‘व्हॅलेंटाइन डे’चं नियोजन करताय..? मग ‘या’ गोष्टी करा, नाहीतर होईल पश्‍चाताप…

‘व्हॅलेंटाइन डे’चे नियोजन करताना आपण नेहमी पहिल्यांदा आपल्या ‘लूक’कडे लक्ष देत असतो. या खास दिवसाला अजूनच खास करण्यासाठी आदल्या महिन्यापासून नियोजन सुरू असते. परंतु आज आम्ही अशा काही टीप्स्‌ देणार आहोत ज्यामुळे तुमचा हा दिवस तुमच्या नेहमी स्मरणात राहील...

‘व्हॅलेंटाइन डे’चं नियोजन करताय..? मग 'या' गोष्टी करा, नाहीतर होईल पश्‍चाताप...
एकदा ‘आय लव्ह यू’ बोलणे हा मुलीचा अपमान नाही
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 12:02 PM

फेब्रुवारी महिना लागला की सर्वांनाच वेध लागतात. ते ‘व्हॅलेंटाइन डे’(Valentine day) चे. हा दिवस आठवणीत ठेवण्यासाठी सर्वकाही प्रयत्न केले जातात. ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त विशेष खरेदी करून आपआपल्या ब्रँडनुसार कपड्यांची खरेदी, चांगल्या आउटफीटसाठी (Outfits) लागणारे सर्व साहित्यांची खरेदी केली जात असते.‘व्हॅलेंटाइन डे’ला कुठले कपडे घालायचे यापासून तर डेटवर कुठे जायचं इथपर्यंत सर्व नियोजन आधीच केले जाते. आठवड्यापूर्वीपासून सुरू होत असलेल्या विविध ‘डे’बद्दलही प्रचंड आकर्षण व उत्सूकता निर्माण झालेली असते. परंतु अनेक वेळा जस-जसा ‘व्हॅलेंटाइन डे’जवळ येतो तस काहीस नर्वस झाल्यासारखही अनेकांना वाटत असत. ‘व्हॅलेंटाइन डे’ला आपण आपल्या जोडीदाराला शोभून दिसू की नाही, आपण परिधान केलेला ड्रेस (Dress) आपल्यावर कसा दिसेल, आपला लूक जोडीदाराच्या मनाला भावेल की नाही अशा अनेक शंकाची मनात घालमेल सुरू असते. त्यामुळे या ‘स्पेशल’ दिवसाला संस्मरणीय करण्यासाठी खालील गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचं ठरेल.

1) ब्रँडला विसरा

अनेक जण आपल्या ठराविक ब्रँडच्या व्यतिरिक्त कपडे घालत नाही. परंतु ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त आपण ब्रँडला विसरून त्याऐवजी आपल्याला जे सोयीस्कर असेल असेच कपडे घालण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. अनेक वेळा ब्रँडचे कपडे आपल्या शरीराला सूट होतील असे नसतात. मग अवघडल्यासारखं होतं. त्यामुळे ब्रँडला बळी न पडता आपल्याला शोभेल अशीच कपड्यांची निवड करणं चांगलं.

2) न्यूनगंड बाजूला ठेवा

आपण घातलेल्या कपड्यांमध्ये आपण कसे दिसू, आपल्यावर कुणी हसणार तर नाही ना, आपली टिंगल होणार नाही ना, असे अनेक न्यूनगंड आपल्या मनात असतात. परंतु कपड्यांची निवड करतानाच ती योग्य केल्यास ही समस्या राहणार नाही. कपडे शरीराला शोभेल असे घातल्यास आपल्यातील आत्मविश्‍वासही वाढतो.

3) रंगानुसार निवडा फॅब्रिक

कधीही जास्त भडक रंगाचे कपडे आपली शोभा बिघडवण्याचं काम करीत असतात. त्यामुळे अशा भडक रंगांपासून लांब राहा. आपल्या रंगाला शोभतील अशाच रंगाचे कपडे घालण्यास प्राधान्य दिले पाहिजं. जेणेकरून आपण अधिक उठावदार दिसू. भडक रंगामुळे आपला लूक खराब होऊ शकते.

4) ही काळजी जरूर घ्या

‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी ग्राफिक टी-शर्टसह कार्गो शॉर्ट्स आणि सँडल इत्यादी घालू नका. साधे जीन्स टी-शर्ट आणि जॅकेटचा वापर करूनही तुम्ही खास दिसू शकता. जास्त डिझाइन असलेले कपडे तुमच्यापेक्षा त्यावरच जास्त लक्ष केंद्रीत करु शकते. त्यामुळे या खास दिवशी तुमचा प्रभाव कमी पडतो.

5) ‘लूक’कडे विशेष लक्ष

‘व्हॅलेंटाईन डे’ला जात असताना कपड्यांसोबत आपल्यया स्वत:च्या लूककडेही लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आपला लूक जोडीदाराला आवडेल यासाठी नीटनेटके कापलेले केस, दाढी आणि मिशा इत्यादींवरही विशेष लक्ष दिलं पाहिजे. नेहमी राहतो त्याच पद्धतीनं आपला लूक ठेवा त्यात जास्त प्रयोग करणं टाळा.

Bathing Tips : अंघोळ करताना या चुका टाळा, तुमच्या आरोग्यासाठी ठरु शकते हानिकारक

Super Seeds For Skin : सौंदर्याचा खजिना आहेत या 5 बिया, आहारात नक्की करा समावेश

Travel Ideas : शिमलामध्ये फिरण्यासाठी जात आहात? मग ‘ही’ खास बातमी वाचाच!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.