AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवा फेसशीट मास्क, लावताच चेहरा दिसेल चमकदार

धूळ आणि सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. या समस्या दूर करण्यासाठी फेस मास्क आणि शीट मास्कचा वापर केला जातो. जर तुम्हाला बाजारात मिळणाऱ्या फेसशीट मास्कचा वापर करायचा नसेल तर या सोप्या पद्धतीने घरीच फेसशीट मास्क बनवू शकता. आता फेसशीट मास्क कसे बनवायचे ते जाणून घेऊयात.

'या' सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवा फेसशीट मास्क, लावताच चेहरा दिसेल चमकदार
face sheet maskImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jul 18, 2025 | 3:32 PM
Share

आजकाल महिला त्यांच्या त्वचेला त्वरित चमक मिळावी अनेक प्रोडक्ट वापरत असतात. तर चेहरा चमकदार बनवण्यासाठी महागडे फेस शीट मास्क वापरत असतात. बाजारात तुम्हाला त्वचा चमकदार करण्यासाठीचे फेस शीट मास्क अनेक फ्लेवर्समध्ये मिळतील, जे त्वचेला उजळवण्यासोबतच चमकदार देखील बनवतात. तसेच, हे वापरल्याने त्वचा हायड्रेट राहते. महिला त्यांच्या त्वचेनुसार हे शीट मास्क वापरत आहेत.

बरं, बाजारात तुम्हाला अनेक प्रकाराचे आणि प्रत्येक स्किन टोननुसार शीट मास्क मिळतील. पण जर तुम्ही ते घरी बनवू शकलात तर? हे ऐकून तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल, पण तुम्ही घरी शीट मास्क बनवू शकता. या लेखात आम्ही तुम्हाला काही घरगुती गोष्टींच्या साहाय्याने फेस शीट मास्क कसा बनवायचा ते सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या त्वचेला त्वरित चमक येईल.

या गोष्टींनी घरी बनवा शीट मास्क

राईज वॉटर शीट मास्क

तांदळाचे पाणी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. ते त्वचेला उजळवते आणि नैसर्गिक चमक देखील देते. तांदळाच्या पाण्याने शीट मास्क बनवून तुम्ही निरोगी त्वचा मिळवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त अर्धा कप तांदूळ रात्रभर पाण्यात भिजवावे लागतील. सकाळी हे पाणी एका भांड्यात काढा. नंतर तांदळाच्या पाण्यात मलमलचा कापड टाका आणि फ्रीजमध्ये ठेवा. अर्ध्या तासानंतर, मलमलच्या कापडापासून बनवलेला शीट मास्क स्वच्छ चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी कापड काढून चेहरा मसाज करा आणि नंतर पाण्याने धुवा.

कोरफड जेल शीट मास्क बनवा

कोरफडीमुळे त्वचेला अनेक फायदे होतात. तर कोरफड जेलचा शीट मास्क बनवण्यासाठी, ताजे कोरफड जेल काढून एका भांड्यात ठेवा. त्यानंतर त्यात कलिंगडाचा रस मिक्स करा आणि काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजमधून काढल्यानंतर, त्यात मलमलचा कापड भिजवा आणि नंतर चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा व 20मिनिटे चेहऱ्यावर लावा. शीट मास्क काढल्यानंतर, तुम्हाला स्वतःला फरक दिसेल.

काकडीचा शीट मास्क

काकडी खाणे आणि ती चेहऱ्यावर लावणे दोन्ही फायदेशीर आहे. यासाठी तुम्ही काकडीच्या रसाचा फेसशीट मास्क देखील बनवू शकता. यासाठी तुम्हाला एक काकडी लागेल, ती किसून घ्या आणि त्याचा सर्व रस काढा. यानंतर त्यात गुलाबपाणी मिक्स करा आणि मलमलच्या कापड त्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर, 2-3 मिनिटांनी ते तुमच्या स्वच्छ चेहऱ्यावर लावा. हायड्रेशनसोबतच ते त्वचेला त्वरित चमकदार बनवेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.