निरोगी आणि हेल्दी आरोग्यासाठी कोणता चहा प्यावा? वाचा खास माहिती…

जगभरातील बऱ्याच लोकांची सुरुवात एक कप चहाने होते. अनेक लोक दिवसभर चहाचे बरेच कप रिचवतात.

निरोगी आणि हेल्दी आरोग्यासाठी कोणता चहा प्यावा? वाचा खास माहिती...
काढा
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 2:27 PM

मुंबई : जगभरातील बऱ्याच लोकांची सुरुवात एक कप चहाने होते. अनेक लोक दिवसभर चहाचे बरेच कप रिचवतात. भारतातही प्रत्येक भागात आणि अगदी प्रत्येक नाक्यावर, चहा विक्रेते आणि चहाचे शौकीन दोघेही सहज दिसून येतात. बर्‍याच लोकांना बेडवरुण उठल्या उठल्या चहा पिण्याची अर्थात बेड टीची सवय देखील असते. मात्र, नेमके कोणते चहा पिणे हे आपल्या आरोग्यासाठी खरोखरच चांगले आहेत. हे आज आपण बघणार आहोत. (Drinking this tea is beneficial for healthy and wholesome health)

गवती चहा पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. गवती चहामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आहेत. तसचे अँटीफंगल, एंटी-कर्करोग, प्रतिरोधक यासारख्या गुणधर्मही गवती चहामध्ये आढळतात. याशिवाय यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, तांबे, लोह, व्हिटॅमिन ए, फॉलिक अॅसिड, झिंक आणि मॅंगनीज सारख्या पोषक घटक असतात. आरोग्याशी संबंधित बर्‍याच समस्यांवर मात करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

ओलाँग चहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा चहा झोपेच्या वेळी देखील आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न करतो आणि हा आपला नाही तर जपानच्या विद्यापीठाचा दावा आहे. त्सुकुबा विद्यापीठाने संशोधनात हा दावा केला आहे. या चहामध्ये कमी प्रमाणात कॅफिन आढळते आणि यामुळे आपल्या चयापचयात सुधारणा होते. साखरेच्या तुलनेत यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात, जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळते. जर शरीरात रक्ताची कमतरता असेल, तर मग गुळाचा चहा तुमची ही समस्या दूर करेल.

आपल्याला चहा पिण्यास आवडत असल्यास आपल्या नियमित चहाऐवजी ‘लवंग चहा’ पिऊ शकता. हा चहा प्यायल्याने तुमची चयापचय शक्ती वाढेल आणि त्यातील औषधी घटकांमुळे शरीर निरोगी व तंदुरुस्त राहील. एका भांड्यात 2 कप पाणी घाला आणि उकळल्यानंतर त्यात 4 ते 5 लवंगा, दालचिनी आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घाला. सुमारे 15 ते 20 मिनिटे याला उकळी येऊ द्या. त्यानंतर, हा चहा गाळा आणि वर एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळून प्या. हा मसालेदार चहा आपल्या पचनसाठी फायदेशीर आहे. त्यात असलेल्या लवंगा आणि इतर गोष्टी पचन क्रिया सुधारतात.

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

(Drinking this tea is beneficial for healthy and wholesome health)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.