खाऊ नये
विशेषतः ज्यांना संधिवात किंवा कोणत्याही प्रकारच्या सांधेदुखीचा त्रास आहे, त्यांनी पावसाळ्यात रात्री दही आणि ताकाचे सेवन करू नये. याशिवाय जर तुम्हाला सर्दी आणि खोकला दोन्ही असेल तर ते पूर्णपणे टाळा. लक्षात ठेवा की दुपारीच दही आणि ताकाचे सेवण करणे चांगले.
दही आणि ताक असे खा
डॉ. गीतिका यांच्या मते दुपारच्या जेवणासोबत दही आणि ताक घेणे चांगले. ते खोलीच्या तापमानावर घ्या, त्यात थोडे हिंग, जिरे आणि काळे मीठ टाका. जेणेकरून तुमचे पचन सुधारेल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
