सकाळी उठल्यानंतर रक्तातील साखर वाढते? तर आहारात करा ‘हे’ 3 बदल
सकाळी उठल्याबरोबर रक्तातील साखर वाढण्याची समस्या अनेकांना असते. ही समस्या विशेषतः मधुमेही रुग्णांमध्ये किंवा इन्सुलिन प्रतिरोधक असलेल्या लोकांमध्ये दिसून येते. या समस्येवर नियंत्रण कसे ठेवायचे हे तज्ञांकडून जाणून घेऊया.

रोजच्या धावपळीच्या दिवसांमध्ये अयोग्य आहार, बाहेरचे तळलेले खाद्यपदार्थांचे अती सेवन, पुरेशी झोप न घेणे यामुळे अनेक आजार बळवतात. त्यातील एक म्हणजे मधुमेह आजार हा केवळ वृद्ध व्यक्तीनाच होत नाही तर तरूणांना देखील होत आहे. आपल्यापैकी असे कितीतरी लोकं आहेत जे मधुमेहाच्या आजाराला बळी पडत आहेत. WHO च्या अहवालानुसार भारतात 18 वर्षांवरील 7.7 कोटी लोकं टाइप 2 मधुमेहाने ग्रस्त आहेत. टाइप 2 मधुमेह हे फक्त नियंत्रित केले जाऊ शकते. त्याचबरोबर ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांच्यामध्ये अनेकदा असे दिसून येते की सकाळी उठल्याबरोबर रक्तातील साखर वाढण्याची समस्या खूप भेडसावत असते.
डायबेटिस विषयातील तज्ज्ञ डॉ. अनिता गुप्ता सांगतात की, सकाळी उठल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढणे ही एक सामान्य समस्या आहे, ज्यांना मॉर्निंग हायपरग्लायसेमिया म्हणतात. ही स्थिती विशेषतः मधुमेह किंवा इन्सुलिन प्रतिरोधक असलेल्या लोकांमध्ये दिसून येते. या समस्येचा सामना करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात आणि जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करावे लागतील. चला तर मग जाणून घेऊयात…
सकाळी उठल्यावर पाणी प्या
तज्ञांचे म्हणणे आहे की ज्या लोकांच्या रक्तातील साखर वारंवार वाढते त्यांनी सकाळी उठल्यानंतर एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्यावे. कारण रातभराम शरीर डिहाइड्रेट होते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी प्रभावित होते. त्यात तुम्ही चिमूटभर दालचिनीची पूड टाकून पाणी पिऊ शकता.
फायबरयुक्त आहार
रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी फायबरचे सेवन देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. फायबरयुक्त पदार्थ जसे की भाज्या, फळे, ओट्स आणि संपूर्ण धान्य रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी सकाळी फायबरयुक्त पदार्थ खाणे खूप फायदेशीर ठरेल.
आहारात प्रथिनांचा समावेश करा
सकाळी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रोटीनचे प्रमाण वाढवणे खूप फायदेशीर आहे. प्रथिने शरीरात हळूहळू पचत असल्याने, ते साखरेची पातळी अचानक वाढण्यापासून रोखते. अंडी, कडधान्ये, टोफू, ग्रीक दही आणि काजू यांचे सेवन करा असे तज्ज्ञ सांगतात. संतुलित प्रथिनयुक्त आहारामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
आहारासोबतच रोज हलका व्यायामही करा, असेही तज्ज्ञ सांगतात. दररोज 15-20 मिनिटे चालणे किंवा हलके स्ट्रेचिंग केल्याने रक्त प्रवाह वाढतो आणि स्नायूंना ग्लुकोजचा चांगला वापर करण्यास मदत होते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
