वर्किंग वुमन्सने फॉलो कराव्यात या टिप्स, कामाच्या ठिकाणी तुमच्या स्टाईलचे होईल कौतुक
स्टायलिश दिसणे म्हणजे केवळ फॅशन ट्रेंडचे फॉलो करणे नाही तर प्रत्येक ठिकाण, व्यवसाय आणि ऋतूनुसार स्वतःला जुळवून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. स्टायलिश आणि क्लासी लूक दिसण्यासाठी वर्किंग वुमन या स्टायलिंग टिप्स फॉलो करू शकतात.

बदलत्या काळानुसार प्रत्येक स्त्रीला फॅशनेबल दिसायचे असते, त्यासाठी प्रत्येक महिला या स्टायलिश ड्रेस आणि मेकअपची मदत घेत असतात. पण उन्हाळ्यात ऑफिसला जाताना आणि येतानाही मेकअप खराब होऊ लागतो. त्यामुळे, वर्किंग महिलांनी प्रत्येक प्रकारच्या ड्रेसमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जर तुम्ही सर्वात महागडे कपडे आणि शूज घातले असतील, पण त्यांना योग्यरित्या स्टाईल केले नसेल, तर यामुळे तुम्ही चांगले दिसणार नाही.
प्रोफेशनल अपीअरेंसला मेंटेन करणे खूप महत्वाचे असते. तुमची शैली आणि पेहराव देखील तुमचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित करते. जर तुम्हाला ऑफिसमध्ये साध्या पोशाखात स्टायलिश दिसायचे असेल, तर ऑफिसची तयारी करताना तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
स्मार्ट आणि साधे कपडे घाला
कामाच्या ठिकाणी नेहमी प्रोफेशनल आणि आरामदायी कपडे निवडा. उन्हाळ्यासाठी कॉटन, तागाचे किंवा खादीसारखे कापड परिपूर्ण असतात. महिलांसाठी उन्हाळ्यात ऑफिससाठी ट्राउझर्स आणि साधा सूट असलेला टॉप किंवा शर्ट हा एक चांगला पर्याय असेल. रंगाबद्दल बोलायचे झाले तर, राखाडी, बेज, ऑफ-व्हाइट, निळा इत्यादी पेस्टल शेड्स ऑफिससाठी चांगले असतात. कामाच्या ठिकाणी आणि उन्हाळ्यात खूप चमकदार रंग आणि हेवी वर्क असलेले कपडे योग्य दिसणार नाहीत.
फुटवेअरचीही काळजी घ्या
घरापासून ऑफिसपर्यंत प्रवास करणे आणि तिथे बराच वेळ तेच फुटवेअर घालून ठेवावे लागते. म्हणून, फुटवेअर अशी असावीत की ती स्टायलिश आणि आरामदायी देखील असतील. बेली फ्लॅट्स, लो-हिल्ड पंप्स किंवा स्मार्ट सँडल हे एक चांगले पर्याय असू शकतात. याशिवाय, लक्षात ठेवा की उन्हाळ्यात तुमचे फुटवेअर असे असावेत की ते घालताना तुम्हाला घाम येणार नाही, कारण पायांना घाम आल्याने समस्या निर्माण होऊ शकतात.
अॅक्सेसरीज कमीत कमी ठेवा
अॅक्सेसरीज आपला लूक पूर्ण करण्यासाठी काम करतात. पण कामाच्या ठिकाणी कमीत कमी दागिने आणि अॅक्सेसरीज निवडा. ऑफिसमध्ये घालण्यासाठी हलके कानातले, साधे घड्याळ किंवा पातळ चैन योग्य ठरेल. तुम्ही कुर्ती किंवा सूटसोबत लाइट वेट ऑक्सिडाइज्ड दागिने देखील वापरून पाहू शकता. पण कामाच्या ठिकाणी जड कानातले किंवा कोणत्याही प्रकारचे दागिने घालणे हे ओवर ड्रेसिंग मानले जाऊ शकते. यासोबतच, बॅग अशी असावी की ती लेदर टाईप बॅग किंवा बॅकपॅकसारखा प्रोफेशनल लूक देईल.
हेअरस्टाईल आणि मेकअप
तुमची हेअरस्टाईल क्लीन आणि व्यवस्थित ठेवा. प्रोफेशनल लूकसाठी पोनीटेल, बन किंवा सरळ केस परफेक्ट आहेत. हलके फाउंडेशन, न्यूड लिपस्टिक आणि काजळ किंवा मस्कराने तुमचा मेकअप कमीत कमी ठेवा. उन्हाळ्यासाठी हलका मेकअप देखील परफेक्ट राहील. तसेच तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार मेकअप प्रॉडक्ट निवडा. ऑफिससाठी ग्लॅमरस किंवा पार्टी लूक टाळा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
