AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Fall Tips : केस गळतीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Hair Fall Tips : काय तु्म्हीसुद्धा केळ गळतीच्या समस्येचा सामना करत आहात? अशात केस गळती कमी करण्यासाठी तुम्ही सोप्या टिप्स वापरू शकता.

Hair Fall Tips : केस गळतीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी फॉलो करा या टिप्स
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 28, 2021 | 2:03 PM
Share

केस गळतीची समस्या वेगवेगळ्या कारणांमुळं होऊ शकते. कारण काहीही असो, ही बाब तणाव वाढविण्यास कारणीभूत ठरते. तसेच केस गळतीमुळं आत्मविश्वास कमी होतो.

अशावेळी केसांची काळजी (Hair Care) अधिक घेण्याची आवश्यकता आहे. या समस्येपासून सुटण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपचार (home remedies) करून पाहू शकता.

केसांना योग्य शॉम्पूने धुवा

केस गळती रोखण्यासाठी आपले केस आणि डोक्याला माइल्ड शॉम्पूने धुवा. माइल्ड शॉम्पूचा वापर केल्यास केसांची गळती कमी होऊ शकते. कमी केमिकल वाल्या शॉम्पूने केसांचा कोरडेपणा कमी होतो. अधिक केमिकल वाल्या शॉम्पूनं केसांचा कोरडेपणा वाढतो. हे केसांच्या तुटण्याचं कारण होऊ शकते.

डोक्यावर हेअर मास्क लावू नये

डोक्यावर हेअर मास्क लावू नये. केसांना कंडिशनर लावताना काही बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कंडिशनर वापरताना केसांच्या विशिष्ट भागावरच वापरलं पाहिजे. वापर केल्यानंतर केसांना योग्य पद्धतीनं पाण्यानं धुतलं पाहिजे.

सकस आहार घ्या

सकस आहार तुमच्या केसांसाठी तसेच तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक असते. तुम्ही प्रोटीन आणि व्हिटॅमीनयुक्त आहाराचं भरपूर सेवन करून केस गळतीला रोखधाम लावू शकता. सकस आहार तुमच्या केसांची गळती कमी करेल. तसेच तुम्हाला आरोग्यसंपन्न बनवेल.

तणाव दूर करण्यासाठी योगासन

केस गळतीचं मुख्य कारण म्हणजे तणाव होय. त्यापासून मुक्तता हवी असेल तर योगासन केले पाहिजे. केस गळती थांबविण्यासाठी तणाव मुक्त योग मुद्रा उपयोगी मानली जाते. भुजंगासन, पश्चिमोत्तानासन, मकरासन, उष्ट्रासन आदी तणावातून मुक्ती देणारी काही योगासन आहेत.

डोक्याची मालीश

नियमित डोक्याची मालीश करावी. मसाज करताना आवश्यक तेलाचाच वापर करावा. हे तेल ब्लड सर्क्युलेशनसाठी मदत करतात. तसेच केसांची गळती थांबविण्यासाठी मदत होते.

योग्य कंगव्याचा वापर कसा

केस विंचरताना योग्य कंगव्याचा वापर करावा. केस गळतीच्या समस्येपासून त्रस्त असलेल्या लोकांनी चौडे दात वाल्या कंगव्यांचा वापर करावा, असा सल्ला दिला जातो. असे कंगवे अनावश्यक केस गळती थांबवितात.

केमिकलचा वापर कमी करा

केस गळतीची समस्या असणाऱ्यांनी केमिकलचा वापर कमी करावा. कारण केमिकल प्रोडक्टचा वापर केल्यानं केसांची गळती मोठ्या प्रमाणात होते.

कांद्याच्या रसाचा वापर करा

कांद्याचा रस केसांना पोषण देण्यासाठी उपयोगी असतो. केस गळती होणारे कांद्याच्या रसाचा वापर करतात.

स्टाईलसाठी हिटिंग टूल्सपासून वाचा

काही जण केसांची स्टाईल करण्यासाठी हिटिंग टूल्सचा वापर करतात. याचा नेहमी वापर केल्यास केसांचं अधिकच नुकसान होऊ शकते. त्यामुळं केस अधिकच झडतात.

Common Lifestyle Mistakes: पाच अशा चुका ज्या देतात अनेक आजारांना आमंत्रण; या सवयी आजच सोडा

Urvashi Rautela | अभिनेत्रीच्या लूकनं चाहते घायाळ; उर्वशी रौतेलाच्या ड्रेसची जाणून घ्या किंमत!

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.