AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drumstick Leaf : शेवग्याच्या पानांपासून मिळवा मधुमेहापासून मुक्ती, जाणून घ्या याचे फायदे

मधुमेह आणि वजन कमी करण्यासाठी शेवग्याला निसर्गाचे वरदान म्हटले जाते. शेवग्याचा विविध हेतूने उपयोग केला जातो. विशेषतः शेवग्याची पाने, फूले आणि शेंगांची भाजी बनवली जाते. (get rid of diabetes from drumstick leaf, know how beneficial)

Drumstick Leaf : शेवग्याच्या पानांपासून मिळवा मधुमेहापासून मुक्ती, जाणून घ्या याचे फायदे
शेवग्याच्या पानांपासून मिळवा मधुमेहापासून मुक्ती
| Edited By: | Updated on: Mar 07, 2021 | 6:59 AM
Share

नवी दिल्ली : प्रत्येक वनस्पतीचे काही ना काही गुणधर्म असतात. शेवग्याचे झाड आपल्याला मधुमेहाच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी फार उपयुक्त ठरू शकते. शेवग्याची भाजी आपण आवडीने खातो. हीच भाजी मधुमेहाच्या रुग्णांनी खाल्ली तर त्यांना होणारा त्रास दूर होण्यास खूप मदत ठरणार आहे. आयुर्वेदामध्ये शेवग्याला अनन्यसाधारण महत्व आहे. शेवग्याची भाजी खाण्यापासून आपणाला मधुमेहाबरोबर आणखी काही व्याधींपासून मुक्ती मिळू शकते. याच पार्श्वभूमीवर आपण शेवग्याच्या भाजीचे महत्व जाणून घ्यायला पाहिजेत. शेवग्याला इंग्रजीत Drumstick म्हटले जाते, तर वनस्पती शास्त्रामध्ये Moringa Oleifera या नावाने ओळखले जाते. भारतात ही वनस्पती अनेक नावांनी ओळखली जाते. शेवग्याचा विविध हेतूने उपयोग केला जातो. विशेषतः शेवग्याची पाने, फूले आणि शेंगांची भाजी बनवली जाते. (get rid of diabetes from drumstick leaf, know how beneficial)

मधुमेहावर शेवगा वरदान

मधुमेह आणि वजन कमी करण्यासाठी शेवग्याला निसर्गाचे वरदान म्हटले जाते. गेल्या काही वर्षात भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. तरुण-तरुणीसुद्धा मधुमेहाने त्रस्त झाली आहेत. जर आपण मधुमेहाचे रुग्ण असाल तसेच वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर आपण शेवग्याची भाजी खाल्ली पाहिजे. त्याचदृष्टीने शेवग्यावर काही संशोधनसुद्धा केले गेले आहे. यात संशोधनामध्ये शेवग्याला अत्यंत उपायकारी औषध म्हटले आहे. चला तर मग आपण शेवग्याचे गुणधर्म विस्ताराने जाणून घेऊया.

शेवग्याचे अँटीऑक्सिडेंट गुण

एका संशोधनामध्ये औषध म्हणून होणाऱ्या शेवग्याच्या पानांच्या वापराचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे. शेवग्यामध्ये अँटीऑक्सीडेंट गुण आढळले असून ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी अधिक लाभदायी ठरणारे आहेत. जर तुम्ही शेवग्याची पाने रोज खात असाल तर तुमचा मधुमेह नियंत्रणात येऊ शकतो. त्याचबरोबर ऑक्सीडेटिव स्ट्रेसपासून होणारे शरीराचे नुकसान टाळण्यातही शेवग्याच्या पानांची बहुमोलाची मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या रोजच्या डाएटमध्ये शेवग्याची पाने किंवा पानांची पावडर समाविष्ट करायला पाहिजे. शेवग्याची पाने पचनशक्ती मजबूत करण्यात उपयुक्त ठरतात.

वजन कमी करण्यास शेवग्याची पाने खूप फायदेशीर

जाणकारांच्या मतानुसार, शेवग्याच्या पानांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. ही पाने खाल्यामुळे भूक कमी लागते आणि पोट नेहमीच भरलेले असल्यासारखे वाटते. याचा फायदा असा होतो कि आपला अधूनमधून सारखे काही ना काही खात बसण्याची सवय सुटते. फायबरमुळे जेवण वेळेत पचते. शेवग्यामध्ये क्लोरोजेनिक ऍसिड असते, हे आपले वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते. तसेच शेवग्यामधील फॉस्फोरस आपल्या शरीरातील कॅलरी हटवण्यास उपयोगी येतात. (get rid of diabetes from drumstick leaf, know how beneficial)

इतर बातम्या

आर्थिक वर्ष संपण्याआधी झटपट पूर्ण करा ही कामे, अन्यथा भरावा लागेल दंड

‘माझ्यावर वारंवार बलात्कार’, अभिनेत्रीचा गंभीर आरोप, मुंबई पोलिसांकडे तक्रार

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.