कोरियन ग्लास स्किनसाठी फक्त राईस वॉटरच नाही तर ‘या’ गोष्टी देखील आहेत बेस्ट
कोरियन ग्लास स्किन मिळवण्यासाठी महिला अनेक स्किन केअर प्रोडक्टसह राईस वॉटर वापरत असतात. पण आजच्या या लेखात आपण इतर घरगुती उपायांबद्दल जाणून घेणार आहोत जी तुम्हाला चमकदार त्वचा मिळवण्यास मदत करतील.

आजकाल प्रत्येकाला चमकदार आणि तेजस्वी, मुलायम त्वचा हवी असते. अशातच कोरियन ग्लास स्किन आपलीही हवी असे ट्रेंड सुरू आहेत. कारण आजकाल सोशल मिडीयावर कोरियन ड्रामा अधिक पाहिला जात आहे. त्यामुळे अनेक मुला-मुलींना त्यांच्यासारखी चमकदार नितळ त्वचा हवी असते, पण अशी स्किन मिळवण्यासाठी कोरियन लोक त्यांच्या स्किनकेअर रूटींगमध्ये तांदळाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे ही कोरियन स्किनकेअर पद्धत आता जगभरात लोकप्रिय होत आहे.
तांदूळ हा अँटीऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत आहे, जो सुरकुत्या कमी करतो. तांदळात वृद्धत्वविरोधी गुणधर्म देखील असतात, जे तरुण त्वचा टिकवून ठेवतात.
पण तुम्हाला माहित आहे का की फक्त तांदळाचे पाणीच नाही तर इतर अनेक आपले घरगुती घटक आहेत जे तुम्हाला कोरियन ग्लास स्किन मिळविण्यात मदत करू शकतात? जर तुम्हाला कमी खर्चात आणि कोणत्याही दुष्परिणामांशिवाय चमकदार त्वचा हवी असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. आजच्या लेखात कोरियनसारखी त्वचा मिळविण्यासाठी वापरता येणाऱ्या काही गोष्टींबद्दल जाणून घेऊयात.
तज्ज्ञ काय म्हणतात?
सेलिब्रिटी त्वचारोगतज्ज्ञ सांगतात की कोरियन त्वचा भारतीय त्वचेपेक्षा खूप वेगळी आहे. म्हणून तुम्ही जेव्हा तांदळाच्या पाण्याचा वापर करता तेव्हा ते दररोज लावण्याऐवजी आठवड्यातून 2-3 वेळा लावावे. तांदळाचे पाणी त्वचेला अनेक फायदे देते, जसे की त्वचा स्वच्छ करणे, डाग कमी करणे आणि ती मऊ आणि चमकदार बनवणे. अशातच मुरुमे, रंगद्रव्य किंवा संवेदनशील त्वचा असलेल्यांनी तांदळाचे पाणी वापरू नये. चला जाणून घेऊया की तुम्ही आणखी कोणत्या गोष्टींचा वापर करून चमकदार त्वचा मिळवू शकता.
कोरफड खूप प्रभावी आहे
कोरफड ही औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. तर कोरफड अनेक प्रकारे आपल्या रोजच्या जीवनात वापर असतो. त्यातच कोरफड जेलही चेहऱ्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. त्याचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेला हायड्रेट ठेवण्यास, सुरकुत्या कमी करण्यास आणि कोलेजन उत्पादन वाढविण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचा नितळ आणि मऊ राहते.
काकडीने मिळवा चमकदार त्वचा
काकडी हायड्रेटिंग आणि शरीराला थंडावा देते. कोरियन स्किन केअरमध्ये देखील त्यांचा वापर केला जातो. काकडी चेहऱ्यावर लावल्याने जळजळ आणि सूज कमी होते, त्वचा हायड्रेट होते. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर काकडीचा रस देखील लावू शकता. काकडीचे फेस पॅक देखील एक चांगला पर्याय आहेत.
ग्रीन टी वापरा
कोरियन स्किन केअरमध्येही ग्रीन टीचा वापर केला जातो. त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. ते जळजळ कमी करते, लालसरपणा कमी करते आणि त्वचेला ताजेतवाने वाटते. यासाठी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर ग्रीन टी बॅग्ज लावू शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
