Food | शेंगदाण्यांचा आहारात समावेश करण्याचे ‘6’ महत्त्वपूर्ण फायदे!

थंडीच्या दिवसात शेंगदाणे खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असते. शेंगदाण्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:00 PM, 6 Nov 2020
Food | शेंगदाण्यांचा आहारात समावेश करण्याचे ‘6’ महत्त्वपूर्ण फायदे!

मुंबई : ‘शेंगदाणे’ आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या स्वयंपाक घरात हमखास असतातच. बऱ्याचदा उत्तम टाईमपास म्हणून शेंगदाणे खाल्ले जातात. थंडीच्या दिवसात शेंगदाणे खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असते. शेंगदाण्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. त्यामुळेच शेंगदाणे प्रोटीनसाठी सर्वात स्वस्त वनस्पती स्रोत मानले जातात. मुठभर शेंगदाण्यामध्ये शरीराला पुरेशा प्रमाणात कॅलरीज, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन असतात. तसेच शेंगदाण्यापासून व्हिटामिन इ, के, आणि बी6 भरपूर प्रमाणात मिळतात. अनेक आजारांपासून बचाव करण्याऱ्या शेंगदाण्यांचे शरीराला होणारे फायदेही अधिक आहेत (Health benefits of Peanuts).

डायबेटीससाठी नियंत्रण

शेंगदाण्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असून याचा ग्लायमेक इंडेक्स सुद्धा अत्यंत कमी आहे. एखादा अन्नपदार्थ खाल्यानंतर त्यातील कर्बोदके (साखर) किती जलदपणे रक्तात मिसळली जातात यावरून त्या पदार्थाचा ग्लायमेक्स इंडेक्स ठरवला जातो. शेंगदाण्यात कर्बोदके कमी असल्याने व त्याचा ग्लायमेक इंडेक्स अत्यंत कमी असल्याने शेंगदाणे हे मधुमेही रुग्णांसाठी योग्य असतात. मधुमेही रुग्णांनी रोज मूठभर शेंगदाणे खाल्यास पुरेसे नायसिन मिळून रक्तवाहिन्यांचे दोषही कमी होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

शेंगदाण्यात भरपूर प्रमाणात फॅट आणि कॅलरीज असूनही वजन कमी करण्यासाठी शेंगदाणे खूप उपयुक्त ठरतात, हे अनेक संशोधनात सिद्ध झाले आहे. त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास किंवा वजन आटोक्यात ठेवायचे असल्यास दररोज मूठभर शेंगदाणे भाजून खावेत. शेंगदाणे जेवणापूर्वी खाल्यास भूक कमी लागते व वजन आटोक्यात राहण्यास मदत होते (Health benefits of Peanuts).

हृदविकाराचा धोका कमी होतो

शेंगदाण्यात हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारी अनेक पोषकतत्वे असतात. शेंगदाण्यात असणाऱ्या ओलिक अॅसिडमुळे हृदयातील रक्तवाहिन्यांचे दोष कमी होतात. यामुळे रक्तातील वाईट कॉलेस्टेरॉलची लेव्हल कमी होते व चांगले कॉलेस्टेरॉलची लेव्हल वाढते. तसेच, शेंगदाणे खाण्यामुळे वजनही नियंत्रित राहते. त्यामुळे हृदविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.

पित्ताशयातील खडे

कोलेस्टेरॉलमुळे पित्ताशयात खडे होत असतात. शेंगदाण्यात असणाऱ्या फायतोस्टेरोलमुळे कॉलेस्टेरॉल नियंत्रित राहते. शेंगदाणे खाण्यामुळे पित्ताशयात खडे होण्याचा धोका कमी होतो.

गरोदरपणात उपयुक्त

शेंगदाण्यामध्ये फॉलिक ऍसिड किंवा फोलेटचे प्रमाणही मुबलक असते. फॉलिक अॅसिड हा घटक प्रेग्नन्सीमध्ये खूप महत्वाचा असतो. यासाठी प्रेग्नन्सीमध्ये शेंगदाणे दररोज खाणे गर्भवती स्त्रियांसाठी खूप चांगले असते.

त्वचेसाठीही फायदेशीर

त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे ओमेगा-6 फॅटी अॅसिड हा घटक शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात असतो. त्यामुळे शेंगदाणे खाणे हे त्वचेसाठी उत्तम मानले जातात.

(Health benefits of Peanuts)

सुचना : संबंधित बातमी संशोधनावर आधारीत आहे. कोणताही उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.