AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | आयुष्यभर मजबूत हाडे हवीत? मग, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!

वयाच्या 35व्या वर्षानंतर हाडे कमकुवत होऊ लागतात आणि आपल्याला ऑस्टिओपोरोसिस सारख्या गंभीर आजाराचा धोका निर्माण होतो.

Health | आयुष्यभर मजबूत हाडे हवीत? मग, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!
हाडे मजबूत करण्यासाठी आहारात 'या' गोष्टींचा करा समावेश
| Updated on: Feb 09, 2021 | 5:36 PM
Share

मुंबई : आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, वयाच्या केवळ 25व्या वर्षांपर्यंतच आपली हाडे मजबूत राहतात. वयाच्या 35व्या वर्षानंतर हाडे कमकुवत होऊ लागतात आणि आपल्याला ऑस्टिओपोरोसिस सारख्या गंभीर आजाराचा धोका निर्माण होतो. हाडे कमकुवत झाल्यावर अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु, हाडे मजबूत करण्यासाठी काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता आणि प्रत्येक वयात निरोगी राहू शकता (Health tips to keep bones strong and healthy).

कार्बोनेटेड पेये

कार्बोनेटेड पेये जसे सॉफ्ट ड्रिंक्स, शॅम्पेन इत्यादी पदार्थ आपल्या हाडांमधून कॅल्शियम शोषून घेतात. हॉर्वर्ड येथे झालेल्या संशोधनानुसार, सॉफ्ट ड्रिंकचे अति प्रमाणात सेवन केल्यामुळे 16 ते 20 वर्षांच्या महिलांना हाडांचे नुकसान होण्याची शक्यता होती. या पेयांमध्ये जास्त प्रमाणात फॉस्फेट असते, ज्यामुळे हाडातील कॅल्शियम कमी होते.

जास्त प्रमाणात प्रोटीन

जास्त प्रमाणात प्रोटीन सेवन केल्याने शरीरात अ‍ॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे लघवीद्वारे कॅल्शियम शरीरातून बाहेर पडू शकते. दिवसातील तीन जेवणातून आपल्या शरीराला 0.12 किलो प्रथिने आवश्यक असतात. यापेक्षा जास्त प्रोटीन घेतल्यास हाडांना हानिकारक ठरू शकते.

अ‍ॅसिडिटीची औषधे

बरेच लोक छातीत जळजळ आणि हिआटल हर्नियासाठी औषधे घेतात. कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि जस्त सारख्या खनिजांच्या शोषणासाठी, पोटाट आम्ल असणे आवश्यक आहे. आपण अ‍ॅसिडची निर्मिती थांबवण्यासाठी कोणतेही औषध घेत असाल, तर यामुळे ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका वाढतो. केवळ 6 ते 8 आठवड्यांपर्यंत ही औषधे घेणे सुरक्षित मानले जाते.

कॅफिनपासून दूर रहा

एक कप कॉफीमुळे 150 मिलीग्राम कॅल्शियम लघवीद्वारे शरीरातून बाहेर सोडले जाते. कॉफीमध्ये इतर अनेक हानिकारक रसायने असतात, जे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर निघून जाण्यावर रोख लावतात. जर आपल्याला कॉफी पिण्याची इच्छा असेल तर, प्रत्येक कपमागे 150 मिलीग्राम कॅल्शियमचे घेण्याचे प्रमाण वाढवा (Health tips to keep bones strong and healthy).

व्हिटामिन डीचे सेवन करा

व्हिटामिन डी कॅल्शियम शोषून घेण्यास आणि ते हाडांमध्ये पोहोचवण्यात मदत करते. रोगप्रतिकारक शक्तीसाठी देखील हे फार महत्वाचे आहे. जेव्हा आपण सूर्यप्रकाश घेता, तेव्हा त्वचेद्वारे शरीरात व्हिटामिन डी तयार होतो. आपण सूर्यप्रकाश घेऊ शकत नसल्यास, त्याऐवजी व्हिटामिन डी पूरक आहार देखील घेऊ शकता.

हार्मोन्सवर लक्ष ठेवा

स्त्रियांमध्ये हाडे खराब होण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे रजोनिवृत्ती. 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना हाडांचे नुकसान होण्याचा धोका असतो. हाडे निरोगी ठेवण्यासाठी पर्याप्त प्रमाणात इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉनची आवश्यकता असते. रजोनिवृत्ती दरम्यान या हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होते, जे हाडांसाठी हानिकारक ठरू शकते.

ताणतणाव

वाढता ताणतणावामुळे शरीरात कोर्टिसॉल हार्मोनची पातळी वाढते. जर त्याची पातळी बर्‍याच काळासाठी उच्च राहिली, तर हाडे खराब होऊ शकतात. यामुळे, रक्तातील साखरेची पातळी देखील वाढू शकते आणि लघवीद्वारे शरीरातून कॅल्शियम बाहेर टाकला जाऊ शकतो. तणावापासून दूर राहण्यासाठी पुरेशी झोप आणि आरोग्याची काळजी घ्या.

व्यायाम

व्यायामादरम्यान जेव्हा स्नायू हाडांच्या विरुद्ध दिशेने खेचले जातात, तेव्हा यामुळे हाडांमध्ये उत्तेजना निर्माण होतो. चालणे, हायकिंग, पायऱ्या चढणे आणि वजन उचलणे यामुळे हाडांची घनता वाढते. दिवसाभराचा 15 ते 30 मिनिटांचा व्यायाम देखील हाडांच्या आरोग्यासाठी पुरेसा आहे.

(Health tips to keep bones strong and healthy)

हेही वाचा :

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.