टोमॅटो सॉसपासून ते फ्रेश क्रीमपर्यंत, घरच्या घरी बनवा बाजारात मिळणारे हे 5 पदार्थ
फ्रेश क्रीम असो किंवा टोमॅटो सॉस, या काही गोष्टी आहेत ज्या सहसा घरात वापरल्या जातात. पण बाजारात मिळणाऱ्या या गोष्टींमध्ये कॅमिकलचा धोका असतो. तर मग आम्ही तुम्हाला हे सर्व पदार्थ घरी बनवण्याचा एक सोपा मार्ग सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात.

आजकाल प्रत्येकजण बाजारात मिळणारे पदार्थ आपल्या आहारात समावेश करत असतो. जसे की टोमॅटो सॉस, मेयोनेझ, बटर. आपण प्रत्येकजण या सर्व गोष्टी बाजारातून खरेदी करतो. फ्रिजमध्ये ठेवलेल्या टोमॅटो केचपपासून ते मेयोनेझ, ब्रेडवर पसरलेले बटर आणि अगदी फ्रेश क्रीम सारखे पदार्थ देखील चविष्ट लागतात. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का या पदार्थमध्ये असलेले प्रिझर्व्हेटिव्ह्ज, कृत्रिम रंग आणि केमिकल तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात.
पण अशावेळेस प्रश्न पडतो की आपण हे पदार्थ खाणे बंद करावे का? तर तसे नाहीये… तुम्ही हे पदार्थ घरी अगदी सहज बनवू शकता. हो, या लेखात आम्ही तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेल्या अशा 5 गोष्टी बनवण्याचा सोपा मार्ग सांगत आहोत, ज्या दिसायला आणि चवीला अगदी बाजारातील पदार्थांसारख्याच असतील पण त्यात कोणतेही केमिकल वापरले जाणार नाही. ज्यामुळे तुमच्या आरोग्यालाही नुकसान होणार नाही. चला तर जाणून घेऊयात…
फ्रेश क्रीम कसे बनवाल?
500 ग्रॅम दूध घ्या, ते उकळवा आणि नंतर 2 चमचे व्हिनेगर टाका आणि दूध हळूहळू ढवळत राहा. 10 मिनिटे असेच राहू द्या. काही वेळाने थंड झाल्यावर दुधातुन पाणी वेगळे करा. आता यातील दूध एका ब्लेंडिंग जारमध्ये टाका आणि त्यात 200 ग्रॅम दूध टाकून 50 ग्रॅम बटर आणि अर्धा चमचा साखर मिक्स करा आणि ते ग्रांइड करा. ग्रांइड केल्यानंतर ते एका भांड्यात काढा आणि 30 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. तर बाजारात मिळणारी सेम फ्रेश क्रीम तयार आहे.
View this post on Instagram
मेयोनेझ बनवणे देखील सोपे
घरी बाजारात उपलब्ध असलेले मेयोनेझ बनवण्यासाठी, सर्वप्रथम एका ब्लेंडिंग जारमध्ये 100 ग्रॅम दूध टाका. आता त्यात 15 ग्रॅम व्हिनेगर, 300 ग्रॅम तेल तीन वेळा टप्प्याने मिक्स करा. आता हे सर्व मिश्रण ग्राइंड करा. आता यामध्ये 100 ग्रॅम मीठ टाका आणि पुन्हा ग्राइंड करा. अशा पद्धतीने तुमचे बाजारासारखे मेयोनेझ घरी तयार आहे, तेही अंड्यांशिवाय.
View this post on Instagram
अशा प्रकारे टोमॅटो सॉस तयार करा
घरी टोमॅटो सॉस बनवण्यासाठी, 1 किलो टोमॅटो घेऊन त्याचे समान काप करा. चिरलेल्या टोमॅटोमध्ये 15 ग्रॅम आले, 30 ग्रॅम कांदा, 15 ग्रॅम लसूण टाक आणि मिक्सर जारमध्ये बारीक करा. आता हे मिश्रण 10 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. 10 मिनिटांनी मोठ्या आचेवर शिजवा. त्यानंतर, त्यात 60 ग्रॅम साखर मिक्स करर आणि 2 चमचे लाल तिखट टाका, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा दालचिनी पावडर, 3 चमचे व्हिनेगर टाका आणि नंतर 10 मिनिटे हे मिश्रण शिजवा. यानंतर गॅस बंद करा. आता मिश्रण थंड झाल्यावर चाळणीच्या मदतीने गाळून घ्या. अशा पद्धतीने बाजारात मिळणारा टोमॅटो सॉस घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार आहे.
View this post on Instagram
मार्शमॅलो बनवण्याचा सर्वात सोपा मार्ग
एका पॅनमध्ये 300 ग्रॅम साखर टाका आणि त्यात 600 ग्रॅम पाणी मिक्स करा आणि ते चांगले शिजवा. त्यानंतर या मिश्रणात 10 ग्रॅम जिलेटिन पावडर मिक्स करा (लक्षात ठेवा जिलेटिन पावडर मिक्स करताना आधी एका बाऊल मध्ये पावडर घेऊन पातळ पेस्ट तयार करा आणि मिश्रणात मिक्स करा. ) आणि तुमच्या आवडीचा कोणताही फ्लेवर यात मिक्स करा. आता आंब्याचा हंगाम आहे, म्हणून त्यात 30 ग्रॅम आंब्याचा पप्ल मिक्स करा. हे मिश्रण एका भांड्यात काढा आणि ते फुलून येईपर्यंत फेटा. यानंतर, एक टिन घ्या आणि त्यात मिश्रण ओता आणि वर साखरेचे आयसिंग करा. ते फ्रीजरमध्ये 2 तास ठेवा. मार्शमॅलो तयार आहे.
View this post on Instagram
अशा प्रकारे घरी बटर तयार करा
बाजारासारखे बटर बनवण्यासाठी, प्रथम 300 ग्रॅम शुद्ध तूप घ्या. ते एका भांड्यात ओता आणि त्यात 5-6 बर्फाचे तुकडे मिक्स करा. तूप आणि बर्फ 4-5 मिनिटे चांगले फेटा. त्यानंतर, त्यात चिमूटभर हळद पावडर घाला आणि पुन्हा 3 मिनिटे फेटा. तूप चांगले घट्ट झाल्यावर, बर्फाचे तुकडे काढून टाका. 2 सोप्या स्टेप्सच्या मदतीने बटर तयार आहे.
View this post on Instagram
तर हे काही सोपे मार्ग आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही केमिकलचा वापर न करता घरी बाजारात मिळणारे पदार्थ बनवू शकता. घरी तयार केलेले पदार्थ चवीला चांगले असतील आणि तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचवणार नाहीत.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
