AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इडली-डोसा खाण्याचा आला कंटाळा ? ‘हे’ पदार्थ नक्की करा ट्राय

इडली आणि डोसा तेच तेच खाण्याचा तुम्हालाही कंटाळा आला आहे का? दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये आणखी काय ट्राय करावे याबद्दल तुम्ही गोंधळलेले आहात का? तर आज या लेखात आम्ही तुम्हाला काही निरोगी आणि चविष्ट नाश्त्याच्या पर्यायांबद्दल सांगणार आहोत जे बनवायला खूप सोपे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात...

इडली-डोसा खाण्याचा आला कंटाळा ?  'हे' पदार्थ नक्की करा ट्राय
| Edited By: | Updated on: Jun 12, 2025 | 4:26 PM
Share

दक्षिण भारतीय पाककृतींमध्ये सर्वात जास्त खाल्ला जाणारा इडली-डोसा आज भारताच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध आहे तसेच प्रसिद्ध देखील आहे. विशेष म्हणजे हे पदार्थ खूप आरोग्यदायी आणि चविष्ट देखील आहेत. परंतु दक्षिण भारतीय अन्नात फक्त इडली-डोसाच खाणे आवश्यक नाही. येथे असे अनेक खाद्यपदार्थांचे पर्याय आहेत ज्यांची चव खुप छान आहे. याशिवाय, तुम्ही नाश्त्यासाठी तुमच्या आहारात अनेक आरोग्यदायी पर्याय समाविष्ट करू शकता. दक्षिण भारतीय पाककृतींबद्दल एक खास गोष्ट म्हणजे अन्न तळण्याऐवजी ते वाफवले जाते, ज्यामुळे ते आरोग्यदायी पर्याय म्हणून समाविष्ट केले जाऊ शकते.

केरळमध्ये असे अनेक प्रसिद्ध पदार्थ आहेत. तर या बहुतेक पदार्थांमध्ये मसूर, भात, केळी किंवा पपईचा वापर केला जातो. त्यामुळे ही पदार्थ आरोग्यदायी असतात आणि पचायलाही सोप्या असतात. पण आज आपण पारंपारिक डोस्याऐवजी काही अनोख्या आणि चविष्ट पदार्थांबद्दल बोलणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या रेसिपीज.

5 प्रकारचे दक्षिण भारतीय पदार्थ

रवा उपमा

रवा उपमा हा एक आरोग्यदायी आणि चविष्ट नाश्ता आहे. तर हा रवा उपमा बनवण्यासाठी तुम्हाला रवा, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, हिरवी मिरची बारी‍क चिरून घ्या. त्यानंतर एका भांड्यात दही आणि रवा मिक्स करून एक तास तसेच जाकुन ठेवा. त्यानंतर रवा दह्यात चांगला मिक्स झाल्यावर त्यात मीठ आणि मसाले व बारिक चिरलेले सर्व भाज्या त्यात टाका. नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्यात तयार रव्याचे मिश्रण टाका आणि दोन्ही बाजूंनी तळा. तुम्ही ते सांबार, टोमॅटो चटणी किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.

गव्हाचा डोसा चवीला अप्रतिम 

गव्हाचा डोसा तुमच्या नाश्त्यासाठी एक आरोग्यदायी पर्याय असू शकतो. तर हा गव्हाचा डोसा बनवण्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये थोडे पाणी मिक्स करा. नंतर त्यात कांदा, हिरवी मिरची, आले किसून टाका आणि नंतर ते पीठ तव्यावर गोलाकार पद्धतीने डोसा बनवतात त्याच प्रमाणे बनवा, ही एक सोपी आणि झटपट नाश्ता रेसिपी आहे.

वेन पोंगल

ही डिश भात आणि मूग डाळीपासून बनवली जाते. ती बनवण्यासाठी, भात आणि पिवळी मूग डाळ तुपात तळा. नंतर त्यात काळी मिरी, आले आणि कढीपत्ता टाकून मिक्स करा. हा एक अतिशय पौष्टिक नाश्ता आहे जो शरीरात ऊर्जा वाढवण्यास मदत करतो.

चविष्ट अप्पम

अप्पम बनवण्यासाठी आंबवलेल्या तांदळाच्या पिठामध्ये नारळाचे दूध मिक्स करा. नंतर त्यात मीठ टाकूल मिश्रण तयार करा आणि ते पॅनमध्ये गोलाकार पद्धतीने टाकून दोन्ही बाजूने नीट शिजवा. लक्षात ठेवा की त्याचा मधला भाग मऊ असेल तर कडा कुरकुरीत असतील. ते शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

पुट्टू  

पुट्टू हा केरळमधील प्रसिद्ध नाश्त्यांपैकी एक आहे. तो तांदूळ आणि गव्हाच्या पिठापासून बनवला जातो. त्यात नारळ टाकून वाफेवर शिजवले जाते. तुम्ही ते चणा किंवा केळीच्या भाजीसोबत खाऊ शकता. तसेच हा पुट्टू पदार्थ तुम्ही नाचणी आणि बाजरीच्या पिठापासून देखील बनवू शकता.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.