AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉटेलच्या रूममधील या वस्तू चुकूनही बॅगेत घेऊ नका, अन्यथा चार-चौघात जाईल इज्जत

Hotel Room Rules : हॉटेलमध्ये मुक्काम करताना काही नियमांचे पालन करावे लागते. अनेकदा लोक नकळत किंवा गैरसमजात हॉटेलमधील काही वस्तू घरी घेऊन जातात. मात्र यामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता.

हॉटेलच्या रूममधील या वस्तू चुकूनही बॅगेत घेऊ नका, अन्यथा चार-चौघात जाईल इज्जत
Hotel Room RuleImage Credit source: Google
| Updated on: May 06, 2026 | 10:06 PM
Share

तुमच्यापैकी अनेकजण हॉटेलमध्ये मुक्काम करत असाल. हॉटेलमध्ये मुक्काम करताना काही नियमांचे पालन करावे लागते. इंडोनेशियातील बाली मधील एका लक्झरी रिसॉर्टमध्ये थांबलेल्या भारतीय कुटुंबाचा एक व्हिडिओ सध्या जोरात व्हायरल होत आहे. चेकआउटच्या वेळी या कुटुंबाने अशी काही कृती केली की हॉटेल स्टाफला त्यांची बॅग उघडून तपासावी लागले. या कुटुंबाने हॉटेलमधील अनेक वस्तू बॅगमध्ये भरून नेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांच्यावर चोरीचा आरोप झाला आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. अनेकदा लोक नकळत किंवा गैरसमजात हॉटेलमधील काही वस्तू घरी घेऊन जातात. मात्र यामुळे अनेकांची इज्जत जाते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बॅगमधून काय-काय सापडले?

व्हायरल व्हिडिओतील कुटुंब बालीतील उबुद येथील एका रिसॉर्टमध्ये थांबले होते. चेकआउटवेळी हॉटेल स्टाफला काही वस्तू गायब असल्याचा संशय आला. बॅग तपासल्यावर त्यांच्या जवळून हॉटेलमधील वस्तू सापडल्या. त्यांच्या बॅगमध्ये शोपीस, हेअर ड्रायर, टॉवेल, साबण डिस्पेंसर, डोरमॅट आणि अगदी चमचेही सापडले. त्यानंतर स्टाफसोबत त्यांची जोरदार वादावादी झाली. नंतर कुटुंबाने माफी मागितली आणि पैसे देण्याची तयारी दर्शवली. त्यांनी सर्व सामान परत केले त्यामुळे ते कारवाईपासून वाचले.

कोणत्या वस्तू तुम्ही हॉटेलमधून घेऊन जाऊ शकता?

  • टॉयलेट्रीज : छोटे साबण, शॅम्पू, कंडिशनर, शॉवर कॅप
  • डेंटल आणि शेव्हिंग किट: टूथब्रश, छोटा टूथपेस्ट, डिस्पोजेबल शेव्हिंग किट
  • स्टेशनरी: पेन आणि नोटपॅड
  • चहा-कॉफी सॅशे: चहा, कॉफी, साखर, मिल्क पावडर
  • डिस्पोजेबल चप्पल: यूज-अँड-थ्रो चप्पल
  • सिलाई किट: सुई-धाग्याचे छोटे किट

कोणत्या वस्तू घेऊन जाणे चुकीचे आहे?

  • टॉवेल आणि बेडशीट
  • इलेक्ट्रॉनिक वस्तू (हेअर ड्रायर, केतली)
  • सजावटीच्या वस्तू (डेकोरेटिव्ह आयटम्स)
  • मोठे साबण/शॅम्पू डिस्पेंसर
  • डोरमॅट, कुशन, भांडी

तुमच्याकडे चुकूनही वरील वस्तू सापडल्या तर तुमच्यावर चोरीचा गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाई होऊ शकते. तसेच तुमच्या सर्वासमोर नाचक्कीही होऊ शकते. त्यामुळे तुम्ही एखाद्या ठिकाणी मुक्काम केला तर बाहेर पडताना तुमची बॅग एकदा नक्की तपासा, अन्यथा तुम्हाला त्रासाचा सामना करावा लागू शकतो.

Follow Us
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
Bhaskar Jadhav । चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा; भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच