काही क्षणातच साफ होईल फ्रिजवरचे चिवट डाग आणि निघून जाईल कुबट वास फक्त ‘या’ एका गोष्टीने करा स्वच्छ
प्रत्येक घरात फ्रिजचा वापर केला जातो. अनेक पदार्थ जास्त दिवस टिकून राहण्यासाठी आपण त्यात ठेवतो. परिणामी बऱ्याच दिवसानंतर पदार्थ खराब होतात आणि त्यातून कुबट वास येऊ लागतो. तसेच फ्रिजमधील काचेवरही चिवट डाग पडतात. अशातच तुमचा फ्रिज पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी काही सोप्या आणि प्रभावी ट्रिक्स आजच्या लेखात जाणून घेऊयात.

स्वंयपाकघरात रोजच्या वापरण्याची वस्तू म्हणजे आपलं फ्रिज. आता तर उन्हाळा सुरु झाला आहे, त्यामुळे फ्रिजचा वापर जास्त वाढतो. फ्रिज ही उपयोगाची वस्तू असल्याने त्यात आपण रोजच्या गरजेच्या तसेच अनेक पदार्थ ठेवत असतो. अशातच बाहेरून अनेकदा फ्रिज स्वच्छ दिसतो. पण फ्रिजच्या आतल्या कोपऱ्यांमध्ये साचलेली घाण, डाग आणि दुर्गंधी आपल्या नजरेआड राहते. रोजच्या धावपळीमुळे आपण फ्रिज पूर्णपणे स्वच्छ करू शकत नाही, ज्यामुळे जिवाणूंच्या वाढीचा धोका वाढतो. बऱ्याच वेळा, अन्नाचा वास एकत्र होऊन एक विचित्र वास तयार होतो, जो फ्रिजमध्ये ठेवलेल्या सर्व वस्तूं व पदार्थांमध्ये पसरतो.
अशावेळेस फ्रिज साफ करणे म्हणजे तासंतास त्यात जातो. मात्र आजच्या लेखात आपण अशा काही सोप्या ट्रिक्स जाणून घेणार आहोत ज्याच्या मदतीने अगदी काही क्षणातच तुम्ही फ्रिज स्वच्छ करु शकता. चला तर मग आजच्या लेखात आपण या काही घरगुती सोप्या टिप्स जाणून घेऊयात.
या एका गोष्टीने काही मिनिटांतच फ्रिज होईल स्वच्छ
फ्रिज साफ करण्यासाठी पांढरा व्हिनेगर सर्वात उत्तम आहे. पांढरा व्हिनेगरच्या मदतीने फ्रिज स्वच्छ करणे खूप प्रभावी मानले जाते. कारण यामध्ये नैसर्गिक जिवाणूनाशक आणि बुरशीनाशक गुणधर्म फ्रिजमधील घाण, तेलकटपणा आणि खराब जिवाणू सहजपणे नाहीसे करतात. व्हिनेगर फ्रिजमधील केवळ चिवट डागच स्वच्छ करत नाही, तर दुर्गंधीही त्वरित नाहीशी करतो, ज्यामुळे फ्रिज आतून फ्रेश राहतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यात कोणतेही हानिकारक केमिकल नसतात, ज्यामुळे यापासून फ्रिज साफ केल्याने ते अन्न आणि पेयांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. नियमित वापरामुळे फ्रिज दीर्घकाळ स्वच्छ आणि चमकदार राहतो. तुम्हाला फक्त थोडे व्हिनेगर पाण्यात मिक्स करुन कापडाने किंवा स्पंजने प्रत्येक कोपरा स्वच्छ करायचा आहे.
फ्रिज स्वच्छ करण्याचे इतर घरगुती सोपे उपाय
बेकिंग सोड्याने खोलवर स्वच्छता – तुमचा फ्रिज स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा हा एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय आहे. बेकिंग सोड्यात पाणी मिक्स करुन त्याची पेस्ट बनवा आणि हळुवारपणे फ्रिजच्या शेल्फ्स व कोपऱ्यांवर लावा. यामुळे चिवट डाग आणि दुर्गंधी दूर होते, ज्यामुळे तुमचा फ्रिज आतून ताजेतवाने वाटतो.
लिंबाने दुर्गंधी दूर करा – फ्रिजमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी लिंबाचा वापर खूप फायदेशीर ठरतो. एका वाटीत लिंबाचा रस किंवा लिंबाच्या चकत्या फ्रिजमध्ये ठेवा. हे नैसर्गिक दुर्गंधीनाशक म्हणून काम करते आणि फ्रिज आतून फ्रेश राहते.
पावाच्या तुकड्याने दुर्गंधी शोषून घ्या – फ्रिजमध्ये पावाचा तुकडा ठेवल्याने आर्द्रता आणि दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. पाव हवेतील दुर्गंधी शोषून घेतो, ज्यामुळे फ्रिज जास्त काळ ताजे राहते. सर्वोत्तम परिणामांसाठी दर 12 ददिवसांनी पावाचा तुकडा बदला. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
