डेनिमच्या कपड्यांना तरुणांची पसंती का?

डेनिमच्या कपड्यांना तरुणांची पसंती का?

मुंबई : चांगल्या प्रकारचे फॅब्रिक आणि त्याची रंगसंगती हे डेनिमचे मूळ वैशिट्य आहे. डेनिम हा फॅब्रिक तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. हा कपड्यांचा एक असा प्रकार आहे, जो कधीही जूना किंवा ओल्ड फॅशन होत नाही. जर तुम्ही डेटवर जाताना डेनिमचे कपडे परिधान केले तर तुमच्या डेटला ते नक्की आवडतील. कोणत्याही जीन्सवर कोणत्याही प्रकारचे शर्ट, टी-शर्ट, जॅकेट […]

Nupur Chilkulwar

| Edited By: Namrata Patil

Dec 07, 2020 | 1:37 PM

मुंबई : चांगल्या प्रकारचे फॅब्रिक आणि त्याची रंगसंगती हे डेनिमचे मूळ वैशिट्य आहे. डेनिम हा फॅब्रिक तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. हा कपड्यांचा एक असा प्रकार आहे, जो कधीही जूना किंवा ओल्ड फॅशन होत नाही. जर तुम्ही डेटवर जाताना डेनिमचे कपडे परिधान केले तर तुमच्या डेटला ते नक्की आवडतील.

कोणत्याही जीन्सवर कोणत्याही प्रकारचे शर्ट, टी-शर्ट, जॅकेट सहज कॅरी करती येते. स्पायकर डेनिमचे कपडे दिसायलाही आकर्षक असतात. तुमच्या डेटला इम्प्रेस करण्यासाठी कपडे सर्वाधिक महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे स्टायलिश कपडे असणे त्याचसोबत ते आपल्याला शोभून दिसणे हे खूप महत्वाचे असते.

तुम्ही ज्याही व्यक्तीसोबत डेटवर जाणार आहात, त्याच्या किंवा तिच्या स्वभावाचा, फॅशनचा अंदाज घेऊन तुम्ही डेनिममधील त्याला किंवा तिला आवडेल असे कपडे घालू शकता. त्यासाठी अनेक पर्याय डेनिम कपड्यांमध्ये पाहायला मिळतात.

डेनिम कपडे हे डेटवर जाण्यासाठी का महत्वाचे आणि सर्वोत्तम पर्याय आहेत याची काही करणे पाहूयात :

1. यामध्ये असंख्य पर्याय उपलब्ध असल्याने त्याच्या/तिच्या आवडीचे कपडे घालण्यास अनेक पर्याय उपलब्ध होतात.

2. इतर फॅब्रिकच्या तुलनेत मजबूत असल्याने ते सहज फाटत नाहीत आणि जास्त काळ टिकतात. हँगआउट करताना बंधिस्त वाटणार नाही.

3. विविध प्रकारच्या स्टाईलमध्ये, हव्या त्या प्रकारामध्ये डेनिम कपडे उपलब्ध असतात.

4. कोणत्याही स्टाईलमध्ये, विशेष लूकसाठी एकाच वेळी अनेक कपडे घालू शकता.

5. स्टाईल करण्यासाठी सहज आणि सोपी पद्धत वापरता येते.

6. ‘स्मार्ट-कॅज्यूअल ड्रेसिंग’करिता स्पायकर डेनिमच्या कपड्यांचा वापर सर्वोत्तम आहे.

7. डेनिमवरील पडलेला डाग दिसत नाही. जरी डिनर करताना कपड्यांवर डाग पडले तरी काळजी करण्याचे कारण नाही.

8. स्पायकरची साईड स्ट्राईप्ड जीन्स किंवा ट्राऊजर तुमच्या वरच्या कपड्यांना उत्तम स्पोर्टी लुक देते.

9. यावर सुरकुत्या सहज पडत नाहीत आणि पडलेल्या सहज दिसत नाहीत.

10. स्ट्रेचेबल असल्याने आरामदायी असते, त्यामुळे समोरच्या व्यक्तीसमोर आपला कॉन्फिडन्स कायम राहतो.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें