Pregnancy | गर्भावस्थेदरम्यान ध्यानधारणा करणे आवश्यक! जाणून घ्या याचे आई आणि बळावर होणारे परिणाम…

गर्भधारणा ही कोणत्याही स्त्रीसाठी एक अतिशय आनंददायक भावना असते. परंतु या कालावधीत, महिलेच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे तिला अनेक शारीरिक आणि मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते

Pregnancy | गर्भावस्थेदरम्यान ध्यानधारणा करणे आवश्यक! जाणून घ्या याचे आई आणि बळावर होणारे परिणाम...
गर्भावस्थेदरम्यान ध्यानधारणा करणे आवश्यक!

मुंबई : गर्भधारणा ही कोणत्याही स्त्रीसाठी एक अतिशय आनंददायक भावना असते. परंतु या कालावधीत, महिलेच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे तिला अनेक शारीरिक आणि मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते (Health benefits of meditation during pregnancy).

परंतु अशा परिस्थितीत आईने काहीही करून मनाने आनंदी ठेवले पाहिजे. कारण, या काळात आईच्या मनाची स्थिती मुलावर खोलवर परिणाम करते. जर, आईचे मन प्रसन्न असेल, तर तिचे विचार सकारात्मक असतील आणि त्याचा गर्भातील बाळावरीही सकारात्मक परिणाम होईल. गर्भधारणेदरम्यान आईने काय करावे, हे जाणून घ्या…

पहिली तिमाही

पहिल्या तिमाहीत स्त्रीला मॉर्निंग सिकनेस होतो. कधीकधी, छातीत जळजळ यामुळे अस्वस्थता आणि चक्कर येण्याची संभावना असते. अशा परिस्थितीत, स्त्रीने आपल्या आहाराची जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे. पहिल्या त्रैमासिकात गर्भाची मज्जासंस्था विकसित होते. यावेळी, मुलाचा मेंदू, पाठीचा कणा आणि रक्तवाहिन्या विकसित होतात. केस, नखे, डोळे, स्वर तंतू आणि स्नायू आकार घेऊ लागतात. कानांचे स्नायू विकसित होतात, म्हणून आईने मंत्रांचा जप करावा. याकाळात आरामदायी आणि गोड संगीत ऐकले पाहिजे, जेणेकरून त्याचा मुलावर सकारात्मक परिणाम होईल (Health benefits of meditation during pregnancy).

दुसरी तिमाही

या कालावधीत, पोटात बाळाच्या हालचाली सुरू होतात. तो उचकी आणि जांभई देखील देतो. यावेळी, स्त्रीच्या शरीरात हार्मोन्सची चढउतारही वेगाने होते, अशा स्थितीत स्त्रीला खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो.

तिसरी तिमाही

गर्भधारणेचा हा सर्वात आव्हानात्मक टप्पा आहे. यावेळी मूल पूर्णपणे तयार झालेले असते. यावेळी, महिलेचे वजन देखील लक्षणीय वाढते. शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ वाटणे, पाठदुखी, पायात सूज यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच, सुरक्षित प्रसूतीबद्दल मनात एक तणाव निर्माण होतो.

अशावेळी काय कराल?

गर्भधारणेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत शारीरिक समस्यांपासून मुक्त होण्यासाठी तज्ज्ञाने सांगितल्या प्रमाणे, मनाची स्थिती नियंत्रित करण्यासाठी ध्यानधारणा हा एक उत्तम पर्याय आहे. ध्यान करण्याचे बरेच सकारात्मक परिणाम आहेत, ज्याचा परिणाम गर्भाशयात वाढणार्‍या बाळावर होतो. ध्यान केल्याने तणाव आणि अस्वस्थता कमी होते आणि शरीराच्या हालचाली सामान्य राहतात. रोगप्रतिकार शक्ती वाढते. या व्यतिरिक्त इंडोफ्रिनचा संचारही होतो. इंडोफ्रिन शारीरिक वेदना नियंत्रित करते. तसेच, मूड सुधारणारा हार्मोन मेलाटोनिन शरीरात संचार करतो. हा मनामध्ये सुरू असलेल्या तणाव आणि अशांततेची स्थिती नियंत्रित करतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Health benefits of meditation during pregnancy)

हेही वाचा :

Rice Water | केस आणि त्वचेचे आरोग्य सुधारेल ‘तांदळाचे पाणी’, वाचा याचे फायदे…

Pudina Benefits | आरोग्यवर्धक गुणांचा खजिना ‘पुदीना’, ‘या’ आजारांवर ठरेल गुणकारी!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI