AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Relationship : नात्यातला गोडवा कायम ठेवा; करा ‘या’ गोष्टी, राहील प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी!

प्रियकर-प्रियसी असो वा नवरा बायको नवीन नातं असलं की सगळं छान छान वाटतं... जसं जसं नातं पुढे जातं काही वर्षांनी नात्यामध्ये पहिल्यासारखा ओलावा जाणवत नाही. मग विचार पडतो असं का, त्याचंच उत्तर आज आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Relationship : नात्यातला गोडवा कायम ठेवा; करा 'या' गोष्टी, राहील प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी!
Relationship
| Edited By: | Updated on: Dec 27, 2021 | 5:37 PM
Share

नात्यात कायम एक प्रकारचा गोडवा असावा आणि हा गोडवा असाच राहील हे आपल्या हातात असतं. नातं जेव्हा नवीन नवीन असतं तेव्हा सगळं व्यवस्थित असतं. आपण एकमेकांना वेळ देतो. पण जसं हे नातं अनेक वर्षांमध्ये पुढे जातं, त्यात पहिल्यासारखं काही असं जाणवायला लागतं नाही. या मागे अनेक कारणं असू शकतात. पण काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि त्या केल्या तर हे नातं कायम नवीन वाटेल. त्या नात्यात ओलावा वाटेल.

क्वालिटी टाइम कुठल्याही नात्यामध्ये क्वालिटी टाइम देणं खूप गरजेचं असतं. स्पर्धेच्या युगात आज नवरा-बायको असो प्रियकर-प्रियसी असो नोकरी करतात. त्यामुळे त्यांना एकमेकांना देण्यासाठी वेळ मिळत नाही. मग अशावेळी त्या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा येतो. म्हणून एकमेकांना क्वालिटी टाइम द्या. बाहेर फिरायला जा. एखाद्या छान हॉटेलमध्ये जेवायला जा. तिथे एकमेकांना वेळ द्या. एकमेकांचं बोलणं ऐकून घ्या. अगदी शक्य असेल तर मस्तपैकी काही दिवसांसाठी ट्रीपवर जा.

पार्टनरला कसं खूश करणार? छोट्या छोट्या गोष्टीत नात्याचं सुख दडलेलं असतं. शक्य तेव्हा पाटर्नरचं कौतुक करा. कुठल्या पाटर्नरला आवडत नाही आपलं कौतुक झालेलं? आणि ते जर आपल्या पाटर्नरनं केलं तर सोने पे सुहागा. कधी-कधी पार्टनरला कॉम्प्लिमेंट द्या. यामुळे नात्यांमध्ये गोडवा राहतो.

कधी कधी पार्टनला गिफ्ट द्या गिफ्ट… हे तर कोणाला आवडतं नाही.. त्यात कारण नसताना सरप्राइज गिफ्ट मिळालं तर क्या बात है. गिफ्ट खूप महाग असावं असं बिल्कुल नाही. फक्त त्यात प्रेम असावं… अगदी गजराही नेला तरी बायकोच्या चेहऱ्यावरची स्माईल आपल्या दिवसभरातले सगळे टेन्शन दूर करतील. तुम्ही पण आपल्या नवऱ्यासाठी छान त्यांचा आवडीचं जेवण बनवा. या छोट्या छोट्या गोष्टींतून तुमच्या नात्यात प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी कायम राहील.

एकमेकांना स्पेस द्या हो आजकाल सगळ्यांना आपली अशी एक स्पेस लागते आणि ती देणं गरजेचं आहे. प्रत्येकाची आपली एक विचार करण्याची पद्धत असते आणि आपल्या प्रकारे जगण्याची इच्छा असते. म्हणून सतत एकमेकांना टोकू नका. त्यामुळे नात्यात दुरावा येतो. प्रत्येक वेळी त्यांचा मोबाइल पाहणं, सतत प्रत्येक गोष्ट विचारणं हे नात्यात नसावं. प्रत्येकांचं आपलं फ्रेंड सर्कल असतं, त्यांच्यासोबत वेळ गेल्यास त्यात वाईट वाटून घेऊ नका. दोघेही एकमेकांना स्पेस द्या आणि नात्यात आनंद ठेवा.

तुम्हाला माहिती आहे का फळं खाण्याचेही काही नियम आहेत..? जाणून घ्या एका क्लिकवर

Hair Care Tips : केसांशी संबंधित ‘या’ चुका करू नका , नुकसान होऊ शकते!

लाल केळी कधी खाली आहेत का? फायदे कळल्यास रोज खाणार लाल केळी

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.