Cloves Benefits | नियमित आहारात लवंग वापरताय?, वाचा याचे महत्त्वाचे फायदे…

लवंगाचे सेवन केल्याने भूक वाढते, उलट्या थांबतात, पोटात गॅस तयार होत नाही, जास्त तहान लागणे आणि कफ-पित्तदोष देखील दूर होतात.(Health benefits of clove)

Cloves Benefits | नियमित आहारात लवंग वापरताय?, वाचा याचे महत्त्वाचे फायदे...
लवंग

मुंबई : आपल्यापैकी बहुतेक लोकांना लवंगाबद्दल नक्कीच माहिती असेल. बर्‍याच प्रसंगी लवंगांचे सेवन केले जाते. लवंगाचे आरोग्याच्या दृष्टीनेही बरेच फायदे आहेत, परंतु बर्‍याच लोकांना त्याबद्दल पुरेशी माहित नाही. यामुळेच लोक तिचा योग्य मार्गाने वापर करत नाहीत. आयुर्वेदातही लवंगाशी संबंधित बरेच उपाय नमूद केले गेले आहेत (Health benefits of clove).

लवंगाचे सेवन केल्याने भूक वाढते, उलट्या थांबतात, पोटात गॅस तयार होत नाही, जास्त तहान लागणे आणि कफ-पित्तदोष देखील दूर होतात. याव्यतिरिक्त, रक्त विकार, श्वसन रोग, उचकी आणि क्षयरोगातही लवंगा वापरल्याने आपल्याला फायदा होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, लवंगा विशेषतः पुरुषांसाठी फायदेशीर मानल्या जातात. आयुर्वेदात लवंगाला औषध मानले जाते. भारतीय स्वयंपाकघरात मसाला म्हणून याचा वापर केला जातो. एका संशोधनात असे समोर आले आहे की, लवंग तेलामध्ये बेरीपेक्षा 400 पट जास्त अँटीऑक्सिडेंट असतात. चला तर, लवंगाशी संबंधित अशाच काही जबरदस्त फायद्यांबद्दल जाणून घेऊया…

लवंगाचे फायदे आणि सेवन करण्याच्या पद्धती

– तीव्र डोकेदुखी झाल्यास लवंगामध्ये चवीनुसार मीठ मिसळून, त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट दुधासह सेवन करा. याचे सेवन केल्यास डोकेदुखीपासून लवकरच आराम मिळतो.

– तांब्याच्या भांड्यात लवंगांची बारीक पूड करा. त्यामध्ये मध मिसळून डोळ्यात लावल्याने डोळ्यांच्या आजारांमध्ये आराम मिळतो. हे आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.

– लवंग पावडर आणि मध समान प्रमाणात मिसळून त्याचे चाटण केल्यास मळमळ होण्याची समस्या दूर होते.

– जर आपल्याला सांधेदुखीचा त्रास होत असेल, तर लवंगा आणि मोहरीचे तेल समान प्रमाणात मिसळा आणि सांध्यावर लावा. यामुळे वेदना कमी होते.

– लवंग तेल, आले आणि मध यांचे एकत्रित सेवन करण्याने सर्दी-खोकला आणि पडशामध्ये आराम मिळतो. याचा वापर थंडीतही लाभदायी ठरतो (Health benefits of clove).

– जर आपण कानाच्या दुखण्याने त्रस्त झाला असाल किंवा कानात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल, तर लवंगा आणि तीळाच्या तेलाचे दोन ते तीन थेंब कोमट करून कानात टाकावे, यामुळे कानाच्या समस्या दूर होतील.

– लवंग सौंदर्यासाठीही खूप फायदेशीर आहे. मुरुमांच्या समस्येने आपण त्रस्त असाल, तर मधात लवंग पावडर घालून मुरूम आलेल्या भागावर लावल्यास मुरुमांचा त्रास कमी होतो.

लवंगाचे विशेष गुणधर्म

– लवंगाचे सेवन केल्यास भूक वाढते. पचनक्रिया सुव्यस्थित राहते.

– योग्य प्रकारे भूक लागते, अन्नात रुची निर्माण होते आणि मन प्रसन्न राहते.

– लवंगाने पोटातील कृमींचा नाश होतो.

– याच्या वापराने चेतना शक्तीही जागृत राहते.

– शरीराचा दुर्गंध नाहीसा होतो.

– वेदना, आणि जखमेवर लावल्याने अनेक रोग बरे होतात.

– मूत्रमार्गासंबंधित समस्या देखील कमी होतात.

(टीप : कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Health benefits of clove)

हेही वाचा :

Child Care । जाणून घ्या नवजात बाळाला मालिश कसे करावे !

Toothache | या कारणांमुळे दातात होतात वेदना, हे घरगुती उपाय देतील आराम

Published On - 12:00 pm, Mon, 22 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI