माधुरी दीक्षितचे पती डॉ.नेनेंचा जबरदस्त ट्रांसफॉर्मेशन लूक; शरीरातील 16 टक्के चरबी कमी केली
माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांच्या ट्रांसफॉर्मेशन लूकची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांनी केवळ 9 महिन्यात शरीरतील 16 टक्के चरबी कमी केली आहे. त्यांनी त्यांच्या या जबरदस्त जर्नीचा प्रवास सांगितला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पती डॉ. श्रीराम नेने सहसा प्रसिद्धीपासून दूरच असतात, परंतु अलीकडेच ते त्यांच्या फिटनेस प्रवासामुळे चर्चेत आले आहेत. तसं पाहायला गेलं तर डॉक्टर नेने हे नेहमीच त्यांच्या सोशल मीडियावर हेल्थ टीप्स देतच असतात. त्यांचे अनेक व्हिडीओ हे व्हायरलही होत असतात .पेशाने हृदयरोगतज्ज्ञ असलेले डॉ. नेने यांनी भारतात परतण्यापूर्वी अनेक वर्षे अमेरिकेत होते. जरी ते ग्लॅमर जगताचा भाग नसले तरी, फिटनेससाठी त्यांना अनेकजण फॉलो करत असतात.
डॉ. नेने यांची जबरदस्त ट्रांसफॉर्मेशनची जर्नी
डॉ. नेने यांनी अलीकडेच त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या फिटनेस ट्रांसफॉर्मेशनबद्दल सगळी माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यांनी सांगितले की गेल्या वर्षी जेव्हा त्यांनी त्यांची नियमित आरोग्य तपासणी केली तेव्हा रिपोर्टमध्ये त्यांना काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. मेडिकल रिपोर्टनुसार ते निरोगी नव्हते आणि त्याचे वजनही जास्त होते. डॉक्टर असूनही, स्वतःच्या आरोग्याची स्थिती पाहून ते खूप निराश झाले होते. त्यानंतर त्यांनी ही ट्रांसफॉर्मेशनची जर्नी सुरु केल्याचं त्यांनी सांगितलं.
दारू अन् मांसाहाराबद्दल महत्त्वाचे विधान
या ट्रांसफॉर्मेशन जर्नीमध्ये त्यांनी पहिले पाऊल उचलले ते म्हणजे दारूपासून दूर राहणे. डॉ. नेने म्हणाले की त्यांनी दारू पूर्णपणे सोडली आहे आणि त्यांच्या आहारातही मोठे बदल केले आहेत. त्यांनी मांसाहार देखील पूर्णपणे सोडला आहे आणि ते आता शुद्ध शाकाहारी आहार घेतात. त्यांनी सांगितले की हा निर्णय केवळ वजन कमी करण्यासाठी नाही तर एकूणच आरोग्य सुधारण्यासाठी आहे.
View this post on Instagram
9 महिन्यांत 16 टक्क्यांपर्यंत चरबी कमी केली
एका पॅनेल चर्चेदरम्यान, डॉ. नेने यांनी सांगितले की त्यांनी सुमारे 9 ते 10 महिन्यांत 18 किलो वजन कमी केलं आहे आणि त्यांच्या शरीरातील चरबी 16 टक्क्यांपर्यंत कमी केली. या काळात त्यांनी केवळ त्यांच्या खाण्याच्या सवयी सुधारल्या नाहीत तर नियमित व्यायाम, योगासने आणि ध्यान यांचाही त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत समावेश केला. त्यांनी सांगितले की शाकाहारी आहार घेतल्यानंतर त्यांना सुधारित ऊर्जा, मानसिक स्पष्टता आणि चांगली झोप त्यांनी अनुभवली.
एका मुलाखतीत त्यांनी असेही सांगितले की त्यांचे ध्येय फक्त वजन कमी करणे नाही तर दीर्घकाळ टिकवून ठेवू शकणारी शाश्वत आणि निरोगी जीवनशैली स्वीकारणे आहे. डॉ. नेने यांचा हा फिटनेस प्रवास वय, व्यवसाय किंवा परिस्थिती काहीही असो, इच्छाशक्ती असेल तर जीवनात बदल करणे शक्य आहे याचं एक उत्तम उदाहरण आहे.
