Health Benefits | आयुर्वेदात ‘अश्वगंधा’ला अनन्यसाधारण महत्त्व, वाचा बहुगुणकारी वनस्पतीचे औषधी फायदे!

अश्वगंधा एक औषधी वनस्पती असून, तिचे वैज्ञानिक नाव Withania somnifera आहे. त्याचे सेवन केल्याने शरीराला बरेच फायदे होतात.

Health Benefits | आयुर्वेदात ‘अश्वगंधा’ला अनन्यसाधारण महत्त्व, वाचा बहुगुणकारी वनस्पतीचे औषधी फायदे!
तणाव दूर करण्यासाठी उपयुक्त अश्वगंधा
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 12:08 PM

मुंबई : सध्या बरेच लोक आयुर्वेद किंवा घरगुती उपचारांकडे वळले आहेत. सुदृढ आरोग्यासाठी आयुर्वेदाचा वापर करत आहेत. दरम्यान, याकाळात एका वनस्पतीचे नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अश्वगंधा. मोठ्या संख्येने लोक अश्वगंधा विकत घेत आहेत. ‘अश्वगंधा’ ही औषधी वनस्पती बाजारात वेगवेगळ्या प्रकारांत उपलब्ध आहे आणि बरेच लोक त्याचा वापर करत आहेत. अशा वेळी, अश्वगंध म्हणजे काय आणि शरीरावर त्याचा कसा परिणाम होतो?, असे अनेक प्रश्नही काही लोकांना पडले आहेत (Health Benefits of Ashwagandha).

अश्वगंधा एक औषधी वनस्पती असून, तिचे वैज्ञानिक नाव Withania somnifera आहे. त्याचे सेवन केल्याने शरीराला बरेच फायदे होतात. परंतु, जर आपण अधिक प्रमाणात अश्वगंधाचे सेवन केले किंवा त्याचा चुकीचा वापर केला तर ते आपल्या आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत आपल्याला त्याचे फायदे काय आहेत आणि ते खाण्यापूर्वी आपण कोणती काळजी घ्यावी हे माहित असणे गरजेचे आहे.

अश्वगंधा म्हणजे नेमके काय?

या वनस्पतीला अश्वगंधा असे नाव अश्व अर्थात घोड्यावरून पडले आहे. या वनस्पतीचा गंध घोड्याच्या वासाशी संबंधित आहे. आचार्य बालकृष्ण यांच्या म्हणण्यानुसार, अश्वगंधाला तीव्र उग्र वास येतो आणि तो ताजा असेल तर त्याचा गंध आणखीनच वाढतो. असे म्हणतात की, जर अश्वगंधाची रोपे एकत्र मिसळली गेली, तर त्यातून घोड्याच्या मूत्रसारखा वास येतो. अश्वगंधाची लागवडही केली जाते आणि ही वनस्पती जंगलातही आढळते. जंगलातून अश्वगंधा आणण्यासाठी, आपल्याला ती ओळखता येणे आवश्यक आहे. अश्वगंधाचे अनेक प्रकार आढळतात. डोंगर रांगांसह राजस्थानच्या वाळवंटी भागातही अश्वगंधा आढळते. ही वनस्पती संपूर्ण भारत आणि विशेषतः कोरड्या प्रदेशात अधिक आढळते (Health Benefits of Ashwagandha).

अश्वगंधाचे फायदे

अश्वगंधाचे बरेच आरोग्यवर्धक फायदे आहेत. परंतु, प्रत्येक रोगात अश्वगंधाचे सेवन करण्याचा मार्ग देखील वेगळा आहे. अशा परिस्थितीत तुम्ही अश्वगंधाचे सेवन करत असाल, तर प्रथम त्याबद्दल जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्या व नंतरच त्याचे सेवन करा. अश्वगंधाच्या सेवनाने पांढरे केस, डोळ्यांची दृष्टी सुधारणे, घशा संबंधित आजार, टीबी रोग, खोकला, छातीत दुखणे इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो.

याशिवाय अश्वगंधा पोटासंबंधित रोग, श्वेतपेशी, संधिवात, लैंगिक समस्या आणि रक्ता संबंधित समस्या देखील दूर करते. यापासून बर्‍याच रोगांवर उपचार केले जातात. परंतु, प्रत्येक रोगानुसार त्याच्या वापराची पद्धत भिन्न आहे. सामान्यपणे काढा बनवून अश्वगंधाचे सेवन केले जाते.  या काढ्यामध्ये अश्वगंधाच्या मुळाची भुकटी मिसळली जाते. हल्ली मागणी वाढल्याने बाजारात अश्वगंधाची मुळे सांगून इतर वनस्पती मुळे देखील विकली जातात. त्यामुळे अश्वगंधा विकत घेण्यापूर्वी जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्यावा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)

(Health Benefits of Ashwagandha)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.