कलिंगड खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहे का? वाचा

उन्हाळ्याचा हंगाम आता सुरू झाला आहे. उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणे अतिशय आवश्यक असते.

कलिंगड खाण्याचे 'हे' जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहे का? वाचा
कलिंगड

मुंबई : उन्हाळ्याचा हंगाम आता सुरू झाला आहे. उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणे अतिशय आवश्यक असते. शरीरामध्ये पाण्याची कमी झाल्यानंतर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपण उन्हाळ्यात चांगल्या आहारावर जास्त भर देतो. मात्र, त्याचबरोबर उन्हाळ्यात अजून एक फळ जास्त प्रमाणात खाल्ले पाहिजे ते म्हणजे कलिंगड खाण्याचे देखील अनेक फायदे आहेत. (Eating watermelon is good for health)

-कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. जे उन्हाळ्यात शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जातात. यामुळे कलिंगड खाल्ल्यानंतर मन शांत राहते आणि शरीराला उर्जाही मिळते. म्हणून उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचा सल्ला डाॅक्टर देतात.

-कलिंगड नियमीत खाल्लावर शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते. ज्यामुळे आपल्याला हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

-उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता असू नये. कारण पाण्याचे प्रमाण कमी होताच आपण आजारी होऊ शकतो. म्हणून शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड हा एक उत्तम पर्याय मानला जातो. कलिंगड पोट थंड ठेवते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत नाही.

-बद्धकोष्ठता आणि गॅस ही एक मोठी समस्या बनली आहे जवळजवळ प्रत्येक माणूस यामुळे त्रस्त आहे. परंतु कलिंगडचे खाल्लाने केल्याने गॅस आणि बद्धकोष्ठतापासून मुक्तता मिळू शकते. कारण कलिंगड खाण्याने तुमचे पोट स्वच्छ राहते, यामुळे पाचन तंत्रही ठीक राहते आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

-उन्हाळ्यात स्वत: ला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे फार महत्वाचे आहे. म्हणून, उन्हाळ्यात प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी कलिंगड हा एक चांगला पर्याय आहे. कलिंगडमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते.

-उन्हाळ्यात बाहेर फिरल्यामुळे अनेक लोक आजारी पडतात. यामुळे घराच्या बाहेर जाताना कलिंगड खाल्ले पाहिजे. ज्यामुळे तुमच्या शरीरात ऊर्जा भरपूर वेळ टिकून राहते. काम करताना धकवाही जाणवत नाही.

संबंधित बातम्या : 

High Blood Pressure | केवळ मीठच नव्हे, उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी चुकनही खाऊ नयेत ‘या’ गोष्टी!

Fitness | जिममध्ये घाम गाळूनही ‘बॉडी’ बनत नाहीय? मग ‘या’ सोप्या टिप्स नक्की ट्राय करा!

(Eating watermelon is good for health)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI