AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात ‘या’ प्रकारे घ्या केसांची काळजी…

प्रत्येक ऋतूमध्ये केसांची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. त्यामध्येही उन्हाळ्यात आपले केस कोरडी आणि निर्जीव होतात.

उन्हाळ्यात 'या' प्रकारे घ्या केसांची काळजी...
पार्लरमध्ये जाऊन केस स्ट्रेट करण्यासाठी महिला बरेच पैसे घालतात. मात्र, आज आम्ही काही घरगुती टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे केस स्ट्रेट होतील. केस स्ट्रेट पॅक तयार करण्यासाठी आपल्याला एक कप दूध आणि एक अंड लागणार आहे. एक कप दुधात अंडी मिक्स करा आणि हा पॅक ब्रशने केसांवर लावा. अर्ध्या तासांसाठी पॅक केसांवर ठेवा आणि त्यानंतर फक्त शैम्पूने आपले केस धुवा. हा पॅक लावल्याने केस स्ट्रेट होतील.
| Updated on: Mar 29, 2021 | 7:30 AM
Share

मुंबई : प्रत्येक ऋतूमध्ये केसांची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. त्यामध्येही उन्हाळ्यात आपले केस कोरडी आणि निर्जीव होतात. त्यामुळे केसं तुटू लागतात आणि केसांची चमकही कमी होते. म्हणून उन्हाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात घामामुळे आपले केस आधिक खराब होतात. यामुळे किमान दोन दिवसांमध्ये एकदा केस धूणे आवश्यक आहे. (Follow these tips to take care of your hair in summer)

-जर आपले केस खूप वेगाने गळत असतील तर मेथी दाणे आपले केस गळणे थांबवतेच परंतु नवीन केसांना वाढण्यास देखील मदत करेल. मेथीमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन-सी, लोह, पोटॅशियम असे घटक आढळतात. यामुळे आपल्या केसांची मुळे मजबूत करण्यासाठी, त्यांच्या वाढीस मदत होते.

-केसांची लांबी वाढविण्यासाठी आपण रात्री नारळ तेलाने मेथी दाणे शिजवू ठेवा. त्यानंतर सकाळी उठून मेथी दाणे आणि तेल वेगळे करा आणि त्या तेलाने केसांच्या मुळांमध्ये मसाज करा. आठवड्यातून किमान 2 वेळा हे तेल लावावे. एका महिन्यात तुम्हाला फरक दिसेल.

-डोक्यातील कोंडापासून मुक्त होण्यासाठी, मेथी तेल व गोक्षुर समान प्रमाणात घेऊन त्याची पेस्ट बनवा. नंतर या पेस्टमध्ये तेल आणि मध मिसळ. ही पेस्ट हेअर मास्क म्हणून लावा. किमान एक तास तरी हा मास्क राहू द्या, नंतर शॅम्पूने केस धुवा

-कोरफड आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध आहे. हे केवळ आपल्या त्वचेची काळजी घेत नाही, तर आपल्या केसांसाठीही फायदेशीर ठरतात. यामुळे आपले केस चमकदार होतात. कोरफडयुक्त हेअर कंडिशनर बनवण्यासाठी, प्रथम कोरफडच्या पानांतून गर काढा. आता एक चमचे लिंबाचा रस, 4 चमचे कोरफड जेलमध्ये घाला. आता हे मिश्रण आपल्या केसांवर लावा आणि सुमारे 10 मिनिटे आपल्या केसांवर तसेच राहू द्या. 10 मिनिटांनंतर कोमट पाण्याने आपले केस स्वच्छ करा.

संबंधित बातम्या : 

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

(Follow these tips to take care of your hair in summer)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.