Desi Ghee Benefits : गैरसमज दूर करा, तुपामुळे वजन वाढत नाहीतर कमी होते

वजन कमी व्हावे (weight loss), असे आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असते. जेव्हा वजन कमी करण्याचा विचार केला जातो

Desi Ghee Benefits : गैरसमज दूर करा, तुपामुळे वजन वाढत नाहीतर कमी होते

मुंबई : वजन कमी व्हावे (weight loss), असे आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असते. जेव्हा वजन कमी करण्याचा विचार केला जातो, तेव्हा अनेकदा हेवी वर्कआउट्स आणि डाएटिंगचा सल्ला दिला जातो. परंतु, यामुळे आपल्याला स्लिम-ट्रिम बॉडी मिळेलच, असे नाही आणि हे करणे प्रत्येकालाच शक्य होईल असे देखील नाहीये. तसेच वजन कमी करण्यासाठी आपण आहारामध्ये अनेक पदार्थ खाणे देखील टाळतो यामध्ये सर्वात अगोदर तूप खाणे बंद करतो. (Eating ghee leads to weight loss)

कारण अनेकांचा असा समज आहे की, तूप खाल्ल्याने आपले वजन काढते. मात्र, खरोखरच तूप खाल्ल्याने वजन वाढते का हे आज आपण पाहणार आहोत. तज्ज्ञ म्हणतात की, तूप ओमेगा-3 फॅट आणि ओमेगा-6 फॅटने समृद्ध आहे आणि आपले वजन कमी करण्यासाठी हे घटक खूप चांगले ठरू शकतात. याव्यतिरिक्त, तूपातील ओमेगा-3 फॅटी अॅसिडस् आपल्या शरीरातील काही ‘इंच’ कमी करण्यात मदत करतात, जे आपल्या शरीराचे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

तूप डोकोसॅक्सिनोइक अॅसिडचा चांगला स्रोत आहे. डोकोसॅक्सिनोइक अॅसिड सर्वात लोकप्रिय ओमेगा-3 फॅटी अॅसिड आहे. ओमेगा 3 फॅटी अॅसिड ही आवश्यक चरबी आहेत, ज्याचे आपण आपल्या आहारात सेवन करणे आवश्यक आहे. हे अॅसिड आपले शरीर स्वतःहून तयार करू शकत नाही. डोकोसॅक्सिनोइक अॅसिडचा खास करून कर्करोग, हृदयविकाराचा झटका, मधुमेह, सांधेदुखीसारख्या समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. आयुर्वेदानुसार तुमचे आयुष्य वाढवण्यासाठी तूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि तुमच्या शरीरास अनेक रोगांपासून वाचवते.

तूपाचे असे बरेच महत्त्वपूर्ण फायदे आहेत, परंतु आपल्याला माहित आहे का की, तूप सौंदर्य वाढवण्यासाठी देखील वापरले जाते. केसांच्या आरोग्यासाठी तूप अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते. आपल्या स्काल्पला तुपाने मालिश केल्याने, ते आपल्या स्काल्पला नैसर्गिक ओलावा देते आणि केसांच्या मुळांना बळकट करते. तूप वापरल्याने केस गळती देखील थांबेल. तूप आपले केस चमकदार देखील बनवते आणि त्याशिवाय तुपाचे इतरही बरेच फायदे आहेत, जे आपल्याला कदाचित माहितही नसतील…

संबंधित बातम्या : 

(Eating ghee leads to weight loss)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI