Healthy Eating |  काम करत जागण्यामुळे रात्री भूक लागतेय? मग, नक्की खा ‘हे’ लेट नाईट स्नॅक्स

रात्री लवकर जेवल्याने किंवा रात्री उशिरापर्यंत जागल्यामुळे कधी कधी मध्यरात्री देखील भूक लागते. भूक शमवण्यासाठी बहुतेक लोक या वेळी काहीही हाताला मिळेल ते खातात.

Healthy Eating |  काम करत जागण्यामुळे रात्री भूक लागतेय? मग, नक्की खा ‘हे’ लेट नाईट स्नॅक्स
लेट नाईट स्नॅक्स
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 1:08 PM

मुंबई : रात्री लवकर जेवल्याने किंवा रात्री उशिरापर्यंत जागल्यामुळे कधी कधी मध्यरात्री देखील भूक लागते. भूक शमवण्यासाठी बहुतेक लोक या वेळी काहीही हाताला मिळेल ते खातात. ज्यामुळे वजन अवाजवी वाढते, जे आरोग्यासाठीही हानिकारक आहे. अशावेळी काहीही खाण्याऐवजी काही निरोगी स्नॅक्सब खाल्ले पाहिजेत, जेणे करून आपली भूकही शमेल आणि आरोग्यही सुदृढ राहील. चला तर, जाणून घेऊया आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकणार्‍या काही आरोग्यदायी स्नॅक्सबद्दल… (Healthy food For Late Night Cravings)

छोले चटणी

वाटलेले छोले म्हणजे छोले चटणी हा पदार्थ प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. मध्यरात्रीच्या वेळी खाण्यासाठी हा एक अतिशय निरोगी नाश्ता आहे. हेल्थ तज्ज्ञ म्हणतात की, हा पदार्थ रक्तातील साखर नियंत्रित करतो आणि पोट बर्‍याच वेळासाठी भरलेले राहते.

सोयाबीनच्या शेंगा

हिरव्या सोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त आणि कॅलरी कमी असतात. सोयाबीनच्या शेंगाच्या एका कपात उकळवून त्यात मीठ, मिरची, शिमला मिरची आणि जिरेपूड घालून छानसा नाश्ता बनवता येतो.

पॉपकॉर्न

3 कप पॉपकॉर्न तेही बिना तेलाचे, मिड-नाईट स्नॅकसाठी एक चांगला पर्याय आहे. पॉपकॉर्नमध्ये कॅलरी कमी असतात आणि फायबरही जास्त असते. मात्र, त्यात लोणी किंवा बटर न घालण्याचा प्रयत्न करा.

पिस्ता

निरोगी चरबीशिवाय पिस्त्यामध्ये  प्रोटीन, फायबर आणि मेलाटोनिन देखील असते. मूठभर पिस्त्यामध्ये 6.5 मिलीग्राम मेलाटोनिन असते. हे खाल्ल्याने झोप चांगली येते आणि पोटही भरते (Healthy food For Late Night Cravings).

मूठभर नट्स

आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, रात्रीच्या भुकेसाठी 10-12 बदाम, शेंगदाणे, काजू किंवा अक्रोड हे सर्वोत्कृष्ट स्नॅक्स आहेत. नट्समध्ये चांगली चरबी, प्रथिने आणि फायबर असतात. ज्यामुळे ते खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरलेले राहते.

लो फॅट मिल्क

दुधात ट्रिप्टोफेन नावाचा अमीनो आम्ल असतो, जो मेलाटोनिन आणि सेरोटोनिन हार्मोन्स तयार करतो. या संप्रेरकांमुळे तणाव कमी होतो आणि झोप देखील सुधारते. दुधात समृद्ध प्रमाणात प्रथिने असतात, जे सेवन केल्याने बर्‍याच वेळेस पोट भरलेले राहते. जर, आपल्याला मध्यरात्री भूक लागली असेल, तर दूध एक चांगला आणि निरोगी पर्याय आहे.

पीनट बटर आणि सफरचंद

मध्यरात्रीच्या भूकेसाठी पीनट बटर आणि सफरचंद इतका दुसरा चांगला स्नॅक असू शकत नाही. पीनट बटरमध्ये प्रथिने आणि निरोगी चरबी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे पोट भरतं. रात्री उशीरा खाल्ला जाणारा स्नॅक्स नेहमीच संतुलित असावा. सफरचंद किंवा केळीसारखे कार्ब शेंगदाणा बटर बरोबर घेणे नेहमीच फायदेशीर ठरेल, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हर्बल टी

झोपण्यापूर्वी आपल्याला भूक लागली असेल, तर हर्बल चहा प्या. मध, दालचिनी सारख्या बर्‍याच फ्लेवर्समध्ये हर्बल टी सेवन करता येतो. ज्यांना त्वरीत झोप लागत नाही, त्यांना हर्बल चहामुळे खूप आराम मिळतो.

(Healthy food For Late Night Cravings)

हेही वाचा :

Skimmed  Milk | स्किम्ड दुधाचे सेवन करताय? थांबा! आधी जाणून घ्या याचे दुष्परिणाम…

Weight Loss | Intermittent Fasting दरम्यान ‘ब्लॅक कॉफी’ पिणे ठरेल फायदेशीर! जाणून घ्या कसे…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.