लांब आणि मजबूत केसांसाठी घरी बनवा सीरम, कोंड्याची समस्याही होईल दूर
तुम्हालाही लांब, जाड आणि मजबूत केस हवे आहेत का किंवा कोंड्याची समस्या दूर करायची आहे का? तर आता तुम्हाला महागडे प्रोडक्ट खरेदी करण्याची अजिबात गरज नाही, कारण या काही सोप्या गोष्टी वापरून घरी केसांच्या वाढीचा सीरम बनवू शकता जे तुमच्या केसांना पोषण देतील आणि कोंड्यालाही दूर करतील.

आजकाल बदलते वातावरण तसेच बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्याल अनेक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर त्वचेचं आरोग्य व केसांच आरोग्य यांचीही काळजी घ्यावी लागते. कारण बदलत्या हवामानाचा परिणाम आपल्या केसांवर होत असतो आणि केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. तसेच तुम्हालाही लांब आणि जाड तसेच मजबुत केस हवे असतील तर या घरगुती गोष्टींचा वापर करून तुम्ही हेअर सीरम तयार करू शकता. तर या केसांच्या वाढीच्या सीरममध्ये वापरण्यात आलेलेसर्व घटक केसांसाठी खूप फायदेशीर मानले जातात. त्यात असलेले घटक तुमचे स्कॅल्प निरोगी ठेवतात, रक्त प्रवाह सुधारतात आणि केसांना मुळांपासून मजबूत करण्यास मदत करतात. चला तर मग विलंब न करता आजच्या या लेखात आपण हे केसांचे सीरम बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या.
केसांच्या वाढीचा सीरम बनवण्यासाठी लागणारे साहित्य
कांद्याचा रस: कांद्यामध्ये सल्फर भरपूर प्रमाणात असते, जे केसांच्या वाढीसाठी खूप महत्वाचे आहे. त्यामुळे केस जाड होण्यास कांद्याचा रस मदत करते आणि कोंडा कमी करते.
आल्याचा रस: आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे स्कॅल्पची खाज आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. तसेच याच्या वापराने रक्ताभिसरण देखील वाढते, ज्यामुळे केसांना योग्य पोषण मिळते .
नारळ तेल: नारळ तेल केसांना मॉइश्चरायझ करते आणि केस तुटण्यापासून रोखते. तसेच नारळाचे तेल केसांना चमकदार आणि मऊ देखील बनवतात.
टी ट्री ऑईल : तुम्हाला जर कोंड्याची खूप समस्या असेल तर टी ट्री ऑईलचे काही थेंब केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण या तेलात बुरशीविरोधी गुणधर्म आहेत जे कोंड्याला कारणीभूत असलेल्या बुरशीला नष्ट करतात.
व्हिटॅमिन ई कॅप्सूल: व्हिटॅमिन ई केसांना मजबूत करते आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या नुकसानापासून केसांचे संरक्षण करते.
केसांच्या वाढीचा सीरम बनवण्याची पद्धत
कांदा आणि आल्याचा रस काढा
- सर्वप्रथम एका भांड्यात एक मध्यम आकाराचा कांदा किसून घ्या आणि त्याचा रस काढा. त्याचप्रमाणे, आल्याचा एक छोटा तुकडा किसून घ्या आणि त्याचा रस काढा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते मिक्सरमध्ये बारीक करू शकता आणि कापडातून गाळून रस काढू शकता.
- आता एका भांड्यात 2 चमचे कांद्याचा रस आणि 2 चमचे आल्याचा रस घ्या. आता त्यात 2 चमचे नारळाचे तेल मिक्स करा.
- जर तुम्ही टी ट्री ऑईल वापरत असाल तर त्याचे 5-7 थेंब वरील मिश्रणात मिक्स करा. तसेच व्हिटॅमिन ई कॅप्सूल देखील मिक्स करा. आता एकसमान सीरम तयार करण्यासाठी सर्व घटक चांगले मिक्स करा.
अशा पद्धतीने सीरम केसांना लावा
- हे सीरम तुमच्या बोटांच्या मदतीने थेट तुमच्या स्कॅल्पवर लावा.
- तुमच्या स्कॅल्पला 5-10 मिनिटे हलक्या हाताने मसाज करा जेणेकरून सीरम मुळांपर्यंत पोहोचेल आणि रक्तप्रवाह वाढेल.
- तुम्ही उरलेले सीरम तुमच्या केसांवर, विशेषतः केसांच्या टोकांवर देखील लावू शकता.
- ते कमीत कमी ३० मिनिटे ते १ तास तसेच राहू द्या. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ते रात्रभर लावून झोपू शकता.
- नंतर सौम्य शाम्पू आणि कंडिशनरने तुमचे केस धुवा.
- आठवड्यातून 2-3 वेळा हे सीरम वापरा. नियमित वापराने तुम्हाला काही आठवड्यांत फरक दिसू लागेल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
