Food Habits | वजन नियंत्रण व प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहाराचे ‘हे’ पाच नियम पाळा!

आयुर्वेदात खाण्या-पिण्याबद्दल बऱ्याच गोष्टी नमूद केल्या आहेत. ज्यामुळे केवळ आपली प्रतिकारशक्तीच बळकट होत नाही, तर आपले वजनही नियंत्रित राहते.

Food Habits | वजन नियंत्रण व प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहाराचे ‘हे’ पाच नियम पाळा!
खाद्य पदार्थ

मुंबई : धावपळीच्या आयुष्यात आपण सगळेच निरोगी राहण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करतो. यासाठी योगा, व्यायाम, मॉर्निंग वॉक आणि डाएटिंग अशा काही पद्धती आहेत, ज्या बहुतेक लोक पाळतात. पण, तुम्हाला माहिती आहे का की, आयुर्वेदात खाण्या-पिण्याबद्दल बऱ्याच गोष्टी नमूद केल्या आहेत. ज्यामुळे केवळ आपली प्रतिकारशक्तीच बळकट होत नाही, तर आपले वजनही नियंत्रित राहते. चला तर, जाणून घेऊया आयुर्वेदाच्या या महत्त्वाच्या नियमांबद्दल…(Food habits For good Health)

भाजी स्टीम किंवा अर्ध्या शिजवून खाव्यात.

जर आपण भाज्या पूर्ण किंवा अधिक शिजवून खात असाल, तर यापुढे आपण त्या जास्त शिजवणार नाही, याची काळजी घ्या. भाज्या जास्त शिजवल्याने त्यांचे पोषकद्रव्य कमी होते. परंतु, आपण त्या कच्च्या ठेवल्या तरी देखील आपल्या आरोग्यास त्या हानी पोहोचवू शकतात. म्हणून, जेवण तयार करताना लक्षात ठेवा की, भाज्या पूर्णपणेही शिजवू नयेत किंवा त्या कच्च्या देखील राहू नयेत.

कच्चे मसाले भाजून आणि वाटून घ्यावेत.

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असलेले खडे मसाले पॅनवर भाजून घ्यावेत. त्यानंतरच सोयीनुसार त्याचा वापर करावा. विशेषत: हिवाळ्यात किंवा पावसाळ्याच्या वेळी आपण आले पॅनमध्ये भाजून खाऊ शकता.

गव्हाचे पीठ चाळून वापरू नका.

गहू फायबर युक्त घटक आहे. परंतु, त्यातील बहुतेक फायबर ब्राऊन भागामध्ये असतात. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही पीठ वापरता, तेव्हा हे लक्षात घ्या की ते न चाळताच वापरा. न चाळलेले गव्हाचे पीठ आरोग्यासाठी चांगले मानले जाते.

थंड जेवण खाल्याने पचन कमकुवत होते.

थंड जेवण खाणे टाळा. हे थेट आपल्या पचनावर परिणाम करू शकते. यासह, हेही लक्षात ठेवा की कधीही पूर्ण पोट भरून खाऊ नाही. आयुर्वेदानुसार, पोट भरून अन्न न खाल्याने जेवण सहज पचते (Food habits For good Health).

गोड पदार्थ कमी खावेत.

आयुर्वेदानुसार गोड पदार्थ कमी खावेत. गोड साखरेला पर्याय म्हणून आपण मध किंवा गूळ वापरू शकता. हे आपल्याला मधुमेहासारख्या आजारांपासून वाचवू शकते.

ही लक्षणे दिसताच ‘डाएटिंग’ त्वरित थांबवा!

– जर एखाद्या व्यक्तीला डाएटिंग दरम्यान अ‍ॅसिडिटीची समस्या उद्भवली असेल, तर त्यांनी त्यांचे डाएटिंग त्वरित बंद केले पाहिजेत. वास्तविक, आहार घेताना, लोक कमी-जास्त प्रमाणात अन्न खाण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे नंतर पोटात वेदना किंवा गॅसची समस्या उद्भवू शकते.

– डाएट करणे म्हणजे उपासमार नसून आहारात संतुलन राखणे होय. कमी अन्नामुळे शरीराला चांगले पोषकद्रव्ये मिळत नाहीत आणि त्या व्यक्तीचा स्वभाव चिडचिडा होतो. जर, तुम्हालाही डाएटिंग दरम्यान चिडचिड किंवा ताण येत असेल, तर तुम्ही डाएट करणे लगेच थांबवा आणि तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

– डाएटिंग सुरू केल्यानंतर तुम्हाला भूक लागण्याची काही समस्या असल्यास, आपला डाएट काही काळासाठी थांबवा. अन्यथा ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते.

– आहारादरम्यान आवश्यक पौष्टिक गोष्टींचा समावेश न केल्यामुळे आपण अशक्तपणा किंवा थकल्यासारखे वाटू लागले, तेव्हाही हा डाएट आहार घेणे त्वरित थांबवा.

(टीप : कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Food habits For good Health)

हेही वाचा :

Weight Loss Diet | जलदगतीने वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम ‘डाएट प्लॅन’, लठ्ठपणामुळे असाल त्रस्त तर नक्कीच वाचा!

Curry Leaves |  हृदय विकाराचा धोका कमी करेल ‘कढीपत्त्याचे पान’, वाचा याच्या आणखी फायद्यांबद्दल…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI