लिची 3 दिवसांपेक्षा जास्त दिवस राहील ताजी, फक्त ‘या’ टिप्स करा फॉलो
लिची हे फळ सगळयांच खायला खूप आवडते, खास करून उन्हाळ्यात लिची सर्वात जास्त खाल्ली जाते. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण लिची आवडीने खातात. पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेली लिची आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. पण लिची खूप लवकर खराब होते. पण आता काळजी करण्याची गरज नाही तुम्ही लिची हे फळ 3 दिवसांपेक्षा जास्त दिवस फ्रेश ठेऊ शकतात. चला तर मग आजच्या या लेखात आपण या टिप्सच्या मदतीने लिची ताजी ठेवता येईल...

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लिचीला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. तसेच लिची हे फळ सर्वांच खायला खुप आवडते. आजकाल बाजारात देखील हंगामानंतरही लिची आपल्या खरेदी करायला मिळते. तर तुम्ही लिची 3 दिवसांपेक्षा जास्त काळ ताजी ठेऊ शकता. फक्त या प्रकारे साठवणूक करा. कारण साधारणपणे 1-2 दिवसांत लिचीचा रंग तपकिरी होऊ लागतो आणि त्याची चव देखील खराब होते. कधीकधी, त्यावर कीटकांचा प्रादुर्भाव देखील होतो. अशा परिस्थितीत लोकं लिची हे फळ मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यास टाळाटाळ करतात. परंतु जर तुम्ही काही सोप्या स्टोरेज टिप्स फॉलो केल्या तर लिची केवळ 3 दिवसच नाही तर त्याहून अधिक काळ ताजी ठेऊ शकता.
लहान मुलांपासून ते मोठ्यांची आवडती लिची जास्त दिवस फ्रेश आणि चविष्ट ठेवण्यासाठी काही टिप्स नक्की ट्राय करा. कारण लिची सर्वात लवकर खराब होते. तथापि, काही पद्धती आहेत ज्या वापरून तुम्ही लिची 3 दिवसांपेक्षा जास्त काळ साठवू शकता आणि ती ताजी देखील राहील. तर आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला लिची दीर्घकाळ ताजी ठेवण्याच्या त्या 5 पद्धती सांगणार आहोत, जाणून घ्या…
1. रेफ्रिजरेटरमध्ये व्यवस्थित ठेवा
लिची फ्रिजमध्ये ठेवणे महत्वाचे आहे, पण ती कशी ठेवावी हे देखील जाणून घेणे महत्वाचे आहे. लिची नेहमी प्लास्टिकच्या पिशवीत किंवा झिप लॉक बॅगमध्ये फ्रिजच्या फळांच्या भागात ठेवा. यामुळे लिची ओलसर राहते आणि ती सुकत नाही.
2. पेपर टॉवेल वापरा
तुम्ही जर लिची हवाबंद डब्यात ठेवत असाल तर त्यात एक पेपर टॉवेल ठेवा. पेपर टॉवेल अतिरिक्त ओलावा शोषून घेतो आणि लिची लवकर खराब होत नाही.
3. खोलीच्या तापमानावर ठेवू नका
खोलीच्या तापमानात लिची उघड्या हवेत ठेवल्याने ती लवकर तपकिरी होते. ही प्रक्रिया विशेषतः उन्हाळ्यात जलद होते. म्हणून जर तुम्ही लगेच लिची खात नसाल तर ती उघड्या जागेत ठेवण्याऐवजी ती थेट फ्रीजमध्ये ठेवा.
4. लिची धुवू नका
लिची साठवण्यापूर्वी धुण्याची चूक करू नका. कारण पाण्यामुळे लिचीच्या सालीतील ओलावा वाढतो, ज्यामुळे त्या लवकर खराब होऊ लागतात. जेव्हा तुम्हाला त्या खायच्या असतील तेव्हाच त्या धुवा.
5. फ्रीजरमध्ये लिची ठेऊ शकता
तुम्ही जर मोठ्या प्रमाणात लिची खरेदी केली असेल आणि ती बराच दिवस साठवायची असेल, तर त्याची साल आणि बिया काढून फ्रीजरमध्ये हवाबंद डब्यात ठेवा. यामुळे लिचीची चव महिनोनमहिने टिकून राहील.
लिचीचे पोषण आणि फायदे
लिचीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. याशिवाय लिचीमध्ये व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स, कॉपर, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स देखील आढळतात, जे शरीराच्या एकूण आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. लिची खाल्ल्याने त्वचा सुधारते, पचन सुधारते आणि शरीर थंड होते. हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी, रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी देखील ते उपयुक्त आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
