कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी पितायेत?, थांबा अगोदर ‘हे’ वाचा…

उन्हाळ्याचा हंगाम आता सुरू झाला आहे. उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे अतिशय आवश्यक असते.

कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी पितायेत?, थांबा अगोदर 'हे' वाचा...
कलिंगड
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 3:37 PM

मुंबई : उन्हाळ्याचा हंगाम आता सुरू झाला आहे. उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे अतिशय आवश्यक असते. शरीरामध्ये पाण्याची कमी झाल्यानंतर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपण उन्हाळ्यात चांगल्या आहारावर जास्त भर देतो. त्यामध्ये उन्हाळ्यात आपण जास्त करून कलिंगड खाण्यावर भर देतो. कारण कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. जे उन्हाळ्यात शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जातात. मात्र, तुम्हाला हे माहिती काय? की, कलिंगड खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये. (Drinking water after eating watermelon is dangerous for health)

-कलिंगडमध्ये साधारण 92 ते 96 टक्के पाण्याचं प्रमाण असते. यामुळे अगोदरच आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण चांगले असते त्यामुळे कलिंगड खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणे शक्यतो टाळावे.

-पाण्याचे प्रमाण जास्त असणाऱ्या फळांवर पाणी पिल्यास कॉलरा देखील होऊ शकतो. मात्र फळ इंफेक्टेड असेल, तरच असं होऊ शकते.

-फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, म्हणून कुणीही ते खाऊ शकत नाही. किडनीचे रुग्ण, मधुमेहाचे रुग्ण आणि हदयाचा आजार ज्यांना असेल, त्यांनी कलिंगड खाणे शक्यतो टाळावे.

-बऱ्याच लोकांना सवय असते कुढलेही फळ खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायचे. मात्र, कलिंगड खाल्ल्यावर पाणी पिणे टाळलेच पाहिजे.

-उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता असू नये. कारण पाण्याचे प्रमाण कमी होताच आपण आजारी होऊ शकतो. म्हणून शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड हा एक उत्तम पर्याय मानला जातो.

-उन्हाळ्यात स्वत: ला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे फार महत्वाचे आहे. म्हणून, उन्हाळ्यात प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी कलिंगड हा एक चांगला पर्याय आहे. कलिंगडमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते.

-उन्हाळ्यात बाहेर फिरल्यामुळे अनेक लोक आजारी पडतात. यामुळे घराच्या बाहेर जाताना कलिंगड खाल्ले पाहिजे. ज्यामुळे तुमच्या शरीरात ऊर्जा भरपूर वेळ टिकून राहते. काम करताना धकवाही जाणवत नाही.

संबंधित बातम्या : 

(Drinking water after eating watermelon is dangerous for health)

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.