सकाळी पोट साफ होत नसेल, तर उठल्यानंतर आधी 5 मिनिटे हे काम करा, लगेच रिझल्ट दिसेल
सकाळी पोट साफ न झाल्याने दिवसभर अस्वस्थता येते. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर आधी 5 ते 10 मिनिटे तुम्ही एक गोष्ट आवर्जून करायलाच हवी. त्यामुळे तुम्हाला फरक नक्कीच दिसून येईल.

बऱ्याचदा काही लोकांसोबत असे घडते की ते सकाळी उठून वॉशरूमला जातात पण त्यांचे पोट नीट साफ होत नाही. पोट नीट साफ होत नाही तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण दिवसावर होतो. पोट साफ न झाल्यामुळे पोटदुखी, जडपणा, पेटके यासारख्या समस्या उद्भवतात, ज्यामुळे तुमचा मूड आणि तुमचा संपूर्ण दिवस खराब होतो. जर तुम्हालाही अशाच प्रकारची समस्या येत असेल तर सकाळी उठल्यानंतर एक अशी गोष्ट करा त्यामुळे तुम्हाला लगेच रिझल्ट पाहायाला मिळेल. पोट साफ होण्यास मदत होईल.
पोट साफ न होण्याची कारणे काय आहेत?
>जेव्हा तुमच्या आहारात फायबर म्हणजेच फळे, भाज्या आणि धान्ये यांची कमतरता असते तेव्हा बद्धकोष्ठता होऊ शकते. >कमी पाणी पिल्यानेही बद्धकोष्ठता होऊ शकते. खरंतर, जेव्हा तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा आतडे कोरडे होतात. ज्यामुळे मल कोरडा आणि कडक होतो. >शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसणे म्हणजे हालचाल होणे हे देखील याचे एक कारण असू शकते. कारण सतत बसल्याने पचन प्रक्रिया मंदावते. >जास्त फास्ट फूड आणि प्रक्रिया केलेले अन्न खाणे हे देखील याचे कारण असू शकते कारण या पदार्थांमध्ये फायबर नसते. >कधीकधी ताणतणावामुळे बद्धकोष्ठतेची समस्या देखील उद्भवू शकते. खरं तर, ताणतणावाचा परिणाम पचनसंस्थेवर होतो. >काही औषधांच्या सेवनामुळे देखील बद्धकोष्ठता होऊ शकते
पोट साफ होण्यासाठी तुम्हाला 5 ते 10 मिनीटे जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे योगासने. अगदी 5 ते 10 मिनिटात होणारी ही योगासने तुमच्या पोटाच्या समस्या नक्कीच दूर करतील. कारण पोट साफ न होण्याच्या समस्येसाठी औषध घेण्यापेक्षा योगासने हा उत्तम पर्याय आहे.
View this post on Instagram
पोट ताबडतोब साफ करण्यासाठी काय करावे >जर सकाळी उठल्यावर तुमचे पोट स्वतःहून साफ होत नसेल, तर तुम्हाला फक्त 5 ते 10 मिनिटे वेळ काढावा लागेल. सकाळी उठल्यानंतर, मलासनात बसा आणि पाणी प्या. >यानंतर, योगा मॅट ठेवून त्यावर उभे राहून एकाच ठिकाणी जॉगिंग करावी >यानंतर तुम्हाला 10 वेळा ताडासन करा >ताडासन केल्यानंतर, तुम्हाला त्रय्यक ताडासन करणे शक्य असेल तर तेही करा > आणि शेवटी कटी चक्रासन करायचे आहेत
ही आसने केल्यानंतर तुमचे पोट सहज साफ होण्यास नक्कीच मदत होते. पण यासोबतच तुम्ही तुमच्या आहाराची आणि जीवनशैलीचीही काळजी घेतली पाहिजे. तसेच जर ही समस्या वाढताना दिसत असेल तर योगासने करण्यासोबतच डॉक्टरांचा सल्लाही नक्की घ्या.
