AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care | बाजारातील उत्पादनांपासून अॅलर्जी होतेय? ‘या’ नैसर्गिक घटकांचा वापर करून त्वचेची काळजी घ्या!

काही लोकांची त्वचा इतकी संवेदनशील असते की बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा वापर केल्याने मुरुम, सूज यासारख्या समस्या चेहऱ्यावर दिसू लागतात.

Skin Care | बाजारातील उत्पादनांपासून अॅलर्जी होतेय? ‘या’ नैसर्गिक घटकांचा वापर करून त्वचेची काळजी घ्या!
फेसपॅक
| Updated on: Jan 15, 2021 | 3:33 PM
Share

मुंबई : वयाच्या 35व्या वर्षानंतर, चेहऱ्यावरचे तेज कमी होऊ लागते. चेहऱ्याचे सौंदर्यही या वयात कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत आपले सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी बर्‍याच स्त्रिया बाजारात विकल्या जाणाऱ्या उत्पादनांचा वापर करण्यास सुरुवात करतात. तसेच वेळोवेळी पार्लरमध्ये जाऊन फेशिअल वगैरे करतात. परंतु काही लोकांची त्वचा इतकी संवेदनशील असते की बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा वापर केल्याने मुरुम, सूज यासारख्या समस्या चेहऱ्यावर दिसू लागतात. अशा परिस्थितीत पार्लरमध्ये जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा लोकांसाठी, होम फेशिअल पद्धती महत्त्वपूर्ण ठरते. या फेशिअलमुळे त्वचेला कोणतीही हानी होत आणि त्वचा देखील चमकदार होते (Easy home facial tips for glowing skin).

होम फेशिअलची पद्धत :

क्लीन्जिंग : चेहऱ्यावरील धूळ, माती आणि घाण स्वच्छ करण्यासाठी प्रथम क्लीन्जिंग केले जाते. यासाठी आपण हायड्रेटिंग क्लीन्सरची निवड करा. हार्ड क्लीन्सरचा उपयोग अजिबात करू नका.

स्क्रबिंग : फेशिअलची दुसरी पायरी स्क्रबिंग आहे. यामध्ये चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकली जाते. याला एक्सफोलिएशन असेही म्हणतात. मध, साखर आणि थोडे मीठ एकत्र करून त्याची पेस्ट बनवा आणि तीन ते चार मिनिटे चेहऱ्यावर लावा. हलक्या हातांनी चेहऱ्यावर मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

टोनिंग : गुलाबाच्या पाण्याने देखील टोनिंग केले जाते. परंतु, चांगल्या टोनिंगसाठी तांदळाच्या पाण्याचा बर्फ तयार करून त्याचा वापर करा. स्क्रब केल्यावर ते चेहऱ्यावर चांगला मसाज करा. यामुळे मोकळे पोर्स बंद होतात (Easy home facial tips for glowing skin).

मसाज : फेशिअलची चौथा पायरी म्हणजे फेस मसाज, ज्याची या प्रक्रियेत सर्वात मोठी भूमिका आहे. यासाठी नैसर्गिक कोरफड जेल वापरा. सुमारे 10 ते 15 मिनिटे या जेलने चेहऱ्यावर मसाज करा. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

फेस पॅक : फेसपॅक चेहऱ्याला सर्वात शेवटी लावला जातो. त्यासाठी मसूर डाळ रात्री भिजवा. सकाळी त्यात थोडे दूध मिसळून जाडसर पेस्ट बनवा. दोन थेंब लिंबूसर घालून ही पेस्ट चेहऱ्याला लावा. याशिवाय आपण बेसन पिठामध्ये  चिमूटभर हळद, मध आणि मलई घालून देखील फेस पॅक बनवू शकता. जर चेहरा तेलकट असेल तर मलईऐवजी दुधाचा वापर करा.

हे लक्षात ठेवा :

– फेस पॅक नंतर त्वचेला व्यवस्थित मॉइश्चराइझ करा.

– तीन ते चार दिवस फेस वॉश वापरू नका.

– हेवी मेकअप करणे टाळा.

– शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ देऊ नका.

(Easy home facial tips for glowing skin)

हेही वाचा :

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.