तुम्ही पिंगट केसांमुळे त्रस्त आहात? ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा ट्राय!

जवळपास सर्वच लोक केसांच्या विविध समस्येमुळे त्रस्त आहेत. यामध्ये केस गळणे, डोक्यात कोंडा होणे, पांढरे केस होणे.

तुम्ही पिंगट केसांमुळे त्रस्त आहात? 'हे' घरगुती उपाय नक्की करा ट्राय!
मुलतानी माती हे केसांसाठी एक उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर मानले जाते. हा पॅक बनवण्यासाठी दोन चमचे मुलतानी माती पावडर घ्या आणि त्यात थोडेसे पाणी घालून जाड पेस्ट बनवा. आता हा पॅक आपल्या केसांमध्ये लावा आणि त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा.

मुंबई : जवळपास सर्वच लोक केसांच्या विविध समस्येमुळे त्रस्त आहेत. यामध्ये केस गळणे, डोक्यात कोंडा होणे, पांढरे केस होणे, केसांना अकाली ग्रेनिंग होणे, शुष्क केस आणि भुऱ्या केसांमुळे अनेकजण त्रस्त आहेत. चांगल्या केसांसाठी फक्त चांगले उत्पादने वापरून उपयोग नाही, तर केसांची योग्य काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. अनेक वेळा महागड्या उत्पादनांतूनही केसांना पाहिजे असलेली पोषक तत्त्वे मिळत नाहीत. (Follow these homemade tips for good hair)

पिंगट केसांची समस्या दूर करण्यासाठी आवळा पावडर खूप फायदेशीर आहे. आवळा पावडर नारळ तेल किंवा ऑलिव्ह ऑईलमध्ये मिसळा आणि रात्री आपल्या केसांवर लावा. आपल्या केसांना हे मिश्रण व्यवस्थित पणे लावा आणि सकाळी धुवा. आठवड्यातून दोनदा हे केल्याने पिंगट केसांची समस्या दूर होण्यास मदत होते आणि आपले केस मुलायम आणि चमकदार दिसतील.

कांद्याचा रस लावणे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. सर्वात अगोदर कांदा बारीक किसून अथवा कांदा ज्यूसरमधून काढला तरी चालतो मात्र, कांद्याचा रस हा ताजा असावा. त्यानंतर कोरफड द्या कोरफडीचा बाजूचा सर्व भाग काढून टाका त्यानंतर कांद्याचा रस कोरफड आणि नारळाचे तेल एकत्र करा रोज हे तेल केसांना लावा यामुळे तुमचे केस सुंदर, जाड, लांब आणि मजबूत दिसतील.

लिंबाचा रस काढून तो केसांच्या मुळाशी लावावा. 10 ते 15 मिनिटांनी केस आधी पाण्याने धुवून, पुन्हा शॅम्पूने धुवा. यामुळे केस चमकदार होतील आणि डोक्यातील कोंडा आणि खाजही दूर होण्यास मदत होईल. खोबरेल तेल केसांना मॉयश्चरायझ करण्याचे काम करते. खोबऱ्याचे तेल थोडसे कोमट करून त्याने डोक्याचा मसाज करावा. त्यामुळे कोंड्याची समस्या कमी होईल.
-केसगळती व केस कमकुवत होण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे कोंडा.

टाळूच्या त्वचेला योग्य प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा न झाल्यास कोंड्यासह अन्य समस्या उद्भवतात. केसांचे नुकसान टाळण्यासाठी आपल्या हेअर केअर रुटीनमध्ये कांद्याच्या रसाचा समावेश करून पाहावा. आपल्या केसांच्या लांबीनुसार कांद्याचा रस घ्यावा. यामध्ये एक ते दोन चमचे मध मिक्स करा. हे मिश्रण आपल्या टाळूसह संपूर्ण केसांवर लावा. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत मिळेल आणि केसांची वाढ देखील चांगली होईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Sleeping Disorder | कमी झोपेमुळे ‘स्लीप एपनिया’चा धोका, जाणून घ्या लक्षणांबद्दल…

(Follow these homemade tips for good hair)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI