देशी तुपाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी होईल कमी, जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत
मधुमेहाचे रुग्ण त्यांच्या आहारात देशी तूप समाविष्ट करून साखरेची पातळी नियंत्रित करू शकतात. तुपाच्या सेवनाने साखरेची पातळी कशी कमी होते, जाणून घेऊयात.

मधुमेह हा एक असा आजार आहे जो मुळापासून नष्ट करता येत नाही. आहार आणि औषधांच्या मदतीने तो नियंत्रित करता येतो. साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी औषधांसोबतच आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागते. तुम्हाला माहिती आहे का की आहारात काही बदल करून साखरेची पातळी सामान्य करता येते? तर देशी तूपाच्या मदतीने मधुमेह रूग्णांना साखरेची पातळी नियंत्रित करता येते. देशी तूप हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. कारण तूपाचे सेवन केल्याने शरीराला अनेक प्रकारचे चांगले फॅट्स मिळातात. तसेच प्रथिने आणि कॅल्शियमची कमतरता देखील भरून काढते. देशी तूप आपली चयापचय क्रिया मजबूत करते. अशातच देशी तूपाने रक्तातील साखरेची पातळी कशी कमी होते तसेच मधुमेह रूग्णांनी तूप किती प्रमाणात खावे ते जाणून घेऊयात.
तूपाच्या सेवनाने साखरेची पातळी कशी नियंत्रित करावी?
तुपात हेल्दी फॅट असतात जे साखरेची पातळी नियंत्रित करू शकते. तुपात असलेले पोषक तत्व हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. इतकेच नाही तर ते साखरेची पातळी देखील नियंत्रित करू शकते. खरं तर, हेल्दी फॅटचे सेवन केल्याने शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
तुपातील पोषक घटक
तुपामध्ये व्हिटॅमिन ए, ई, डी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात. तूप खाल्ल्याने इन्सुलिन चांगले काम करते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. तूपात कार्बोहायड्रेट्स नसतात, कार्ब फ्री असल्याने शरीरात इन्सुलिनची वाढ होत नाही.
तूप किती प्रमाणात सेवन करावे?
मधुमेही रुग्णांना अनेकदा भात खायला आवडतो. गरम भातामध्ये एक चमचा तूप मिक्स करून तुम्ही तूपाचे सेवन करू शकता. याशिवाय, चपातीला तूप लावून खाल्ल्याने साखरेची पातळी वेगाने वाढत नाही.
किती सेवन करावे
मधुमेही रुग्ण त्यांच्या आहारात दररोज 2 ते 3 चमचे देशी तूपाचे सेवन करू शकतात. तुम्ही नाश्त्यात आणि दुपारच्या जेवणात तूप समाविष्ट करू शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
