उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी ‘हे’ खास घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

उन्हाळ्याचा हंगाम आता सुरू झाला आहे. उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे अतिशय आवश्यक असते.

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी 'हे' खास घरगुती उपाय नक्की ट्राय करा!
फळ
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 7:13 AM

मुंबई : उन्हाळ्याचा हंगाम आता सुरू झाला आहे. उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे अतिशय आवश्यक असते. शरीरामध्ये पाण्याची कमी झाल्यानंतर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपण उन्हाळ्यात चांगल्या आहारावर जास्त भर दिला पाहिजे. विशेष करून उन्हाळ्यात आपले शरीर हायड्रेट ठेवले पाहिजे. तसेच उन्हाळ्यात सुती कपडे परिधान करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. त्वचेसाठी सुती कपडे उत्तम ठरतात. (Follow these tips to keep your body hydrated in the summer)

उन्हाळ्यात आपण जास्त करून कलिंगड खाण्यावर भर देतो. कारण कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. जे उन्हाळ्यात शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जातात. कलिंगडमध्ये साधारण 92 ते 96 टक्के पाण्याचं प्रमाण असते. यामुळे अगोदरच आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण चांगले असते त्यामुळे कलिंगड खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणे शक्यतो टाळावे.

उन्हाळ्यात स्वत: ला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे फार महत्वाचे आहे. म्हणून, उन्हाळ्यात प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी कलिंगड हा एक चांगला पर्याय आहे. कलिंगडमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते.आंब्यामध्ये ए,बी आणि सी ही तिन्ही जीवनसत्वे असतात. याशिवायही आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे.

आंब्यात शर्करा असल्याने आंबा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते. याशिवाय नुसता आंबा खाण्याऐवजी मॅंगो शेक किंवा कैरीचे पन्हे घेणेही अधिक फायदेशीर ठरु शकते. आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो.

लिंबू पाणी हे उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवण्यासाठी वापरले जाते, परंतु आपणास माहित आहे का की चवी व्यतिरिक्त, लिंबू पाणी शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. लिंबूयुक्त पाणी प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती सुधारते. उन्हाळ्यात घामामुळे शरीराचे अनेक घटक बाहेर पडतात. आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स देखील शरीराबाहेर पडतात.

दररोज एका ग्लास लिंबू पाणी प्यायल्याने या घटकांची मात्रा शरीरात टिकून राहते. व्हिटामिन सी समृद्ध लिंबू पाणी त्वचा सुधारते. आठवड्यातून एकदा याचे सेवन केल्याने त्वचेच्या समस्या देखील दूर होतात. त्यामध्ये उपस्थित पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रित करू शकते. जेव्हा जेव्हा उच्च रक्तदाबाची समस्या जाणवते, तेव्हा एक ग्लास लिंबू पाणी प्यायले पाहिजे.

संबंधित बातम्या : 

(Follow these tips to keep your body hydrated in the summer)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.