Health Tips : जास्तवेळा लघवीला जावं लागतंय? ‘हे’ असू शकतं कारण! एका क्लिकवर जाणून घ्या माहिती…

| Updated on: Dec 18, 2021 | 4:33 PM

आपण वारंवार लघवी(Frequent-Urination)साठी जात असाल तर सावधान...वारंवार लघवीला जाणं हे अनेक रोगाचं लक्षणापैकी एक आहे. त्यातील एक कारण तुम्हाला मधुमेहा(Diabetes)चा त्रास असू शकतो. या समस्येविषयी आज जाणून घेणार आहोत.

Health Tips : जास्तवेळा लघवीला जावं लागतंय? हे असू शकतं कारण! एका क्लिकवर जाणून घ्या माहिती...
वारंवार लघवीला जाणे
Follow us on

आपण वारंवार लघवी(Frequent-Urination)साठी जात असाल तर सावधान…वारंवार लघवीला जाणं हे अनेक रोगाचं लक्षणापैकी एक आहे. त्यातील एक कारण तुम्हाला मधुमेहा(Diabetes)चा त्रास असू शकतो. या समस्येविषयी आज जाणून घेणार आहोत.

दुर्लक्ष करू नका
जास्त पाणी प्यायल्याने किंवा सतत एसीत बसून राहल्यामुळे अनेकांना सारखी लघवी लागते. मात्र आपण वारंवार लघवीला जात असाल तर हे आजारपणाचं लक्षण पण असू शकतं. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. 24 तासांमध्ये आपण साधारण 6 ते 7 वेळा जात असतो. तर जर तुम्हाला कुठलाही आजार नसेल तर 4–10 वेळासुद्धा तो लघवीला जाऊ शकतो. मात्र यापेक्षाही जास्त प्रमाणात तुम्हाला लघवीला जात असाल तर मग तुम्हाला नक्की डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे.

मधुमेहाचं मुख्य कारण
वारंवार लघवीला जाणं हे मधुमेहाचं महत्त्वाचं कारण आहे. मधुमेह हा सर्वात धोकादायक आजार आहे. कोरोनाकाळात आपण ऐकलं असेल मधुमेहामुळे अनेकांना कोरोनावर मात करता आली नाही. मधुमेह असलेल्या व्यक्तीवर बरं करणं कठिण जातं. रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा वाढणे म्हणजे मधुमेह. आपण जे अन्न खातो, त्याचे शरीराला आवश्यक ऊर्जेसाठी ग्लुकोज रूपांतर होते.

डॉक्टरकडे जाणं गरजेचं
तुम्ही जर रात्री उठून पण 2-3 वेळा लघवीला जात असाल तर तुम्हाला टाइप 2 मधुमेह झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. टाइप 2 मधुमेह हा आजार नियंत्रणात येऊ शकतो. वेळी तो बराही होऊ शकतो. मात्र टाइप 1 मधुमेह आपल्या शरीराला विळखा घालतो. आणि त्यातून आपण कधीच बाहेर पडू शकत नाही. टाइप 1 मधुमेह झालेल्या लोकांना इन्सुलिन घ्यावं लागतं.

लघवी आणि मधुमेहाचा संबंध
आपल्या शहरातील साखरेचे प्रमाण जेव्हा वाढतं तेव्हा अशावेळी किडनीला जास्त प्रमाणात कार्य करावं लागतं. आणि याचा दुसऱ्या परिणाम अशावेळी तुम्हाला जास्त लघवी लागते. कारण साखरेचे वाढलेले प्रमाण लघवी वाटे बाहेर पडते. त्यामुळे आपल्याला वारंवार लघवीला जावं लागतं. कोणालाही असा त्रास जाणवत असेल तर सर्व प्रथम तुम्ही डॉक्टराकडे जावं आणि त्यांनी सांगितलेल्या चाचण्या कराव्यात आणि औषधं वेळीत घ्यावी.

लघवीकरून आल्यावर लगेच पाणी पिणे योग्य की अयोग्य..? काय आहे नेमकं बरोबर… तज्ज्ञ काय देतात सल्ला..?

Women Health : महिलांनो…निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा!

Weight Loss | कुणी मुगडाळ खाल्ली, तर कुणी आणखी वेगळी ट्रीक वापरली! 2021मध्ये सेलिब्रेटींचं ‘वेट लॉस’ चर्चेत!