AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वप्नात केस गळताना दिसतात? सावध व्हा! भविष्यातील मोठ्या संकटाचे संकेत तर नाहीत ना?

अनेकदा आपण अशा स्वप्नांकडे दुर्लक्ष करतो, कारण असे वाटते की ती केवळ मनाची कल्पना आहेत. मात्र स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नात एक अर्थ किंवा संकेत दडलेले असतात. विशेषतः जर तुम्हाला केस गळण्याचे स्वप्न पडले, तर हे स्वप्न सामान्य नसते.

स्वप्नात केस गळताना दिसतात? सावध व्हा! भविष्यातील मोठ्या संकटाचे संकेत तर नाहीत ना?
hair fall
| Edited By: | Updated on: May 06, 2026 | 4:13 PM
Share

झोपेत काहीवेळा आपण असे स्वप्न पाहतो की ज्यांचा दिवसभर विचार केलेला असतो, तर कधी जवळवास घडणाऱ्या एखाद्या मोठ्या घटनेकडे निर्देश करतात. अनेकवेळा आपण असे काही स्वप्न पाहतो की ज्याचा आपल्या वास्तवाशी काही एक संबंध नसतो परंतु स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नं आपल्याला भविष्यातील घटनांची एक झलक देतात. तसेच झोपेत आपण पाहतो त्या प्रत्येक स्वप्नाचे स्वतःचे एक विशेष महत्त्व असते. जर तुम्ही स्वप्नात तुमचे केस गळताना पाहिले, तर तो निव्वळ योगायोग नाही. वास्तविक जीवनात, केस गळणे हे एका अशुभ स्वप्नापेक्षा कमी नाही, पण जर तुम्हाला प्रत्यक्षात घडण्याऐवजी स्वप्नात तीच गोष्ट दिसली तर? स्वप्नशास्त्रानुसार , केस गळणे किंवा टक्कल पडणे हे भविष्यासाठी अनेक महत्त्वाचे संकेत देते. चला जाणून घेऊया की अशी स्वप्ने शुभ आहेत की अशुभ, आणि या स्वप्नाचं अर्थ नेमकी काय आहे…

केस गळण्याचे स्वप्न काय सूचित करते?

स्वप्नशास्त्रानुसार केस हे व्यक्तीचे सौंदर्य, आत्मविश्वास आणि सामर्थ्य यांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात त्यांचे केस गळताना दिसले तर स्वप्नशास्त्रानुसार त्याचा असा अर्थ आहे की ती व्यक्ती असुरक्षित, तणावग्रस्त आहे किंवा तिच्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे. हे स्वप्न काहीतरी महत्त्वाचे गमावण्याच्या भीतीचेही संकेत असू शकते.

स्वप्नशास्त्रानुसार वेगाने केस गळणे हे काय दर्शवते?

अचानक आणि वेगाने केस गळण्याचे स्वप्न पाहणे हे एक अशुभ चिन्ह मानले जाते. हे भविष्यातील अडचणी, आर्थिक नुकसान किंवा नातेसंबंधांमधील तणाव दर्शवू शकते. हे स्वप्न असेही सूचित करू शकते की, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात एक मोठा बदल होणार आहे, ज्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो.

हळूहळू केस गळण्याचा अर्थ

दरम्यान केस जर हळूहळू गळत असतील तर ते दीर्घकाळची चिंता, मानसिक ताण किंवा थकवा यांचे लक्षण असू शकते. यावरून असे दिसून येते की त्या व्यक्तीने आपल्या जीवनात संतुलन राखण्यावर आणि मनःशांती टिकवून ठेवण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

स्वप्नशास्त्रानुसार केस गळण्याची स्वप्ने अनेकदा शारीरिक अशक्तपणा, थकवा किंवा असंतुलित दिनचर्या दर्शवतात. अशा परिस्थितीत व्यक्तीने आपला आहार, झोप आणि दैनंदिन दिनचर्या सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे ठरते.

हे शुभ असू शकते का?

प्रत्येक स्वप्न नकारात्मकच असते असे नाही. काही प्रकरणांमध्ये, केस गळण्याचे स्वप्न हे जीवनातील नवीन बदल आणि ताज्या सुरुवातीचे लक्षण देखील असू शकते. हे सूचित करते की एखादी व्यक्ती जुने विचार किंवा समस्या मागे सोडून पुढे जाण्यास तयार आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा