बाजारातून केमिकलयुक्त जॅम नको रे बाबा, घरच्या घरी ‘असा’ करा तयार
बाजारात मिळणारे जाम खाण्याऐवजी, घरीच चविष्ट आणि आरोग्यदायी जाम बनवणे चांगले आहे जे तुम्ही मुलांना ब्रेड, चपाती, पराठ्यासोबत खाऊ शकता. या जाममुळे मुलांच्या आरोग्याला नुकसान पोहोचणार नाही आणि त्यांना निरोगी ठेवण्यास मदत होईल. तर आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत की तुम्ही घरी चविष्ट आणि हेल्दी जाम कसा बनवू शकता. रेसिपी जाणून घ्या.

आपल्या प्रत्येकांच्या घरात जॅम हे असतेच. कारण फ्रूट जॅम हा सर्वांचा आवडता पदार्थ आहे. लहान मुलांनाच काय तर मोठ्यांनाही याची चव फार आवडते. पण अनेकजण बाजारातून जॅम विकत घेतात आणि खातात. मात्र बाजारातील पॅकबंद असलेल्या जॅममध्ये अनेक कॅमिकलचा वापर केला जातो. बाजारात मिळणारा जाम जो आपण इतक्या आनंदाने खातो तो आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. या प्रकारच्या जाममध्ये आर्टिफिशियल रंग, प्रेझिरवेटिव्ह आणि कॅमिकल असतात जी आपल्या आरोग्याला नुकसान पोहोचवतात. त्यामूळे तुम्हाला जर घरी जॅम बनवण्याची रेसिपी मिळाली तर तुम्हाला चवीसोबतच चांगले आरोग्य मिळेल.
घरी जाम बनवणे खूप सोपे आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही ते बनवू शकता आणि 1-2 महिन्यांसाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता. चला तर मग आज आपण घरच्या घरी जॅम बनवण्याची रेसिपी जाणून घेऊयात.
घरी बनवा हे 3 प्रकारचे जॅम
आंब्याचा चविष्ट जाम
आंब्याचा जॅम बनवण्यासाठी सर्वात प्रथम आंबा सोलून त्याचे बारिक तुकडे करा. आता आंबा ब्लेंडरमध्ये टाकुन ब्लेंड करा. पॅनमध्ये आंब्याची पेस्ट घाला आणि 5 मिनिटे शिजवा, नंतर त्यात साखर टाकून ती विरघळेपर्यंत शिजवत रहा. आता त्यात 2 चमचे लिंबाचा रस घाला आणि शिजवा. पेस्ट घट्ट झाल्यावर ती प्लेटमध्ये काढा. आंब्याचा जॅम तयार आहे. आता तयार जॅम ब्रेडवर लावून खा. आंब्याचा जॅम हेल्दी बनवण्यासाठी त्यात साखर टाकू नये.
सफरचंदांपासून स्वादिष्ट जॅम बनवा
सफरचंद जॅम बनवण्यासाठी प्रथम सफरचंद चांगले धुवा, नंतर त्याच्या बिया काढून त्याचे लहान तुकडे करा. एका भांड्यात सफरचंदाचे तुकडे आणि पाणी घाला आणि सफरचंद शिजवा. सफरचंद मऊ होईपर्यंत उकळा. सफरचंद मऊ झाल्यावर ते मॅश करा आणि त्यात साखर टाकून मिक्स करा. जॅम थंड झाल्यावर ते काचेच्या बाटलीत काढा. जर तुम्हाला सफरचंदाचा जॅम हेल्दी बनवायचा असेल तर तुम्ही त्यात गूळ किंवा साखरेचा रस वापरू शकता.
स्ट्रॉबेरी जॅम आरोग्यदायी
स्ट्रॉबेरी जॅम बनवण्यासाठी स्ट्रॉबेरी धुवा आणि त्यांचे लहान तुकडे करा. नंतर एका पॅनमध्ये साखर घालून शिजवा आणि स्ट्रॉबेरी मॅश करा. 10-15 मिनिटे शिजवल्यानंतर तयार जॅम काचेच्या बाटलीत ठेवा. जर तुम्हाला हे जॅम अधिक आरोग्यदायी बनवायचे असेल तर तुम्ही त्यात गूळ किंवा साखरेचा रस वापरू शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)