AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात कलिंगडाची सालं म्हणजे त्वचेसाठी वरदान, तुमच्या स्किन केअर रूटिनमध्ये अशाप्रकारे करा समावेश

उन्हाळ्यात आपण प्रत्येकजण कलिंगड खाऊन‍ त्याची सालं फेकून देतोच. पण या सालींचा उपयोग केवळ अनेक खाद्यपदार्थ बनवण्यासाठीच नाही, तर स्किन केअरसाठीही होऊ शकतो. चला तर मग उन्हाळ्यात त्वचेच्या सर्वोत्तम काळजीसाठी कलिंगडाच्या सालींचा वापर कसा करता येईल हे जाणून घेऊयात.

उन्हाळ्यात कलिंगडाची सालं म्हणजे त्वचेसाठी वरदान, तुमच्या स्किन केअर रूटिनमध्ये अशाप्रकारे करा समावेश
कलिंगडाची सालImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Apr 17, 2026 | 4:14 PM
Share

उन्हाळ्यात लोकं कलिंगड या फळांचे भरपूर प्रमाणात सेवन करतात. कारण कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण जास्‍त असते. त्यामुळे लोकं ही कलिंगड जास्त खातात. या फळांच्या सेवनाने आपले शरीर हायड्रेट राहते. मात्र आपण अनेकदा कलिंगड खाऊन त्याची सालं कचऱ्यात फेकून देतो. मात्र या सालींचा उपयोग स्किन केअर खूप फायदेशीर ठरतो. चला तर मग जच्या लेखात आपण जाणून घेऊयात की त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी तुम्ही कलिंगडच्या सालीचा वापर कसा करू शकता.

पोषक तत्वांनी समृद्ध कलिंगड

कलिंगड हे फळं नैसर्गिक साखरेने समृद्ध असूनही कमी कॅलरी असलेले फळ देखील आहे. तसेच कलिंगडामध्ये हायड्रेटिंग गुणधर्म आहेत. कारण त्यात अंदाजे 95% पाणी असते. 100 ग्रॅम कलिंगडा मध्ये अंदाजे 40 ते 45 कॅलरीज असतात. एवढेच नाहीतर यामध्ये 7.55 ते 7.6 ग्रॅम कर्बोदके देखील असतात.

उन्हाळ्यात त्वचेची काळजीसाठी कलिंगडाची सालं फायदेशीर

कलिंगडाची सालीने थेट त्वचेवर हलक्या हाताने मसाज केल्याने सुद्धा त्वचेला आर्द्रता देण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. स्किन केअरसाठी तुम्ही कलिंगडाच्या सालीचा वापर कसा करू शकता ते जाणून घ्या.

सालीने मसाज करा: कलिंगड खाल्ल्यानंतर त्याची साल फेकून देऊ नका. तुम्ही त्या सालीने थेट त्वचेवर हलक्या हाताने मसाज करू शकता. तसेच हे करण्याआधी चेहऱ्यावर पॅच टेस्ट करू पहा. अशा प्रकारे कलिंगडामधील पाणी तुमच्या त्वचेला आर्द्रता देते. त्याचे आर्द्रता देणारे गुणधर्म तुमच्या त्वचेला तीव्र उष्णतेपासून वाचवू शकतात.

कोरफड जेलसोबत कलिंगडाच्‍या सालींचा वापर- कलिंगडाची साल कोरफड जेलमध्य मिक्स करून त्वचेवर लावता येते. कलिंगडाच्या सालीमधला पांढरा भाग एका वाटीत घ्या आणि त्यात कोरफड जेल मिसळा. झोपण्यापूर्वी ही पेस्ट आपल्या हातांना आणि चेहऱ्याला लावा. यामुळे तुमची त्वचा ओलसर राहील आणि नैसर्गिक चमक येईल.

मॉइश्चरायझिंग आईस क्यूब्स – ककलिंगडाच्या सालीमधील पांढरा गर एका भांड्यात काढा. या पांढऱ्या गरामध्ये पाणी टाकून पेस्ट तयार करा. त्यानंतर, त्याचे आईस क्यूब्स तयार करा. अशा प्रकारे तुम्ही मॉइश्चरायझिंग आईस क्यूब्स बनवू शकता. दिवसातून एकदा हे आईस क्यूब्स चेहऱ्यावर चोळा.

कलिंगडाच्या सालीपासून स्क्रबिंग: तुम्ही त्वचेवर इतर स्क्र‍बिंग प्रोडक्ट वापरण्याऐवजी कलिंगडाच्या सालीपासून स्क्रबर तयार करू शकता. यासाठी कलिंगडामधील पांढरा गर काढून त्यामध्ये थोडी कॉफी मिक्स करा. हा स्क्रब तुमच्या चेहऱ्यावर आणि हातांना लावा आणि स्क्रब करा. हे उपाय करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.