दररोज पालकचा रस प्या, ‘ही’ जीवनसत्त्वे मिळवा; निरोगी राहा !

दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असली पाहिजे.

दररोज पालकचा रस प्या, 'ही' जीवनसत्त्वे मिळवा; निरोगी राहा !
पालकाचा रस

मुंबई : दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असली पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर कोरोनाच काय दुसरा कोणताही आजार आपल्याला होऊ शकत नाही. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास नक्की मदत होईल. (Drinking spinach juice is beneficial for a healthy life)

पालक आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप महत्वाची आहे. अनेक डाॅक्टर रूग्णांना आजारपणात पालक खाण्याचा सल्ला देखील देतात. पालकामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फोलेट, व्हिटॅमिन ए, सी, के बी 2, बी, सी आणि ई सारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. सध्याच्या कोरोनाच्या काळात तर आपण पालक जास्त प्रमाणात आपल्या आहारात घेतली पाहिजे. आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी पालकाचा एक ग्लास रस घेतला पाहिजे.

यामुळे मॅग्नेशियम, पोटॅशियम, फोलेट, व्हिटॅमिन याची कमतरता दूर होण्यास मदत होते. शिवाय रिकाम्या पोटी पालकाचा रस घेतल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. पालकचा रस घरी तयार करणे देखील अगदी सोप्पे आहे. यासाठी आपल्याला सात ते आठ पाने पालक लागणार आहे. पालकामध्ये अर्धा ग्लास पाणी घाला आणि पालक बारीक करून घ्या. हा रस लगेचच पिऊन टाका.

वजन कमी करण्यासाठी तसंच आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश आवर्जून करावा. वजन नियंत्रणात आणण्यासाठी भाज्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. हिरव्या भाज्यांच्या सेवनामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो आणि शरीरातील कॅलरीज् देखील कमी होतात. आपल्या दिवसाची सुरुवात हिरव्या पालेभाजीच्या सुपने केली पाहिजे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…

Lipstick shades | तुमच्या चेहऱ्यासाठी लिपस्टिकचा कोणता रंग ठरेल सर्वोत्तम? जाणून घ्या…  

(Drinking spinach juice is beneficial for a healthy life)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI