Heart Care | नियमित व्यायाम, नियंत्रित रक्तदाब, हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी ‘या’ टिप्स येतील कामी!

अवघ्या मूठभर आकाराचे ‘हृदय’ (Heart) मानवी शरीरातील एक महत्त्वपूर्ण अवयव आहे. इतर अवयवांप्रमाणेच, हृदयाला देखील कार्यक्षम राहण्यासाठी, त्याचे कार्य सुरळीत राहण्यासाठी त्याची काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे.

Heart Care | नियमित व्यायाम, नियंत्रित रक्तदाब, हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी ‘या’ टिप्स येतील कामी!
हृदयाची काळजी

मुंबई : अवघ्या मूठभर आकाराचे ‘हृदय’ (Heart) मानवी शरीरातील एक महत्त्वपूर्ण अवयव आहे. इतर अवयवांप्रमाणेच, हृदयाला देखील कार्यक्षम राहण्यासाठी, त्याचे कार्य सुरळीत राहण्यासाठी त्याची काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. हृदयाशी संबंधित अनेक समस्या जसे की, हार्ट अटॅक आणि स्ट्रोक इत्यादी आजार हृदयाची योग्य काळजी न घेतल्यामुळे उद्भवू शकतात. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या जीवनशैलीमध्ये या 7 टिप्स नक्की समाविष्ट करू शकता (Heart Care tips to keep your heart healthy and fit).

निरोगी आहार

आपल्याला निरोगी ठेवण्यात, विशेषतः जेव्हा हृदयरोगाचा धोका कमी करण्याचा विचार केला जातो, तेव्हा अन्न महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. जर आपल्याला हृदयरोगाचा उच्च धोका असेल, तर आपण विशेषतः आपल्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. जरी अशी कोणती समस्या नसेल तरी नेहमीच पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. मीठ आणि साखरेचा कमी वापर तसेच, लाल मांसाचा कमी वापर आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी गरजेचा आहे. आपल्या आहारातील हेल्दी फॅट, फळे आणि भाज्या इत्यादी घटक हृदय निरोगी ठेवण्यात मदत करतात.

नियमित व्यायाम

कार्डिओ व्यायाम इतके लोकप्रिय झाले आहेत, यामागचे कारण म्हणजे ते आपले हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. आपण आठवड्यातून 5 दिवस 30 मिनिटांचा नियमित व्यायाम केलाच पाहिजे. या हृदय निरोगी राहण्यास आणि रोगांचा धोका कमी होण्यास मदत होते.

रक्तातील साखर नियंत्रित ठेवा

रक्तातील अनियंत्रित आणि उच्च साखर हृदयासह शरीराच्या महत्त्वपूर्ण अवयवांचे नुकसान करू शकते. म्हणून, रक्तातील  साखरेच्या पातळीची काळजी घ्या आणि असा आहार घ्या ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होईल.

कोलेस्ट्रॉलच्या पातळीची काळजी घ्या

कोलेस्ट्रॉल हे एक कंपाऊंड आहे, जे शरीराद्वारे आवश्यकतेनुसार बनवले जाते. कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आणू शकते. यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. यासाठी आपण कोलेस्ट्रॉलची पातळी नियमितपणे तपासत राहू शकता आणि त्यास अधिक चांगल्याप्रकारे नियंत्रित करण्यासाठी निरोगी आहार घेऊ शकता (Heart Care tips to keep your heart healthy and fit).

वजन नियंत्रण

लठ्ठपणा किंवा वजन जास्त असणे, हे देखील विविध रोगांचे आणि त्यांच्या जोखमीचे कारण बनू शकते. यामध्ये हृदयाशी संबंधित आजारांचा देखील समावेश आहे. आपण आपले हृदय निरोगी ठेवू इच्छित असल्यास, वजन कमी करण्याचा प्रयत्न करा.

नियंत्रित रक्तदाब

उच्च रक्तदाब हृदयाच्या सर्वात सामान्य समस्यांपैकी एक आहे. हृदयविकाराचा झटका आणि इतर रोगांसाठी देखील ते मूळ कारण बनू शकते. यासाठी आपण नियमितपणे आपला रक्तदाब तपासत रहावे आणि उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत करणारा आहार घ्यावा.

धूम्रपान टाळा

धूम्रपान केल्याने फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका वाढतो. जर, तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल, तर धूम्रपान करणे कटाक्षाने टाळावे. आपण धूम्रपान करत नसल्यास, धूम्रपान करणार्‍या लोकांपासून देखील दूर रहा.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Heart Care tips to keep your heart healthy and fit)

हेही वाचा :

Weight Loss | वजन कमी करायचंय? मग, गव्हाऐवजी ‘या’ पिठाच्या चपात्यांचा आहारात समावेश करा!

Weight Loss | लिंबूसमवेत ‘या’ दोन घटकांमुळे वजन होईल कमी, पोटावरील चरबी देखील होईल गायब!