घोसाळ्याची भाजी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे

घोसाळीच्या भाजी विषयी आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पचण्यासाठी अत्यंत चांगली असून घोसाळीची भाजी करण्यासाठी वेळसुद्धा खूप कमी लागतो.

घोसाळ्याची भाजी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे

मुंबई : घोसाळीच्या भाजी विषयी आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पचण्यासाठी अत्यंत चांगली असून घोसाळीची भाजी करण्यासाठी वेळसुद्धा खूप कमी लागतो. घोसाळी ब्लड प्युरिफायर आहेत. हे शरीरातील विषारी घटक बाहेर काढतात. यामुळे आपली त्वचा तजेलदार दिसते. घोसाळीच्या भाजीमध्ये आयर्न, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन्स अ‍ॅनिमिया, ब्लडप्रेशर आणि ब्रेन फंक्शन व्यवस्थित ठेवण्यास मदत करतात. चला तर मग जाणून घेऊयात घोसाळीची भाजी खाण्याचे फायदे…(Eating sponge gourd is good for health)

-घोसाळी हे मुतखड्यावर गुणकारी आहे. ज्या लोकांना मुतखड्याचा त्रास होतो त्यांना डाॅक्टर घोसाळी खाण्याचा सल्ला नेहमी देतात.

-तुम्हाला घोसाळीची भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही घोसाळीची भजी देखील करू शकता. हे भजी खाण्यासाठी चवदार लागतात.

-घोसाळी खाल्ल्याने पोटाचा घेर देखील कमी होण्यास मदत होते. जर दररोज सकाळी तुम्ही घोसाळीचा रस प्यायला तर तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.

-घोसाळीच्या भाजीचे सेवन केल्याने आपले पोट साफ होण्यास मदत होते.

-घोसाळीचा भाजी खाल्ल्याने थकवा दूर होण्यास मदत होते.

-यामध्ये अ‍ॅन्टी इम्पलीमेंटरी गुण असतात. ज्यामुळे मसल्स मजबूत होतात. तसेच अर्थरायटीसमध्ये गुणकारी आहे.

-कफ झाल्यास घोसाळ्याचा रस प्यावा. त्यामुळे उलटी होऊन कफ बाहेर पडतो.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

(Eating sponge gourd is good for health)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI